Maharashtra New Cabinet Ministers :अमित शहा यांचे काय आहे आदेश,आणि का मिळणार शिवसेनेच्या या तीन आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू ?
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असून शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्री पद मिळाले असून नव्या कॅबिनेट मध्ये मोठ्या प्रमाणात कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद मिळणार आहे.मात्र महाराष्ट्रात सत्ता स्थापनेत भाजप दिल्ली हाय कमांडची भूमिका महत्त्वाची ठरताना दिसत आहे.
भाजपचे दिग्गज नेते आणि भाजपमध्ये चाणक्य मानले जाणारे अमित शाह यांच्या आदेशाने महाराष्ट्रात क्लीन अँड क्लिअर लोकांचे मंत्रिमंडळात समावेश करण्याच्या सूचना आहेत. त्यामुळे या पूर्वी महायुती सरकारात मंत्री राहिलेले आणि यंदा निवडून आलेल्या तीन आमदारांना मंत्रीपदा पासून वगळण्यात येणार असून या तिघांना नक्कीच डच्चू मिळणार आहे,अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहेत पाहूया कोण आहेत ते शिवसेना एकनाथ शिंदे चे तीन आमदार.
यापूर्वी महाराष्ट्रातील महायुती सरकारात मंत्री असताना ज्या मंत्र्यांनी राजकीय आणि सामाजिक स्तरावर वादग्रस्त अशी वक्तव्य आणि ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आणि नैतिक आचरण संबंधात आरोप लागले आहेत, असे आमदारांचा नव्या मंत्रिमंडळात समावेश होणार नाही अशी माहिती समोर आली आहे. राज्यात नवे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री मिळाल्यानंतर कॅबिनेट स्थापनेच्या हालचालीला वेग मिळाला आहे मात्र या नव्या मंत्रिमंडळात युवा आमदारांचा समावेश करताना वादग्रस्त ठरलेले आमदारांना आणि पूर्वीच्या मंत्र्यांना नव्या मंत्रिमंडळात समावेश होऊ नये याची दक्षता घेण्यात येत आहेत.त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात तीन लोकांना मंत्रिपद मिळणार नाही ही दाट शक्यता आहे,यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे नेते अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि तानाजी सावंत यांचा नाव वगळण्यात येणार असल्याची शक्यता अमित शहा यांच्या आदेशामुळे निर्माण झाली आहे.
गुरुवारी महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री म्हणून क्रमशः देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी आणि काही मंत्र्यांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे.यानंतर संपूर्ण कॅबिनेट मध्ये महायुती मधील तिन्ही पक्षांमधील नेते आणि आमदारांना मंत्री पद आणि त्यांना खाते देण्यासाठी हालचाली वाढल्या आहेत.पण महायुती 2.0 च्या नव्या मंत्रिमंडळात यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य,विधाने आणि यापूर्वीच्या मंत्रिमंडळात ज्या मंत्र्यांवर भ्रष्ट्राचाराचे आरोप लागले अशा माजी मंत्र्यांना कॅबिनेट किंवा राज्यमंत्री सुद्धा मिळणार नाही.
याचे मुख्य कारण म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महायुतीच्या नेत्यांना नव्या मंत्री मंडळात भ्रष्टाचाराचे आरोप असणाऱ्या माजी मंत्र्यांचा समावेश न करण्याचे आदेश दिले आहेत.अशी माहिती राजकीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात शिवसेनेचे 3 माजी मंत्र्यांचा पुन्हा समावेश न करता त्यांना महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांकडून डच्चू मिळणे नक्की झाले आहे. विशेष म्हणजे हे तिन्ही माजी मंत्री मुंबई येथे ठाण मांडून कॅबिनेट मध्ये समावेश व्हावा यासाठी ऑटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे.
हे आहेत तीन माजी मंत्री,ज्यांना मिळू शकतो डच्चू?.
# संजय राठोड- हे महायुती सरकार आणि त्यापूर्वीच्या सरकारला कॅबिनेट मंत्री म्हणून राहिले आहेत. त्यांनी यापूर्वी अन्न औषध प्रशासन मंत्री आणि जलसंधारण मंत्री म्हणून खाते सांभाळले आहे.मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना संजय राठोड यांच्यावर व्यक्तिगत अनैतिक आचरणाचे आरोप लागले होते. त्यांच्या मतदार संघाच्या बाहेरील मात्र बंजारा समाजातील असलेल्या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात त्यांचे नाव अख्या राज्यात गाजले होते. त्यांच्यावर लागलेल्या या गंभीर आरोपांमुळे महाविकास आघाडी सरकारात मंत्री पदावरून त्यांना राजीनामा द्यावा लागला होता.
#अब्दूल सत्तार – पूर्वाश्रमीची शिवसेनेत असलेले अब्दुल सत्तार हे एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले होते. एकनाथ शिंदे गटाला शिवसेना पक्ष अधिकृतपणे मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांना राज्याचे कृषिमंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री हे दोन खाते देण्यात आले.मात्र अब्दुल सत्तार यांच्यावर मंत्री असताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचे खूप आरोप झाले. याव्यतिरिक्त त्यांनी विविध वेळी वादग्रस्त अशी विधाने करून स्वतःला चर्चेत ठेवण्यासाठी आटापिटा लावला होता. सत्तार यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी सरकारकडून समिती सुद्धा नेमण्यात आली होती.
#तानाजी सावंत – हे शिवसेना एकनाथ शिंदे गटातील मोठे नेते मानले जातात. साखर आणि शिक्षण सम्राट म्हणून त्यांची ओळख आहे. महाविकास आघाडी आणि महायुती सरकारात त्यांनी मंत्री म्हणून पद सांभाळला आहे. दोन्ही सरकारात मंत्रिमंडळात असताना तानाजी सावंत यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप लागले होते. महायुती सरकार सावंत हे आरोग्य मंत्री होते तेव्हा त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लागले,याव्यतिरिक्त शिवसेना संघटनात्मक कामकाजात त्यांच्याविरुद्ध पक्षातील अनेक लोकांनी तत्कालीन मुख्यमंत्री आणि पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी केली आहेत.
त्यामुळे या तीन माजी मंत्री यांचे वादग्रस्त कामकाज पाहता आणि या संदर्भात अमित शाह यांचे आदेश पाहता नव्या मंत्रिमंडळात त्यांचा समावेश होण्यावर आता प्रश्नचिन्ह लागलेले आहे.