Mahajyoti Free Tab Registration : महाराष्ट्रात आता राज्य सरकारने राज्यभरातील विद्यार्थ्यांना आधुनिक TAB आणि त्यासाठी मोफत INTERNET सुविधा उपलब्ध करून देण्याची सुरुवात केलेली आहे.महाराष्ट्रातील महाज्योती {महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था ‘MAHAJYOTI’} मार्फत विद्यार्थ्यांसाठी JEE,NEET,MHT-CET परीक्षांसाठी तयारी करणे सुविधाजनक व्हावे,यासाठी महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना मोफत पुरविण्याची योजना अमलात आणली आहे.
महायुती संस्थेमार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांना यातून ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वर आधारित टॅब आणि त्यासाठी लागणारे सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात येत आहे.इयत्ता11 वी सायन्स Faculty मधून अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे या शैक्षणिक सत्रात योजनेसाठी निवड झालेली आहे.नुकतेच सरकारकडून विद्यार्थ्यांसाठी योजनेची अवधी वाढवून देण्यात आली होती.
यासाठी महाराष्ट्रातील एकूण 7 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून त्यांना हे TAB देण्यासाठी निवड करण्यात आली आहे.त्यांना आता हे TAB आणि यासाठी SIM CARD वाटप करण्यात येत आहे.यातून विद्यार्थ्यांना दररोज शैक्षणिक अभ्यासासाठी 6 GB Data सुद्धा पुरविण्यात येत आहे. नाशिक मध्ये मागील आठवड्यात या योजनेतून 545 विद्यार्थ्यांना हे मिळाले होते.
TAB वाटपासाठी महाज्योती द्वारे नोंदणी
राज्यभरातील अकरावी सायन्स शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर्फे TAB वाटपासाठी महाज्योती द्वारे नोंदणी करण्यात आली होती.महाज्योतीद्वारे या विद्यार्थ्यांना सायन्स अभ्यासक्रमासाठी आणि JEE,NEET आणि MH-CET परिक्षांसाठी मार्गदर्शन करण्यात येते.
यासाठी या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येत आहेत. शैक्षणिक सत्र 2024-25 साठी महाराष्ट्रात MAHAJYOTI तर्फे 7हजार विद्यार्थ्यांची या योजनेतून नोंदणी करण्यात आली होती.यात आता TAB वाटप करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.
चांगल्या कंपनीचे TAB, त्यासाठी लागणारे सिम कार्ड तसेच सोबत दररोज इंटरनेट डाटा पुरविण्यात येत आहे.महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थातच MAHAJYOTI कडून Science Faculty मधून इयत्ता अकरावी मध्ये प्रवेश घेत बारावी सायन्स आणि पुढे या Faculty मध्ये अभ्यास करण्यासोबतच महाज्योतीद्वारे JEE,NEET आणि MH-CET परीक्षा देण्यासाठी परीक्षा पूर्व तयारी आणि ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येत आहे.
यासाठी विद्यार्थ्यांना हे TAB आणि सिम कार्ड उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.वर्ष 2024 25 शैक्षणिक सत्रात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना TAB देण्यासाठी 20 फेब्रुवारी 2025 ही नोंदणीसाठी शेवटची मुदत देण्यात आली होती.यानुसार राज्यभरात 7000 विद्यार्थ्यांची Mahajyoti द्वारे या योजनेत मोफत TAB देण्यासाठी निवड करण्यात आली.
महाराष्ट्र सरकारची महत्त्वपूर्ण शैक्षणिक मार्गदर्शन संस्था असलेल्या MAHAJYOTI द्वारे अकरावी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना JEE,एमएटी-सीईटी आणि नीट या महत्त्वाच्या परीक्षांसाठी या TAB माध्यमातूनच त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण आणि मोफत मार्गदर्शन दिले जाणार आहे.अकरावी सायन्स विद्यार्थ्यांच्या माहितीच्या प्रशिक्षण कालावधी दरम्यान इंटरनेट आणि टेक्निकल अडचणी येऊ नये यासाठी महाज्योतीने MDM सिस्टम लावून हे टॅब आणि सिम कार्ड वितरण केलेले आहे. – सुवर्णा पगारे,MAHAJYOTI DIVISIONAL COORDINATOR NASHIK
Mahajyoti Free Tab Registration : TAB ची वैशिष्ट्ये.
- महाज्योती द्वारे अकरावी सायन्स मधील विद्यार्थ्यांना जे मोफत टॅब देण्यात येत आहे,त्यातून त्या विद्यार्थ्यांना जेईई एमएचटी-सेट,निट सारख्या परीक्षेला सामोरे जाताना आधुनिक पद्धतीने अभ्यास करणे सोपे होणार आहे.
- यासाठी हे मोफत TAB पुरविण्यात येत आहे.
- त्यात एमडीएम {MDM} यंत्रणा देण्यात आली आहे.
- MDM मुळे लाभार्थी विद्यार्थ्यांना या टॅबचा वापर फक्त आपले अभ्यासापुरताच करता येईल.यामुळे विद्यार्थ्यांचा वेळ टॅबमधून इतर बाबींवर खर्च होणार नाही.नेमक्या याच कारणांनी MAHAJYOTI ने आपली एमडीएम सिस्टम या टॅब मध्ये कार्यरत केली आहे.या टॅबमधून विद्यार्थ्यांना दररोज 6 GB डाटा मिळणार आहे.
आता वेटिंग लिस्ट वर असलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून TAB मोफत देणार.
महायुतीकडून मागील आठवड्यात गुरुवार 20 फेब्रुवारी २०२५ पर्यंत नोंदणी आणि TAB देण्याची सुविधा होती यासाठी मोठ्या संख्येने अकरावी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांनी यासाठी नोंदणी केली.
आता 20 फेब्रुवारी पर्यंत ज्यांनी या योजने साठी नोंदणी करूनही TAB घेतला नाही,त्यांना TAB ची गरज नाही असे समजून,आता त्यांच्या ऐवजी शैक्षणिक सत्र 2026 शैक्षणिक सत्रात वरील परीक्षेच्या पूर्व प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या आणि वेटिंग लिस्ट वरअसलेल्या विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना महाज्योती कडून आता त्याचे वितरण होणार आहे.
Website : https://mahajyoti.org.in/en/application-for-mht-cet-jee-neet-2025-training-2/