Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक.
Maharashtra Rain Update : राज्यात सरासरीच्या १२३ टक्के पाऊस; पेरण्याही समाधानकारक.
राज्यात सरासरीच्या १२३.२ टक्के पाऊस झाला असून पेरण्या देखील समाधानकारक झाल्या आहेत. राज्यात पावसाच्या संदर्भात आज बुधवार 24 रोजी कृषी विभागाने मंत्रिमंडळ बैठकीत पाऊस व पीक पेरण्यांची माहिती सादर केली.या माहितीनुसार राज्यात २२ जुलैपर्यंत ५४५ मि.मी. पाऊस पडला आहे. मागील वर्षी याच सुमारास ४२२ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ९५.४ टक्के पाऊस झाला होता.
राज्यात खरीपाचे ऊस वगळून १४२.२ लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १२८.९४ लाख हेक्टर क्षेत्रावर (९१ टक्के) पेरणी झाली आहे. भात व नाचणी पिकाची पुर्नलागवड कामे सुरु असून ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन,तूर,उडीद, मूग, भुईमूग आणि कापसाच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आहेत. राज्यात शेतीसाठी खत आणि बियाणांची पुरेशी उपलब्धता आहे.
एवढं पाणी साठा,आणि टँकरनेही गाव,तांड्याना पाणीपुरवठा.
सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये ३९.१७ टक्के पाणी साठा असून गेल्या वर्षी याच सुमारास ४३.६५ टक्के पाणी साठा होता. सर्वात कमी म्हणजे १२.१३ टक्के पाणी साठा छत्रपती संभाजीनगर येथे तसेच २८.३४ टक्के नाशिक येथे आहे. विशेष म्हणजे राज्यातील १ हजार २१ गावे आणि २ हजार ५१८ वाड्यांना १ हजार ३६५ टँकर्सद्धारे पाणीपुरवठा सुरु आहे. टँकर्सची संख्या ३२६ ने वाढली आहे.