Madhya Pradesh IT Raid : मध्य प्रदेश वाहतूक विभागात होता फक्त हवालदार, अन घरातून सापडली 2.95 कोटींची रोकड. हवालदार सौरभ शर्मा दुबईला झाला फरार.मध्यप्रदेश मध्ये यातायात विभागात हवालदाराची नोकरी केलेल्या सौरभ शर्मा नावाच्या व्यक्तीच्या घरामध्ये कोट्यावधी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे.
सौरभ शर्मा या हवालदाराने वाहतूक विभागामध्ये फक्त 7 वर्षेच नोकरी केली आणि सरकारी आणि खाजगी झालेल्या चेक पोस्ट मध्ये आपल्या अधिकाऱ्यांसाठी अवैध वसुली करताना स्वतःही कोट्यावधी रुपयांची संपत्ती या सौरभ शर्मा या कर्मचाऱ्यांनी जमविली.
मध्यप्रदेश लोकायुक्त आणि टॅक्स विभागाच्या संयुक्त छाप्यात कोट्यावधी रुपयांची नगदी रक्कम कोट्यावधींची सोन्या चांदीचे आणि जड जवाहिरात त्याच्या घरातून जप्त करण्यात आले आहे.मात्र प्रकरणाची चौकशी सुरू होण्यापूर्वी सौरभ शर्मा हा राजीनामा देऊन दुबईला फरार झाला आहे.
मध्यप्रदेश वाहतूक विभागात कार्यरत असलेला सौरभ शर्मा हा भोपाळमध्ये राहत होता. त्याच्याकडून खाजगी चेक पोस्टवर वसुली आणि भ्रष्टाचाराचा प्रकरण समोर आल्यानंतर भोपाळ मध्ये लोकायुक्त आणि भोपाळ आयकर विभागाने सौरभ शर्माच्या घरावर छापा टाकून झाडावरती घेतली असता, त्याच्या घरातून कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडलेले आहे.
कोट्यावधींची कॅश सोन्या-चांदीचे दागिने आणि मिळाल्या नोटा मोजण्याच्या मशीन.
आयकर विभागाने सौरभ शर्माच्या भोपाळ येथील त्याच्या घरातून तीन कोटी रुपयांची कॅश रक्कम, 2 कोटी रुपये किंमत असलेले दोन क्विंटल चांदीचे दागिने,आणखी 10 किलो चांदीचे दागिने, 50 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चेक पोस्टमध्ये अवैध वसुली करून आणलेली कॅश मोजण्यासाठी ठेवलेल्या 7 नोटा मोजण्याच्या मशीन आणि दोन आलिशान अशा कार आता जप्त करण्यात आलेले आहेत.
सरकारी अधिकारी,मंत्र्यांच्या लाडका होता सौरभ शर्मा.
सौरभ शर्मावर झालेल्या या कारवाईनंतर वाहतूक विभागाचे अधिकारी आणि सरकारमधील काही लोक या भ्रष्टाचारात त्याच्यावर कसे मेहरबान होते याच्या विविध कथा आता समोर येऊ लागल्या आहेत.सरकारी चेक पोस्ट खाजगीकरण झाल्यानंतर अवैध वसुलीमध्ये आणि भ्रष्टाचाराच्या या प्रकरणात सौरभ शर्मा हा आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात माया पूरवत होता. तेथून मग सरकारातील मंत्र्यांकडे सुद्धा ही अवैध माया पोहोचत होती.
यामुळे सरकारातील काही लोक आणि अधिकारी त्याच्यावर खूप मेहरबान असल्याची माहिती समोर आली आहे. प्रादेशिक वाहतूक विभागात फक्त हवालदार पदावर असताना सुद्धा सर्व सरकारी तील काही मंत्री आणि आपल्या विभागातील अधिकाऱ्यांचा खूप लाडका बनला होता. त्याच्याकडून वरिष्ठ अधिकारी आणि सरकारातील मंत्र्यांना कॅश पुरविले जात होते. यादरम्यान अधिकाऱ्यांनीही त्याच्यावर मेहरबानी केली,यामुळेच तो फक्त सात वर्षे नोकरी केल्यावरही कोट्याधीश झाला बनला.
चेक पोस्ट वरून आलेली रोख रकमेची विल्हेवाट स्वतः लावायचा.
