Maharashtra Teachers Recruitment Advertisement 2025 : महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदभरतीला मिळाली मुदतवाढ !

Maharashtra Teachers Recruitment Advertisement 2025 : महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी राज्य सरकारने महत्त्वाची वार्ता दिलेली आहे.महाराष्ट्र सरकारने शिक्षक पद भरतीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढविली आहे.(Maharashtra Teachers Recruitment Advertisement).

सरकारने महाराष्ट्रातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनांकडून सुरू असलेल्या अनुदानित शाळांमध्ये रिक्त पदांवर शिक्षक नियुक्तीसाठी सरकारच्या शिक्षक भरतीसाठी असलेल्या “पवित्र पोर्टल”या कंप्यूटर सिस्टम द्वारे शिक्षक नियुक्ती जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी 20 फेब्रुवारी 2025 पर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सरकारने या संदर्भात नुकतेच निर्णय घेतला असून या प्रक्रिया अंतर्गत सरकारी शाळांमध्ये आणि अनुदानित खाजगी शाळांमध्ये राज्यात दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक पदांसाठी नियुक्ती प्रक्रियेत योग्य उमेदवारांची निवड होणार आहे.

या शिक्षक पद भरतीसंदर्भात इच्छुक शिक्षक उमेदवाराना आणि शाळा व्यवस्थापन योग्य माहिती,आणि यासाठी कसा अर्ज करावा लागेल,या संदर्भात खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून माहिती घेऊ शकतात.
https://edustaff.maharashtra.gov.in/pavitra/users/login?link=5/

  • महाराष्ट्रात शिक्षकांसाठी आवश्यक असलेली TET परीक्षा 2022 मध्ये आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रात 22 फेब्रुवारी ते 3 मार्च 2023 कालावधीत ही TET टेस्ट परीक्षा योग्यताधारक आणि शिक्षक पदावर नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवारांनी दिली होती.
  • संपूर्ण महाराष्ट्रातून 2 लाख 29 हजार 670 इच्छुक उमेदवारांनी TET (टीईटी) परीक्षा दिली होती.
  • त्यात दोन लाख 16 हजार 443 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.
  • यानंतर 1231 उमेदवारांनी रि – सर्टिफिकेशन प्रोसेस पूर्ण केलेली आहे.

आता वरील चाचणी द्वारे शिक्षकांना TET मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर सरकारी शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावी इयत्तेपर्यंतच्या शिक्षक नियुक्तीसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यात शिक्षक नियुक्ती आणि निवड प्रक्रिया सुरू आहे.

राज्यात पवित्र पोर्टल माध्यमातून (महाराष्ट्र टीचर्स रिक्रुटमेंट 2025) मध्ये दुसऱ्या टप्प्यात ही प्रक्रिया सुरू आहे. आता शिक्षण आयुक्तालयाने पुन्हा एकदा शिक्षक पदांच्या नियुक्तीसाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता टेस्ट अर्थातच टीईटी घेण्याचा प्रस्ताव नुकतेच महाराष्ट्र शासनाकडे पाठविलेला आहे.{TET EXAMS} त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता मिळतात राज्य परीक्षा परिषदेकडून पुढे टीईटी परीक्षा घेण्याची प्रक्रिया होईल.

महाराष्ट्रात सरकारी शाळांमध्ये आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक रिक्त पदांसाठी भरतीप्रक्रिया शासनाच्या पवित्र पोर्टल द्वारे राबविणत येणार आहे.{PAVITRA PORTAL}यासाठी आता वरील पोर्टलवर शिक्षक पदांच्या नियुक्तीची जाहिरात नोंदणी सुरू करण्यात आलेली.पुढील काही महिन्यात शिक्षक भरतीची ही प्रक्रिया पूर्ण करून शासनाकडून शैक्षणिक वर्ष 2026 27 साठी शाळांमध्ये नवीन शिक्षक उपलब्ध करून देणार आहे.यासाठी शिक्षण मंत्रालय प्रयत्न करीत आहे.

