LPG Price 1 January 2025 : आज पासून नवीन वर्ष 2025 सुरू झालेले आहेत. या नवीन वर्षात आर्थिक सुखसमृद्धी येवो अशी सर्वांची कामना राहणारच आहे,आणि या नववर्षात विविध अपेक्षा आणि लक्ष्यही राहणार आहेत.या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या सुरुवातीची सकाळ सर्वसामान्य गृहिणीसाठी खास बाब घेवून आली नसली तरी, लवकरच घरगुती सिलेंडररच्या किमती कमी होणार असल्याचे संकेत मिळत आहे.
तर दुसरीकडे, हॉटेलिंग, तसेच खाद्यपदार्थ बनविणारे आणि विकणाऱ्या व्यवसायिकांना खूप दिलासा देणारी ठरली आहे.याचे कारण म्हणजे देशात कमर्शियल LPG गॅस सिलेंडर ( LPG Commercial GAS Cylinder) किंमत 1 जानेवारीपासून 14.50 पैसे कमी झाली आहे.म्हणजेच एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त झाला आहे.सकाळपासून हे नवे दर देशात लागू करण्यात आलेले आहेत. 19 किलोच्या व्यवसायिक एलपीजी गॅस सिलेंडर वर आजपासून दर कपात करण्यात आली आहे. मात्र घरगुती वापरासाठी येणारा 14 किलो एलपीजी गॅस सिलेंडर किमतीत सध्या कोणतीही घट झालेली नाही.
आजपासून येथे नवे दर लागू.
कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात आजपासून 14.50 पैसे इतकी घट झाली असून देशभरातील विविध शहरात आता खालील किमतीत व्यावसायिक गॅस सिलेंडर मिळणार आहेत यानुसार,मुंबईसाठी एलपीजी सिलिंडरच्या दरात १६ रुपयांनी घट झाली आहे.येथे आता कमर्शियल एलपीजी सिलेंडर 1771रुपयात मिळणारे सिलेंडर 1756 रुपयांत मिळणार आहे.
तर देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतमध्ये 1 जानेवारीपासून 19 किलोचा इंडेन कंपनीचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता 1804 रुपयांना मिळणार आहे.येथे आतापर्यंत याचे दर 1818.50 पैसे होते. तर दुसरीकडे पश्चिम बंगाल मध्ये कोलकाता येथे आता नवीन दरानुसार व्यावसायिक सिलिंडर 1911 रुपयांमध्ये मिळणार आहे.
डिसेंबर 2024 पर्यंत कोलकत्ता मध्ये हे एलपीजी सिलेंडर 1927 तर नोव्हेंबर मध्ये 1911.50 रुपयात मिळत होता. आता कोलकात्यात याची किंमत 2 जानेवारीपासून 1980 रुपयांवरून 1966 रुपये झाली आहे. तर बिहारमध्ये पाटणा येथे कमर्शियल गॅस सिलेंडर आता नवीन दरानुसार 2056 रुपयांमध्ये मिळणार आहे.यापूर्वी तो 2072.5 मिळत होता वर्ष 2024 कमर्शियल एलपीजी सिलिंडरचे दरात इतके झाले होते बदल.
देशात वर्ष 2024 मध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर दरात वेळोवेळी बदल पाहायला मिळाला. गेल्या वर्षात सुरुवातीला व्यवसाय सिलेंडर दर वाढलेली असताना यात काही रुपयांनी कमी पाहायला मिळाली. त्यानुसार देशात 2024 मध्ये विविध महिन्यात एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडरचे दर असे राहिले.
डिसेंबर 1818.50 रुपये
नोव्हेंबर 1802 रुपये
ऑक्टोबर 1740 रुपये
सप्टेंबर 1691.50 रुपये
ऑगस्ट 1652.50 रुपये
जुलै 1646 रुपये
जून 1676 रुपये
मे 1745.50 रुपये
एप्रिल 1764.50 रुपये
मार्च 1795 रुपये
फेब्रुवारी 1769.50 रुपये
जानेवारी 1755.50 रुपये.
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरगुती सिलेंडरच्या दरात बदल नाही.
केंद्र सरकारने नव्या वर्षाच्या सुरुवातीला घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या कोण किमतीत कोणताही नवा बदल केलेला नाही,मात्र लवकरच याची किंमत कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापूर्वी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार देशात उज्वला गॅस योजना लाभार्थी आणि सर्वसामान्य ग्राहकांसाठी घरगुती गॅस सिलेंडर मध्ये सबसिडी आणि सवलत देण्याची घोषणा करण्यात आली होती.
यात सर्वसामान्य एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना तीन सिलेंडरवर तीनशे रुपयांची सवलत मिळणार असल्याची चर्चा होती मात्र या संदर्भात केंद्र सरकारने अजूनही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र एक जानेवारीपासून घरगुती सिलेंडरवर नवे दर लागू झाले नाही त्यामुळे सध्या महाराष्ट्रात मुंबईमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 802.50 रुपये, चेन्नईमध्ये 818.50 रुपये, पाटणामध्ये 892. 50 दिल्लीमध्ये 803 रुपये आणि पश्चिम बंगालमध्ये कोलकत्यात 829 रुपये मध्ये घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे. देशात बहुतांश ठिकाणी घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचे समान आणि स्थिर आहे.