Madhav Kohle यांचा शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश.

भारतीय जनता पार्टी मारेगाव तालुक्याच्या वतीने बोटोणी येथे माजी केंद्रीय गृह राज्यमंञी तथा केंद्रीय मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष मा. श्री. हंसराजजी अहीर यांच्या वाढदिवसानिमित्य आदिवासी प्रबोधन तथा आदिवासी नृत्य स्पर्धेचे आयोजन केले होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

या प्रसंगी मा.श्री. हंसराजजी अहीर यांचे नेतृत्वात व भाजपा ओबीसी मोर्चा चे राज्य उपाध्यक्ष मा.श्री.राजुभाऊ डांगे, जिल्हा अध्यक्ष मा.श्री .तारेंद्र बोर्डे, प्रदेश सदस्य मा.विजय चोरडीया, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष रोहीत राठोड यांचे प्रमुख उपस्थितीत आदिवासी गोंड गोवारी आरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष Madhav Kohle यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

यावेळी कार्यक्रमाचे आयोजक तथा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकर लालसरे,वणी विधान सभा प्रमुख संजय पिंपळशेंडे,माजी जि.प.सदस्य बंडू चांदेकर,मारेगाव तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चिकटे ,अविनाश लांबट,प्रशात नांदे,जिल्हा युवा मोर्चा सचिव प्रसाद ढवस,मारेगाव तालुका युवा मोर्चा अध्यक्ष गणेश झाडे,नगरसेवक राहुल राठोड,वैभव पवार यांचे सह अनेक पदाधिकारी हजर होते.

कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने आदिवासी बांधव तथा भाजपा समर्पक जनता उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुञसंचालन मुन्नाभाऊ अबवानी यांनी केले.कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी शंकर लालसरे, विनायक जुमनाके,राजेश पांडे,पुंडलिक फुन्ने,बबन झोटींग यांचे सह अनेक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Comment

seven + 9 =