Maharashtra Weather Update : मागील काही दिवसापासून स्थित असलेल्या वातावरणात थंडीने जोर पकडला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होत आहे. मात्र सध्या संपूर्ण उत्तर भारत धुक्याच्या चादरीखाली गेला आहे. जम्मू काश्मीर मध्ये बर्फ भारी सुरू असताना उत्तर भारतात कडाक्याची थंडी पडत आहे. मात्र महाराष्ट्रात उत्तर भारत आणि विदर्भ वगळता,कोंकण आणि मध्य महाराष्ट्र तसेच मुंबई भागात तापमान स्थिर आहे.
येत्या 48 तासात तापमान कोसळणार.
दरम्यान येत्या 48 तासात महाराष्ट्रातील काही भागात तापमानात मोठी घट होणार असून तापमान 3 ते 4 डिग्री सेल्सियस खाली जाणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. यादरम्यान विदर्भातील जिल्ह्यात आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात थंडीत मोठी वाढ, मात्र मध्य महाराष्ट्रात काही भागातच थंडी पडणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे.कोकणात थंडीत वाढ न होता उलट तापमानात वाढ होऊ शकते. यासोबतच मुंबई आणि याचे सब अर्बन भागात रात्री थंड आणि दिवसांमध्ये उष्ण असा वातावरण राहणार आहे.असाही अंदाज वर्तविण्यात आला आहे.
नागपुरात निच्चांकी 8.8 डिग्री से.तापमानाची नोंद.
विदर्भात आणि उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात नोव्हेंबर2024 पर्यंत तापमान खाली गेला नाही. त्यामुळे फारशी थंडी पडली नव्हती. डिसेंबर च्या सुरुवातीपर्यंत असाच हलवता मात्र डिसेंबरच्या मध्ये विदर्भात आणि संपूर्ण महाराष्ट्रात कडाक्याची थंड पडत तापमान खाली गेले होते. मात्र मागील आठवड्यात विदर्भात तापमानात अचानक दोन दिवसापासून तापमानात घट झाली आहे त्यामुळे विदर्भातील आणि राज्यातील काही शहरांमध्ये थंडीच्या प्रभाव वाढला आहे तर काही भागात दगाडी वातावरण आहे.
गुरुवार आणि शुक्रवारच्या पहाटेपर्यंत विदर्भात नागपूर गोंदिया भंडारा धुले आणि यवतमाळ जिल्ह्यात थंडीचा प्रभाव वाढताना दिसला गुरुवारी आणि शुक्रवारी पहाटे यवतमाळ आणि वरील जिह्यात डिग्री सेल्सियस पर्यंत घसरला होता. दरम्यान नागपुरात गुरुवार पहाटे या वर्षातील सर्वात कमी 8.8 डिग्री सेल्सिअस तापमान नोंद झाला.येत्या 48 ताला तासात विदर्भानी उत्तर महाराष्ट्रात थंडीत वाढ होऊ शकते असा अंदाजी हवामान खात्याने वर्तविला आहे.
उत्तर भारतात कडाक्याची थंड.
सध्या जम्मू काश्मीर हिमालय क्षेत्र आणि शिमला मध्ये बर्फबारी सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण उत्तर भारत कडाक्याच्या थंडीत सापडला आहे. दिल्ली, नोएडा आणि उत्तर प्रदेश मधील अनेक शहरे धूक्याच्या चादरीखाली गेले आहे. दिल्लीमध्ये सकाळ,संध्याकाळ पर्यंत दाट धुके आहे.त्यामुळे दिल्लीत 3 फूट पर्यंत नॉनविजिबिलिटी असल्याने वाहतूक विभाग दिल्लीमध्ये ट्रॅफिक संचालन करताना अपघातांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करीत आहे. पुढील दिवसात दिल्ली आणि उत्तर भारतात अशीच कडाक्याची थंड पडणार असल्याचा अंदाज राष्ट्रीय हवामान खात्याने वर्तविले आहे.