Maharashtra BJP : मंत्री पदासाठी भाजपची जम्बो यादी, कुणाची मंत्रिपदावर वर्णी लागणार ?
महाराष्ट्रात महायुती 2.0 सरकार अस्तित्वात आले आहे राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री पदाची एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांनी शपथ घेतली आहे. आता यानंतर महाराष्ट्राचा नवा कॅबिनेट कसा राहणार आणि कुणाकडे कोणते खाते जाणार याकडे अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे मंत्रिमंडळात आपला समावेश व्हावा यासाठी महायुती मधील अनेक आमदार आणि माजी मंत्री लॉबिंग करताना दिसत आहे.
मंत्रिमंडळात सर्वात जास्त भाजप आमदारांची वर्णी लागण्याची शक्यता आहे कारण भाजपकडे खूप आमदार आहे.त्यामुळे यंदा मंत्री होण्यासाठी इच्छुकांची खूप मोठी यादी आहे.मात्र दोन पदांसाठी भाजप आमदारांमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे आणि या दोन पदासाठी कोण बलिदान देणार आणि कुणाला संधी मिळावी यावर भाजप नेत्यांचे काथ्याकुट सुरू आहे.
या विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 132 जागा जिंकल्याने भाजप पक्षातील अनेक नवखे आमदार सुद्धा आहेt.आणि काही युवा आमदार सुद्धा मंत्रीपदी वर्णी लागावी यासाठी प्रयत्नशील आहेत. विशेष म्हणजे महायुती सरकार 1.0 मध्ये शिंदे सरकारात भाजपचे फक्त दहा मंत्री होते त्यावेळी भाजपकडे 105 जागा होत्या तर आता 132 आमदार आहेत. मागील सरकारात ज्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नव्हती, ही जुनी आमदार मंडळी पुन्हा जिंकून आल्याने आता मंत्रिपद मिळविण्यासाठी इच्छुक असल्याने जुने नाव के आणि अनुभवी मिळून भाजपची मंत्रीपदासाठी लांबलचक जम्बो यादी तयार असल्याची माहिती राजकीय सूत्रांनी दिली.
नव्या विधानसभा अध्यक्ष आणि भाजप प्रदेशाध्यक्ष वर सर्वांच्या नजरा.
एकीकडे मंत्री बनण्यासाठी भाजपकडे अनेक इच्छुक लोक आहेत तर दुसरीकडे भाजप यंदा महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष पद आपल्याकडे ठेवणार हे जवळपास निश्चित मानल्या जात आहे. तर दुसरीकडे निवडणुकीनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा निवड होणार असल्याने ज्या चंद्रकांत बावनकुळे यांच्या नेतृत्वात भाजपने महाराष्ट्रात घवघवीत यश मिळविले, त्यांचीच फेरनिवड प्रदेशाध्यक्षपदी होणार किंवा त्यांना मंत्री बनविणार वा केंद्रीय स्तरावर मोठी जबाबदारी देत त्यांच्या जागी महाराष्ट्रात नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड होणार?,यावरही सर्वांचे लागलेले आहे.भाजपमध्ये मंत्री पदासाठी लांबलचक यादी असल्याने विधानसभा अध्यक्ष पद आणि प्रदेशाध्यक्ष पदावर बसण्यासाठी सहसा कोणी तयार नाही.त्यामुळे मंत्री न बनता या दोन पदांसाठी कोण बलिदान देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आपल्या पक्षाच्या नेतृत्वात महायुती सरकार असल्याने भाजपमध्ये एकूणच मंत्रीपदी बसण्यासाठी आमदारांची रांग दिसत आहे.तर विधानसभा अध्यक्षपदासाठी भाजपमध्ये सध्या इच्छुकांची कमी आहे,त्यामुळे अनुभवी आणि ज्येष्ठ नेत्यालाच विधानसभा अध्यक्षपद दिले जाणार अशी चर्चा भाजपच्या गोटात सुरू आहे.
चंद्रकांत बावनकुळे कॅबिनेट मंत्री होणार का?.
महाराष्ट्रात चंद्रकांत बावनकुळे यांच्या नेतृत्वात मिळालेले यश पाहता त्यांना महाराष्ट्रात कॅबिनेट मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात येऊ शकते अशी एक शक्यता वर्तविण्यात येत आहे.2014 ते 2019 या कालावधीत फडणवीस मुख्यमंत्री असताना चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे ऊर्जामंत्रिपद होतं. त्यामुळे त्यांना मंत्रिपदाचा अनुभव आहे.विशेष म्हणजे बावनकुळेंचं 2019 विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नव्हती,त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष पद देण्यात आल्यानंतरच आता बावनकुळेंच्या नेतृत्त्वातच भाजपनं यंदा अभूतपूर्व अस यश मिळवलं आहे. हे पाहता आता बावनकुळे नवे विधानसभा अध्यक्ष की कॅबिनेट मंत्री किंवा पुन्हा प्रदेशाध्यक्ष बनतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत प्रदेशाध्यक्ष पदासाठी वेट अँड वॉच,तर नार्वेकर पुन्हा विस.अध्यक्ष?.
राज्यात दीर्घ काळापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाही.आता विधानसभा निवडणुका संपल्याने ओबीसी आरक्षणाचा मुद्दा न्यायालयाने निकाली काढल्यावर निवडणुका होतील किंवा यापूर्वीच निवडणूक आयोग स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घेणार हे अद्याप स्पष्ट नसले तरी,भाजपच्या गोटातून मिळालेल्या माहितीनुसार,भाजप प्रदेशाध्यक्ष पदाची निवडणूक या निवडणुकीपर्यंत टाळली जाऊ शकते.त्यामुळे चंद्रकांत बावनकुळे यांच्याकडे तोपर्यंत ही जबाबदारी राहणार असून यानंतर त्यांच्या जागी विधान परिषद सदस्य राम शिंदे किंवा आमदार आशिष शेलार यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.शेलार यापूर्वीच्या फडणवीस सरकारध्ये पाच महिनेच मंत्रीपदी राहिल्याने या सरकारात ते पहील्या फेरीत पुन्हा मंत्री होण्यासाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.दुसरीकडे विधानसभा अध्यक्षपदी बसण्यासाठी कुणीही आपले नाव रेटत नसल्याने प्रदेश भाजप नेते राहुल नार्वेकर यांच्याकडे पुन्हा विधानसभा अध्यक्ष पदाची जबाबदारी देवू शकतात अशीही एक चर्चा आहे.