Maharashtra Weather Update : मागील आठवड्यात सुरू झालेल्या कडाक्याची थंडीमुळे अवघे महाराष्ट्र गारठले आहे. दोन दिवसांपूर्वी राज्यात सर्वात कमी तापमान अहिल्यानगरचा 5.6 डिग्री सेल्स आणि पुणे शहरात 6.5 यांच्यापर्यंत खाली कोसळला होता. दरम्यान अख्या विदर्भात कडाक्याची थंडी पडत असून या भागातील सर्व ग्रामीण आणि शहरी भाग गारठले आहे.
महाराष्ट्रात डिसेंबर च्या सुरुवातीला यंदा थंडी पडणार की नाही याबाबत संभ्रम कायम होते कारण फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर च्या सुरुवातीला आकाशात आभाळ असल्याने थंडी बेपत्ता झाली होती. मात्र आता महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पळत असून राज्यात तापमान खाली कोसळला आहे. हिरवी हिवाळ्यात दिवसात 18 ते 20 डिग्री सेल्सिअस तापमान त्याहून खूप खाली आला असून रात्री तर अनेक शहरांमध्ये सहा ते सात डिग्री सेल्सिअस च्या खाली तापमानाची नोंद झाली आहे. या दरम्यान राज्याच्या थंड भाग म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर भागामध्ये काळाक्याची थंडी आणि थंड हवेमुळे ग्रामीण भागात दवबिंदू गोठताना दिसत आहे.
डिसेंबरच्या मध्यपर्यंत उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि शीतलहर सुरू झाली आहे. याच्याच असं महाराष्ट्रात दिसून येत असून उत्तर भारतातील शीतलहर महाराष्ट्र दिशेने वेगाने येत आहे.तर दुसरीकडे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या समुद्र किनारपट्टी असलेल्या भागात वाष्पयुक्त वारी येत असल्याने थंडीच्या लाटेत काही कमी आली आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार बंगालच्या सागरात कमी दबावाचा पट्टा तयार झाल्याने दक्षिण भारतात येणाऱ्या काही दिवसात मुसळधार पाऊस कोसळु शकते,असा अंदाज या खात्याने वर्तविला आहे मात्र मध्य महाराष्ट्रात डिसेंबरच्या मध्यान पर्यंत थंडीची तीव्र लाट कायम राहणार असल्याची शक्यताही आहे.
पंजाब, हरियाणा, चंदिगड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश,राजस्थान,या राज्यांमध्ये पारा 0 ते 6 अंशांवरती गेला आहे. तर, काश्मीरमध्ये तापमान खाली गेले आहे.दरम्यान राज्यात 18 ते 21 डिसेंबरदरम्यान थंडीची तीव्रता काही कमी होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.सध्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा आणि बाष्पयुक्त वारे येत असताना याची टक्कर महाराष्ट्रात होत आहे.यामुळे येथील काही भागात कमी थंडी आहे.तर दुसरीकडे जम्मू काश्मीर मध्ये बर्फबारी मुळे मध्यप्रदेश पर्यंत थंडीची तीव्र लाट आली आहे.त्यामुळे येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढू शकते.त्यामुळे हवामान खात्याने अनेक सध्या भागात येलो अलर्ट जारी केला आहे.
पुणे शहराचा पारा 6.5 डिग्री सेल्सियस वर आला.
पुणे शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात थंडीचा कहर दिसत आहे. येथील एनडीए भागाचे तापमान मंगळवारी 6.5 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले तर शिवाजीनगर भागात 7.8 °c नोंदविल्या गेले.
महाबळेश्वरमध्ये वेण्णा लेकवर दवबिंदू गोठले.
महाबळेश्वर शहर परिसरात गेल्या आठवड्यापासून थंडीचे प्रमाण वाढलेले आहे.मागील रात्री थंडीत वाढ होऊन येथील वेण्णा लेक (Venna Lack)परिसरात तापमान पारा 4 अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला.त्यामुळे या झील मध्ये दवबिंदू गोठून हिमकण तयार झाल्याचे दिसले.तर राज्यातील दुसरे थंड हवेचे ठिकाण तोरणमाळमध्ये काश्मीर सारखी थंडी आहे. सातपुडा पर्वत रांगेत वसलेल्या या तोरणमाळचा घाटात धूक्याची चादर असून पयशवंत तलाव दाट धुक्यात दिसत आहे.
कडाक्याच्या थंडीमुळे केळी उत्पादक भागांना तापमान खाली गेल्याचा फटका बसत आहे. वातावरण खूप थंड झाल्याने केळी निर्यातीवर असर होत असून,केळी उत्पादक नुकसान होत असल्याने चिंतेत दिसत आहे.सोलापूर जिल्ह्यातून दीड हजार कोटींची केळी निर्यात होते,पण कडाक्याच्या थंडीचा केळी उत्पादन वर प्रभाव झाला आहे.दोन दिवसात सोलापूर जिल्ह्यात पारा 10 डिग्री सेल्सिअस वर आला.यामुळे केळी बागायदारांत निर्यातीची चिंता आहे,कारण चिलींगमुळे केळीच्या आतील गाभा खराब होत आहे.