Maharashtra Weather Updates Today : मागील आठवड्यात राज्यात हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यानंतर आता हवामान विभागाने नवा अलर्ट जारी केलेला आहे.नुकतेच हवामान विभागाने जारी केलेल्या यलो अलर्ट नंतर पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसाने आपला असर दाखविला.
या अलर्ट नंतर गोवा समुद्र किनारपट्टी आणि इतर भागात तसेच मिरज,सांगली, सिंधुदुर्ग आणि सातारा या जिल्ह्यात जोरदार अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दोन दिवसादरम्यान जनजीवन विस्कळीत होताना दिसले.
आता दक्षिण महाराष्ट्रात वातावरण बदल.
यानंतर आता राज्याचे हवामान विभागाने पुढील 24 तासांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा नवा इशारा जारी केला आहे.
विशेष म्हणजे हवामान विभागाच्या अलर्ट नंतर पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणात अनेक भागात अवकाळी पाऊस कोसळला तर दुसरीकडे आता दक्षिण महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात ढगाळी वातावरण दिसत असून या भागात वातावरणात अचानक बदल झालेला आहे.
यामुळे हवामान खात्याच्या अंदाजानुसार या भागात अवकाळी पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
दक्षिण महाराष्ट्र मधील काही जिल्ह्यात येत्या 2 दिवसात ढगाळी वातावरण आणि वातावरणात नमी कायम राहणार असून सोलापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.
येथे अवकाळी पाऊस आणि गारपीट मुळे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी,यासाठी हवामान खात्याने खबरदारीचा इशारा दिलेला आहे.
पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस,काही जिल्ह्यात तापमानात वाढ होणार.
तर दुसरीकडे हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पाऊस तर काही जिल्ह्यात पुन्हा तापमान वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात वादळी वारे आणि वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक व्यवस्था कोलमळताना दिसली तर दुसरीकडे वादळी वाऱ्याने आणि पावसामुळे शेती पिकांचे सुद्धा मोठे प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र आहे.
या भागात येणाऱ्या 24 तासात वातावरणात पुन्हा बदल होऊन तापमान स्थिर राहणार असल्याची शक्यता आता हवामान खात्याने आपले अंदाजातून वर्तवली आहे.
Maharashtra Weather Updates Today : दक्षिण भारतात हलके वादळी पाऊस.
या दरम्यान दक्षिण भारताच्या काही भागात अवकाळी पावसाचे प्रवेश होताना दिसले.{South India Weather}.दक्षिण भारतात अनेक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार छत्तीसगड आणि कर्नाटक मधून गुजरणाऱ्या वाऱ्यामुळे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला.यामुळे आता विदर्भात तापमान 39 ते 40°c पर्यंत पोहोचले आहे.
तर दुसरीकडे ठाणे,मुंबई पालघर या भागात तापमान पुन्हा वाढणार असून उष्ण वारे वाहू शकतात असा इशारा हवामान खात्याने देताना नागरिकांना आरोग्याची काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.
जम्मू काश्मीर भागात हिमवृष्टी,महाराष्ट्रात Heat Wave?
दरम्यान महाराष्ट्र आणि दक्षिण भारतात वातावरणात पुन्हा अचानक बदल होऊन हलक्या पावसाची सरी कोसळणार असून यानंतर देशभरात तापमानात वाढ होऊन उष्णतेची लाट तीव्र होणार,असे हवामान विभागाने आपल्या अंदाजाने स्पष्ट केले आहे.
यादरम्यान येणाऱ्या 2 ते 3 दिवसात देशात लद्दाख आणि जम्मू-काश्मीर भागात झंजावाती हिम वारे आणि यादरम्यान हिमवृष्टी होण्याची सुद्धा शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
यानंतर एप्रिल आणि मे महिन्यात देशात आणि महाराष्ट्रात उष्णतेचा जोर आणखी वाढणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.{HeatWave In April Mid And May}.दरम्यान पटेल मध्ये आणि मे महिन्यात महाराष्ट्रात हिटवेव आणि मे हिट {May Heat}राहणार असल्याची शक्यता सध्याच्या तापमान वाढीमुळे वर्तविण्यात येत आहे.