Maharashtra Teachers : राज्य शिक्षण संचालक विभागाकडून मुंबई विभागातील तब्बल 6500 शिक्षकांना आता त्यांच्या विविध थकीत बिलांची 56 कोटींची रक्कम लवकरच बैंक खात्यात जमा होणार आहे. यासाठी शिक्षण संचालकाकडे नुकतेच एकूण 56 कोटींची सप्लीमेंट बिले मंजुरीसाठी पाठविण्यात आलेली आहे.
याला लवकरच मंजूर मिळून शिक्षकांचा हा प्रश्न मार्गी लागणार आहे.यामुळे दीर्घ काळापासून आपल्या बिलांची रक्कम मिळणारी याची वाट पाहणाऱ्या हजारो शिक्षकांना लवकरच आर्थिक लाभ मिळणार आहे. {Pending Bills Of Teachers In Maharashtra}
गेल्या अनेक महिन्यापासून मुंबई शिक्षण विभागात सामील असलेल्या ठाणे,पालघर,रायगड. दक्षिण आणि पश्चिम मुंबई विभागातील तब्बल साडेसहा हजार शिक्षकांना त्यांच्या विविध बिल आणि भत्ते थकीत असल्याने याचे बिल आता शिक्षण संचालकांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आले आहे.{Divisional Education Directors Mumbai Division}.
या विभागात शिक्षकांची तब्बल 56 कोटी पेक्षा अधिक थकीत बिलांचे रक्कम प्रलंबित आहे. शिक्षण संचालकांची मंजुरी मिळताच ही रक्कम शिक्षकांच्या बँक खात्यात जमा होईल.उल्लेखनीय म्हणजे मुंबई मुख्याध्यापक संघटना उत्तर विभाग चे अध्यक्ष आणि प्रदेश कार्यकारिणींमध्ये निमंत्रित सदस्य असलेले अनिल बोरणारे यांनी यासंदर्भात सरकारकडे पाठपुरावा केल्याने आता ही कारवाई होत असल्याचे बोलले जात आहे.
शिक्षण संचालक कार्यालयाला 56 कोटींची सप्लीमेंट बिले मंजुरीसाठी पाठविली.
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नुकतेच राज्याचे शिक्षण संचालक आणि त्यांच्या कार्यालयाकडे या विभागातील शिक्षकांच्या कोट्यावधी रुपयांच्या या थकीत बिलासंदर्भात निधीची मंजुरी मिळावी यासाठी प्रस्ताव आणि सप्लीमेंट बिले मंजुरीसाठी पाठविली आलेले आहे.
शिक्षकांना त्यांच्या थकीत बिलांची रक्कम तात्काळ देण्यात यावी,यासाठी मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष अनिल बोरनारे यांनी उत्तर पश्चिम आणि दक्षिण शिक्षक निरीक्षक कार्यालयातील वेतन पथक अधीक्षक सोबतच पालघर रायगड ठाणे जिल्ह्यातील शिक्षण निरीक्षक कार्यालयामधील अधीक्षकांकडे शिक्षकांची ही मागणी लावून धरली होती.
सोबतच बोलनारे यांनी नुकतेच मुंबई विभाग शिक्षण संचालक संदीप संघवी यांची भेट घेत विभागातील शिक्षकांच्या पेंडिंग बिलाना मंजुरी द्यावी आणि या विभागात अधिक कर्मचारी उपलब्ध करून शिक्षण विभागाचे काम वेळेत पूर्ण करावे,अनेक वर्षांपासून थकित असलेले शिक्षकांचे बिल अदा करण्यात यावे,यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते.
यादरम्यान शिक्षक उपसंचालक कार्यालयाकडून थकीत बिलांची निधीला मंजुरी शिक्षण संचालकाकडून देण्यात येत असल्याने यासाठी रीतसर कारवाईसाठी संबंधित कार्यालयात Supplementary Bills मंजुरीसाठी पाठविण्यात आले असल्याचा लेखी पत्र बोलनारे यांना देण्यात आला.त्यामुळे आता या बिलांना तात्काळ मंजुरी मिळून शिक्षकांना आपल्या थकीत बिलांची रक्कम मिळणार आहे.
Maharashtra Teachers : शिक्षकांना माराव्या लागतात शिक्षण विभागाच्या चकरा.
उल्लेखनीय म्हणजे मुंबई शिक्षणविभागात आणि उर्वरित महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात वरिष्ठ वेतन श्रेणी,शिक्षक निवड श्रेणी,शिक्षण सेवक कालावधी,आणि नियमित वेतन खंड यासह शिक्षकांचे अनेक प्रकरणातील थकित बिले अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.तर दुसरीकडे संबंधित शिक्षकांना आपले थकीत बिल मिळविण्यासाठी शिक्षण विभागाच्या कार्यालयात चकरा माराव्या लागतात.
मात्र तेथे विनाकारण त्रुटी दाखवून त्यात त्रुटी दाखवून त्यांची पूर्तता करा असे सांगून पुन्हा असे बिल्स शाळेकडेपरत पाठविले जातात.त्यामुळे शिक्षकांना आपला काम करताना विनाकारण हा मनस्ताप सहन करावा लागतो,असे शिक्षकांची तक्रार असते.{Teachers Pending Bills}हे लक्षात घेता संघटनेचे अनिल बोरमारे यांनी यासंदर्भात लक्ष घालून आता शिक्षण संचालक विभागाकडे पाठपुरावा केल्याने शिक्षकांचा प्रलंबित थकीत बिलांचा प्रश्न मार्गी लागताना दिसत आहे.
मुंबई आणि विभागात जिल्हावार शिक्षक संख्या आणि थकीत बिलांची रक्कम.{Primary And Secondary Teachers}
मुंबई दक्षिण विभाग
1हजार 815 शिक्षक-शिक्षकेतरांची 14 कोटी 16 लाख 89 हजार 127 रुपये.
मुंबई पश्चिम विभाग
698 शिक्षक- शिक्षकेतरांची थकीत रकम 4 कोटी 21 लाख 469 रुपये
मुंबई उत्तर विभाग
1 हजार 700 शिक्षक-शिक्षकेतरांची थकीत रकम 19 कोटी रुपये.
ठाणे जिल्हा प्राथमिक
689 शिक्षक-शिक्षकेतरांची थकीत रकम 6 कोटी 38 लाख 20 हजार 129 रुपये.
ठाणे जिल्हा माध्यमिक
666 शिक्षक-शिक्षकेतरांची थकीत रकम 5 कोटी 32 लाख 67 हजार 229 रुपये.
पालघर जिल्हा माध्यमिक
463 शिक्षक-शिक्षकेतरांची थकीत रकम 7 कोटी 28 लाख 95 हजार 188 रुपये.
रायगड जिल्हा माध्यमिक
676 शिक्षक-शिक्षकेतरांची थकीत रकम 67 लाख 11 हजार 307 रुपये.