दरम्यान शासनाच्या प्रवित्र पोर्टल मार्फत होणाऱ्या शिक्षक पद भरती प्रक्रियेसाठी शिक्षकांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे आणि यासाठी इतर पात्रता आवश्यक करण्यात आलेली आहे.यासाठीच आता परीक्षा परिषदेने सरकारला प्रस्ताव सादर केलेला आहे.

Maharashtra Teachers Recruitment Advertisement 2025 : पहिल्या टप्प्यात 21 हजार 678 अधिक पदांवर शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण.

परीक्षा परिषदेकडून यापूर्वी टीईटी परीक्षा आयोजित झाल्यानंतर सरकारकडून सरकारी शाळांसाठी रिक्त शिक्षक पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.{TET EXAM Passed Teachers}जानेवारी 2024 मध्ये यासाठी जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या होत्या.या पदभरती प्रक्रिया दरम्यान 21 हजार 678 शिक्षकांचे रिक्त पदांवर भरती पूर्ण करण्यात आलेली आहे.

  • आता राज्यात दुसऱ्या टप्प्यात रिक्त पदांवर शिक्षक पद भरती प्रक्रिया 20 जानेवारी 2025 पासून पवित्र पोर्टल वर सरकारी आणि अनुदानित शाळा मॅनेजमेंट जाहिराती प्रसिद्ध करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आलेली आहे.यासाठी मुदतवाढ मिळाली आहे.
  • दरम्यान 13 फेब्रुवारी पर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील विविध भाषा माध्यमातील तब्बल 619 शिक्षण संस्थांनी आपल्या शाळेतील विविध इयत्तेसाठी रिक्त शिक्षक पद नियुक्तीसाठी 671 शिक्षक पद भरती जाहिराती पवित्र पोर्टल वर नोंद केल्या.
  • शिक्षण विभागाकडून विविध शाळांमधील रिक्त शिक्षक पदांना भरण्यासाठी संबंधित शिक्षण संस्थांनी सरकारी पवित्र पोर्टलवर निर्धारित वेळेत पद भरती जाहिरात नोंदविण्याची कारवाई करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आलेली आहे.
  • शिक्षण संस्थांना पोर्टलवर आपल्या शाळेत शिक्षक पद भरतीसाठी आवश्यक असलेली माहिती नमूद करून ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. शिक्षण संस्थांना आपल्या जाहिराती प्रसिद्ध करताना काहीही तांत्रिक अडचणी आल्यास शिक्षण विभागासोबत ते संपर्क करू शकतात.

शिक्षक पद भरती पारदर्शक आणि ऑनलाइन पद्धतीने करण्यावर जोर.

राज्यात दुसऱ्या टप्प्यात होऊ घातलेल्या सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती अधिक पारदर्शीपणे आणि कॉम्प्युटर ऑनलाईन पद्धतीने पार पाडावी यासाठी सरकारने शिक्षण विभागाला निर्देश दिलेले आहे. यामुळे शाळांमध्ये रिक्त शिक्षकांची पदे भरण्यासाठी प्रक्रिया जलद गतीने होण्यास मदत मिळेल. आता सरकारने शाळांमध्ये शिक्षक पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठी शाळा व्यवस्थापनांना 20 जानेवारी पर्यंत मुदत वाढ दिलेली आहे.

मात्र राज्यात अद्यापही अनेक स्थानिक स्वराज्य संस्था,आणि प्रायव्हेट शिक्षण संस्था व्यवस्थापनाकडून फार कमी प्रमाणात आपल्या शाळांमध्ये शिक्षक पद भरतीसाठी पवित्र पोर्टलवर जाहिराती नमूद करण्यात आल्याचे शिक्षण विभागाचे निदर्शनास आलेले आहे.(Pavitra Portal Log In For Teacher Recruitment)त्यामुळे पवित्र पोर्टलवर शिक्षक अधिक पदांच्या भरतीसाठी आवश्यक कारवाई निर्धारित वेळेत शाळा व्यवस्थापनांनी पूर्ण करावी, असे निर्देश शिक्षण आयुक्तालयाने दिले आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.