Maharashtra Schools: विद्यार्थ्यांचा सामान्य शनिवार होणार “आनंददायी शनिवार.”

Maharashtra Schools: विद्यार्थ्यांचा सामान्य शनिवार होणार “आनंददायी शनिवार.”

Maharashtra Schools: आतापासून शालेय विद्यार्थ्यांचा प्रत्येक शनिवार हा आनंददायी शनिवार होणार आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये ”आनंददायी शनिवार” हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सवयी, सहकार्य वृत्ती, नेतृत्व गुणांचा विकास व्हावा, या उद्देशाला हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना यामध्ये समावेश करण्यात आला आहे. सोबतच शालेय शिक्षण विभागाकडून परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य जपले जावे, त्यांचा अभ्यास ही चांगला होणार, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

“आनंददायी शनिवार” या उपक्रमात कोणत्या गोष्टींचा असणार समावेश?
– यामध्ये प्राणायाम, योग, ध्यानधारणा यांचा समावेश असणार आहे.
– आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उपाय योजना राबवल्या जाणार आहे.

– विविध खेळांवर आधारित उपक्रम राबवल्या जाणार.
– आपत्ती व्यवस्थापनाची मूलतत्त्वे आणि व्यवहारी प्रशिक्षण घेतल्या जाणार.
– रस्ते सुरक्षा आणि समस्या निराकरणाची तंत्रे विद्यार्थ्यांना शिकवण्यात येणार.

सध्याच्या शिक्षण धावपळीच्या काळात लहान वयात विद्यार्थ्यांना ताण तणाव, उदासीनता, नैराशय या मानसिक विकारांना सामोरे जावे लागत आहे. या अनुषंगाने “आनंददायी शनिवार” हा उपक्रम राज्य मंडळाच्या वतीने सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची रुची वाढवण्यासाठी तसेच त्यांच्या गुणवत्तेवर चांगला परिणाम होण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण कमी होण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत असल्याची माहिती शासनाने जाहीर केली आहे.

या उपक्रमाचा उद्देश खालील प्रमाणे आहे –
– शालेय स्तरावर ताण-तणावाची व्यवस्थापन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनवणे.
– विद्यार्थ्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित करणे.
– विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक, भावनिक कौशल्य विकसित करणे.

– विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी खेळीमेळीच्या वातावरणातून निर्माण करणे.
– विद्यार्थ्यांचे मानसिक स्वास्थ्य उत्तम राखणे.
– कृती, खेळ यावर आधारित उपक्रम राबविणे.

– जागरूकता वर आधारित कृती व उपक्रम कारणे.
– नातेसंबंध हाताळण्याचे कौशल्य विकसित करणे.
– समस्या निराकारणाची कौशल्य शिकणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

two × 3 =