महागाव तहसिल वर धकडला जनआंदोलनचा मशाल मोर्चा,शेतकऱ्यांसह नागरीकांच्या विविध समस्यांचे प्रशासनाला निवेदन.

*महागाव तालुका प्रतिनिधी : गजानन लांडगे*

महागाव : शेतकऱ्यांसह निराधार,शासकीय योजनांपासून वंचित नागरीकांच्या समस्या सोडविण्याच्या मागणीसाठी हजारो महिला,पुरुष शेतकरी नागरिकांनी हातात मशाली घेत जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे जगदीश नरवाडे यांच्या नेतृत्वात तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढला होता या मोर्चाने तालुक्याचे लक्ष वेधले होते.
महागाव तालुक्यातील ३३ हजार शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनी ने अर्ज बाद केले आहे त्याच प्रमाणे विजेचा लपंडाव यामुळे नागरिक त्रस्त असुन ऐन परीक्षा काळात भारनियमन केले जात असुन हे भारनियमन तत्काळ बंद करून ज्यादा रोहित्र देण्यात यावे,तालुक्यात सुरू असलेले अवैध धंदे,गावठी दारूच्या हात भट्ट्या यांचा बंदोबस्त करण्यात यावा,पिक विमा कंपनीने क्लेम अर्ज बाद केलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ विमा रक्कम द्यावी त्याच प्रमाणे विविध मागण्या घेवुन जनआंदोलन आधार संघर्ष समितीचा मशाल मोर्चा दि.१६फेब्रुवारी२०२४ रोजी तहसिल कार्यालयावर धडकला होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

 

यावेळी तहसिलदार विश्वंभर राणे,ठाणेदार सोमनाथ जाधव,तालुका कृषी अधिकारी शिवनेरी चव्हाण, मराविवीचे प्र.उपविभागीय अभियंता नागापूरकर यांनी निवेदन स्वीकारीत सर्व समस्या सोडविण्याचे आश्वासन आंदोलकांना दिले.तालुक्यातील ३३हजार शेतकऱ्यांचे पिक विमा कंपनीने अर्ज नामंजूर करण्याची कारणे जगदीश नरवाडे यांनी मुंबईतील अधिकारी यांचेशी फोनवर संवाद साधला त्यावेळी चूक झाली प्रत्येक शेतकऱ्यांना न्याय देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

या मोर्चाचे नेतृत्व जन आंदोलन आधार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष जगदीश नरवाडे यांनी केले होते.तर या मोर्चात नागोराव पाटील कदम, तात्या शिंदे दत्तराव धावंडकर बाबु पठाण ,सचिन उबाळे ,शिवानंद राठोड ,दिलीप भाऊ जगदीश सरकाटे अमोल चंदापुरे , सचिन पाटील राऊत.अमोल दादाराव वानखेडे, समीक्षा संदीप राऊत ,अरुणाबाई पवार ,विवेक राजेंद्र नरवाडे, पंजाबराव पवार, सुनील अशोकराव भवानकर ,सौ कमलताई पृथ्वीराज चव्हाण, गोपाल राठोड सुरेश बाबाराव नरवाडे दत्ता जाधव यांच्यासह महिला व पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी महागाव पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.

पिक विमा कंपनीने ३३ हजार शेतकऱ्यांचे फॉर्म नामंजूर केले याबाबत मुंबईत बसलेला रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधुन प्रत्येक शेतकऱ्याला मोबदला मिळाला पाहिजे यासाठी आपण महागाव तहसील वर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी यावे अशी विनंती केली असता सदर अधिकारी हे २३ फेब्रुवारी२०२४ रोज शुक्रवारला महागाव येथे हजर राहणार आहेत तालुक्यातील पिक विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी पावती घेऊन मोठ्या संख्येने तहसील कार्यालय महागाव येथे उपस्थित राहावे :- जगदीश नरवाडे (संस्थापक अध्यक्ष जनआंदोलन आधार संघर्ष समिती)

पात्रता असताना आशा सेविका पदावर नोकरी लावुन देण्याच्या नावावर पैशाची मागणी करणाऱ्या प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आवाज उठवून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार देण्याचे धारिष्ट्य दाखविणाऱ्या सौ कोमल पृथ्वीराज चव्हाण यांचा जनआंदोलन आधार संघर्ष समितीच्या वतीने शाल, श्रीफळ ,पुष्पहार घालून पती-पत्नीचा सत्कार करण्यात आला.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

1 × four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.