Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत; शहांचा आदेश अन् आमदार, कार्यकर्ते सक्रीय.

Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत; शहांचा आदेश अन् आमदार, कार्यकर्ते सक्रीय.

Maharashtra Vidhan Sabha आणि गुजरातची भाजप टीम राज्यात सक्रिय.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान महाराष्ट्रात विधानसभा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप हायकमांड कडून निवडणूक रणनीती आखण्याची सुरुवात करण्यात आली आहे.मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला झालेला लोकसभा जागांचा नुकसान तसेच महायुतीचा मोठा पराभव पाहता भाजपचे राष्ट्रीय नेते आता विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत आहेत.यासाठी पंतप्रधान मोदी आणि भाजपमध्ये चाणक्य मानले जाणारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रातील निवडणुकांसाठी यांनी राज्यासाठी वेगळे निवडणूक प्लान तयार केल्याचे दिसते.

येणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्राच्या भाजप नेत्यांना सोबत घेवून गुजरात भाजपच्या विशेष टीम कडून या निवडणूकीसाठी रणनीती आखण्यात येत आहे.मागील काही महिन्यापासून महाराष्ट्रात भाजपवरिष्ठ नेत्यांच्या देखरेखित पक्षाचे राजकीय धोरण आखण्यात येत आहे. विधानसभेत झालेल्या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये,आणि महाराष्ट्रात पुन्हा आपले पाय रोवण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे हे लक्षात घेऊन  महाराष्ट्रात भाजपकडून जोर लावला आहे.

भाजप नेते लागले कामाला.

येणाऱ्या निवडणुकीत महाराष्ट्रात एकहाती सत्ता काबीज करण्याचे स्वप्न पाहत भाजपकडून यंदा गुजरात भाजप नेत्यांची व तेथील कार्यरत पक्ष स्तरावरील निवडणूक यंत्रणांची मदत घेतली जाणार आहे.याकरिता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रणनीती तयार करीत कामाला लागण्याचे आदेश भाजप नेत्यांना दिले असल्याने राज्यात आता आमदार आणि कार्यकर्ते सक्रीय दिसत आहे.

गुजरातची स्पेशल टीम महाराष्ट्रात सक्रिय.

महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी गुजरात भाजपची स्पेशल टीम सक्रीय झाली आहे.यासाठी गुजरातमधील भाजपचे आजी माजी आमदारांसह पक्ष पदाधिकाऱ्यांची टीम नाशिकमध्ये गुरुवारी दाखल झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विश्वसनीय गोटातील गुजरातचे आमदार आणि कार्यकर्ते त्यांच्या आदेशावरून निवडणुकीसाठी राज्यात सक्रीय झाले आहेत. या स्पेशल टीमकडून उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघ संबंधात आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये बैठक घेण्यात आली.यात उत्तर महाराष्ट्रातील 48  विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेण्याची सुरुवात झाली आहे.

संविधान विरोधी प्रचाराला खोडून काढणार.

लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी भाजपला संविधान विरोधी दाखवून आणि संविधान बदलणार असल्याची आशंका निर्माण करून प्रचार  केला.त्यामुळे भाजपला मोठा नुकसान झाल्याचा निष्कर्ष नंतर भाजप नेत्यांनी काढला असल्याचे दिसते,त्यामुळे महाराष्ट्रात होऊ घेतलेल्या निवडणुकीत या मुद्द्याला कसं खोडून काढायचं याची रणनीती गुजरात भाजप टीमकडून बनवली जात आहे.यासाठी महाराष्ट्रात भाजपच्या कार्यकर्त्यांना गुजरातची ही  टीम मार्गदर्शन करीत आहे.या संबंधात माहिती भाजपचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी यांनी सुद्धा दिली आहे.

यवतमाळ मध्ये मध्यप्रदेशचे मंत्री प्रल्हाद पटेल निवडणूक प्रभारी.

विशेष म्हणजे महाराष्ट्रात होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी गुजरात भाजप टीम सोबतच मध्यप्रदेशचे भाजप सरकारातील मंत्री आणि भाजप नेत्यांची सुद्धा महाराष्ट्रात मदत घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याचे संकेत गुरुवारी यवतमाळ येथे भाजप पक्षाच्या बैठकित दिसले.यात मध्यप्रदेशचे भाजप नेते व तेथील मंत्री प्रल्हाद पटेल हे पक्ष बैठकीत हजर होते. विशेष म्हणजे मध्यप्रदेशचे मंत्री पटेल यांना यवतमाळ जिल्हा भाजपसाठी निवडणूक प्रभारी म्हणून नेमण्यात आले आहे.त्यांच्या हजेरीत गुरुवारी यवतमाळ येथे भाजपची बैठक झाली.दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मध्यप्रदेश आणि गुजरातचे नेते आणि त्यांची टीम सक्रिय राहणार असून.सर्व मतदारसंघात भाजपची स्थिती आणि संघटन यावर विचार मंथन तसेच जमिनीस्तरावर ग्रामीण भागात भाजपची स्थिती कशी आहे यावर चर्चा करण्यात येत आहे.अशी माहिती सूत्रांनी दिली

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

6 + thirteen =