Maharashtra Government Employees Dearness Allowance : महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ सरकारने केली जाहीर!

Maharashtra Government Employees Dearness Allowance : गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आपल्या विविध भत्त्यात वाढ केव्हा  होते याची आतुरतेने वाट पाहत होते, महाराष्ट्र सरकारने ही प्रतीक्षा आता दूर केलेली आहे. नुकतेच राज्य सरकारने विशेष आदेश जारी करून महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ जाहीर केलेली आहे.{Dearness Allowance 3 % Increase} यामुळे शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.

कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ आता पाचव्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित बेसिक वेतन श्रेणीनुसार लागू करण्यात येईल.महागाई भत्त्याची 3टक्क्यांची वाढ ही एक जुलै 2024 असे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होऊन शासकीय कर्मचाऱ्यांना आता वाढीव महागाई भत्ता मिळणार आहे.1 जुलै 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंत ज्या कर्मचाऱ्यांची व  भत्यांसह जी वेतन थकबाकी आहे, ती आता फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत सरकार अदा करेल.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या Dearness Allowance मध्ये 3 टक्क्यांची वाढ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे.यासाठी महाराष्ट्र सरकारकडून सरकारी निर्णय  घेण्यात आलेला आहे.

Maharashtra Government Employees Dearness Allowance : महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना वाढीव भत्त्याचा लाभ मिळेल. 

उल्लेखनीय म्हणजे केंद्र सरकारकडून नुकतेच आठव्या वेतन आयोगाच्या  स्थापनेला मंजुरी दिली आहे.सोबतच केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मागील महिन्यातच 3 टक्के महागाई भत्त्याची वाढ केलेली होती,यादरम्यान देशातील इतर राज्यांमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसाठी  महागाई भत्ता वाढीचे घोषणा करून ती लागू झाली होती.

तर दुसरीकडे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी गेल्या अनेक दिवसांपासून महागाई भत्त्यात वाढ  करण्याची मागणी करीत होते.दरम्यान आता महाराष्ट्र सरकारने या संदर्भात महत्वाचे पाऊल उचलून कर्मचाऱ्यांचे मागणीला प्रतिसाद म्हणून आता DA मध्ये 3 टक्क्यांची वाढ घोषित केलेली आहे.

त्यामुळे आता महाराष्ट्रातील शासकीय कर्मचाऱ्यांचा सुधारित महागाई भत्ता 50 टक्क्यांवरून 53 टक्के झालेला आहे.राज्य सरकारच्या या घोषणेचा फायदा महाराष्ट्रातील 17 लाख राज्य  सरकारी  कर्मचाऱ्यांना होणार आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांची महागाई भत्त्यात वाढ करीत असताना राज्य सरकारने याचा खर्च वार्षिक अर्थसंकल्पातून करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी संघटनांनी सरकारच्या या महागाई भत्तेवर निर्णयाचा उत्साहाने स्वागत केलेला आहे. 

  • मंगळवारी, महाराष्ट्र सरकारने 1 जुलै 2024 पासून लागू होणाऱ्या 5 व्या वेतन आयोगाच्या अपरिवर्तित वेतनश्रेणी अंतर्गत आपल्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता (DA) मध्ये  12 टक्के वाढ जाहीर केली.
  • सरकारी ठराव (GR) मध्ये नमूद केल्याप्रमाणे 443 टक्क्यांवरून 455 टक्क्यांपर्यंत सुधारित केलेला DA 1 जुलै 2024 आणि 31 जानेवारी 2025 या कालावधीतील थकबाकीसह, फेब्रुवारी 2025 च्या पगारासह रोखीने अदा केला जाईल,
  • या वाढीमुळे महाराष्ट्र सरकारच्या  अखत्यारित काम करीत असलेल्या विविध विभागातील सुमारे 17 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.
  • नव्या शासकीय निर्णयानुसार कर्मचाऱ्यांना  वाढीव महागाई भत्ता लाभ आणि थकीत वेतन भत्ते वितरणासाठी राज्यात कर्मचारी वेतन भत्तेसाठी  स्थापित मार्गदर्शक तत्त्वे आणि तरतुदींचे पालन करणे सुरू राहील.

राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा 

राज्य सरकारी कर्मचारी  दीर्घ कालावधीपासून महागाई भत्ते वाढ लागू करण्याची मागणी करीत होते.आता राज्य सरकारने 3 टक्के महागाई भत्ता वाढ केल्याने,शासकीय कर्मचाऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा होऊनच महागाई  दरवाढीचा सामना करणे सुलभ होणार आहे. यामुळे राज्य  सरकारचा कामकाज गतिमान होण्यास आणि राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा कर्मचारी संघटनांनी वर्तवली आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचाऱ्यांना  वेतनासह वाढीव महागाई भत्त्याची  रक्कम अदा करणार

दरम्यान महाराष्ट्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तीन टक्के वाढीचा निर्णय घेतल्यानंतर  राज्याच्या वित्त विभागाकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे.{State Finance Department}.या विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र सरकारने महागाई भत्ता 3 टक्के  वाढविण्याचा निर्णय घेताना याचा लाभ महाराष्ट्रातील 17 लाख शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याची माहिती दिलेली आहे.राज्य सरकारच्या या निर्णयानुसार आता 1जुलै 2024 पासून  पूर्वलक्षी प्रभावाने कर्मचाऱ्यांना  वेतनासह वाढीव महागाई भत्त्याची  रक्कम अदा करण्यात येणार आहे.

सरकारी निर्णयानुसार राज्यात कर्मचाऱ्यांना DA वितरण नियमित प्रक्रियेनुसार सुरू राहणार आहे.या शिवाय सुधारित महागाई भत्त्यावर होणारा खर्च कर्मचाऱ्यांच्या संबंधित वेतन प्रणाली आणि भत्त्यांसाठी राज्य सरकारच्या बजेट 2025 मध्ये केलेल्या तरतुदी मधून पूर्ण केले जाईल.

राज्यात अनुदानित शासकीय संस्था आणि जिल्हा परिषदेच्या  कर्मचाऱ्यांवर वाढीव महागाई भत्ता खर्च पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारच्या आर्थिक मदतीसाठी नोंदणी केलेल्या उपशीर्षक अंतर्गत सरकारकडे निधीची मागणी नोंदविण्यात येईल.राज्य सरकारच्या या महागाई भत्ता  वाढीचा निर्णय आता शासकीय कर्मचाऱ्यांना आर्थिक सुरक्षा देऊन त्यांच्या राहणीमानात सुधारणा करेल अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty − 8 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.