महत्त्वाची बाब म्हणजे एकटा सौरभ शर्मा हा मध्य प्रदेशात असलेल्या एकूण चेक पोस्ट मध्ये निम्म्या चेक पोस्ट ची वसुलीची जबाबदारी सांभाळत होता. येथून येणाऱ्या सर्व रोख रकमेची विल्हेवाट आणि वाटणी व्यवहारात तो एक्सपर्ट झाला होता. धनराशी मध्ये चेक पोस्टवर कार्यरत असलेले अधिकाऱ्यांना इतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्यापैकी किती हिसा द्यावयाच्या आहे हा निर्णय स्वतः हवालदार असलेला हा सौरभ शर्मा घेत होता.
सरकारातील मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे असल्यानेच वाहतूक विभागातील कोणताही अधिकारी किंवा इन्स्पेक्टर त्याच्या कामात कधीही व्यत्यय आणत नव्हते.यावरून त्याचा या विभागात किती पॉवर होता हे समोर आले आहे.
सरकारी चेक पोस्ट बनवून टाकले होते खाजगी चेक पोस्ट.
सौरभ शर्मा याने केलेल्या भ्रष्टाचाराची आणि त्यासाठी वापरण्यात आलेल्या चानाक्ष बुद्धीची आता चर्चा सुरू होऊ लागली आहे.चेक पोस्टमध्ये वसुली आणि भ्रष्टाचार कसा झाला,याबाबत आता काही बाबी समोर आल्या आहेत.सौरभने काही अधिकाऱ्यांना सोबत घेवून आणि आपल्या बुद्धीचा वापर करून चेक पोस्टमध्ये वसुली करून प्रचंड भ्रष्टाचार केला आहे. यापूर्वी मध्य प्रदेश मध्ये सरकारी चेक पोस्टचे खाजगीकरण करून टाकण्यात आले होते.
हे सर्व सरकारी चेक पोस्ट खाजगी ठेकेदारांना कंत्राटावर देण्यात आले होते.येथून दर दिवशी प्रत्येक चेक पोस्ट वरून एक ठराविक रक्कम या भ्रष्टाचार प्रकरणात सामील असलेल्या लोकांना मिळत होती.चेक पोस्ट वरून सौरभ शर्मा हा हवालदार स्वतः पैसे वसूल करीत होता. समोर आलेल्या माहितीनुसार एक जुलै 2024 पूर्वी मध्य प्रदेश मध्ये एकूण 47 सरकारी ट्रॅफिक चेक पोस्ट होते.या सर्व चेकपोस्टचे नंतर खाजगीकरण करण्यात आले.
यात सौरभ हा एकटाच 23 चेकपोस्ट हाताळत होता,अशी माहिती आता समोर आली आहे. या चेक पोस्टवर जमा होणारी रक्कम सौरभ एकटाच गोळा करून नंतर ते इतरांना वाटप करायचा.
चौकशी होण्यापूर्वीच दिला राजीनामा,आणि दुबईला पळाला.
शासकीय सेवेमध्ये राहत असताना आपण या दरम्यान चेकपोस्ट वसुलीत मोठा भ्रष्टाचार केल्यानंतर इन्कम टॅक्स विभागाचा छापा पडल्यानंतर आपण आता कधीही अटक होऊ शकतो ही गोष्ट सौरभ शर्माच्या लवकरच लक्षात आली, त्यामुळे सौरभने खूप चालाकिने आपल्या पदाचा राजीनामा देऊन टाकला होता.
कारण त्याला माहिती होते की जर आपण सेवेत असताना आपल्या भ्रष्टाचाराच्या संबंधात चौकशी सुरू झाली तर आपला राजीनामा स्वीकारला जाणार नाही, त्यामुळे त्याने कारवाईपूर्वीच चानाक्षपणे आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, मात्र या विभागात त्याने भ्रष्टाचार केल्याची माहिती उघड झाल्यानंतर ही त्याच्या राजीनामा स्वीकारण्यात आला.
यामागे त्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत संबंध आणि सरकार किती पोहोच होती हे समजून येते.राजीनामा दिल्यानंतर त्याची नोटीस मिळत असते,मात्र यादरम्यान तीन महिना कालावधी पूर्ण न करता तो यापूर्वीच दुबईला पळून गेला आहे, त्यामुळे आता पोलीस त्याला विदेशातून अटक करण्यासाठी रेड कॉर्नर नोटीस काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.