LPG Gas Cylinder Subsidy : गॅस सिलिंडर सुबसिडीवर 1 जानेवारी पासून नवीन नियम लागू ! जाणून घ्या !

LPG Gas Cylinder Subsidy : देशात मोठ्या प्रमाणात एलपीजी गॅस सिलेंडर वापरले जातो. घरगुती आणि कमर्शियल दोन प्रकारचे एलपीजी गॅस सिलेंडर वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे.जर घरात एलपीजी गॅस सिलेंडर वापरात असेल, तर याच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात येणार आहेत.

महत्त्वाचे म्हणजे एलपीजी सिलेंडरवर जे लोक सबसिडी घेतात, त्यांना सबसिडी मिळणे आता बंद होणार आहे. तर दुसरीकडे काही एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना सवलत सुद्धा मिळणार आहे एलपीजी गॅस सिलेंडर नियमांमध्ये झालेला बदल हा एकूणच फायदेशीर ठरणार असल्याचे मत व्यक्त केल्या जात आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

तर सबसिडी मिळणार नाही.

केंद्र सरकारने सुरू केलेल्या उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांची देशात फार मोठी संख्या आहे उज्वला योजनेतून सरकार सिलेंडर खरीदीसाठी लाभार्थी महिलांना 300 रुपये प्रति सिलेंडर अनुदान देते आधी सिलेंडर खरेदी करताना बाजारभावाप्रमाणे सिलेंडर खरेदी केल्यानंतर तीनशे रुपये सबसिडी लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते.

मात्र आता उज्वला योजनेतील ज्या लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल,त्यांची सबसिडी पुढील महिन्यापासून बंद करण्यात येणार आहे. केंद्र सरकारने 1जानेवारी 2024 पर्यंत केवायसी पूर्ण करण्याची सूचना दिली होती.पण अनेक उज्वला योजना लाभार्थ्यांनी डिसेंबर महिन्याचे शेवटपर्यंत आपली केवायसी संबंधित एलपीजी गॅस सिलेंडर डीलरकडे पूर्ण केली नाही. डिसेंबर महिन्याचे शेवटपर्यंत केवायसी पूर्ण झाली नसेल,तर आता उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना पुढे सबसिडी मिळणार नाही,असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

आता सर्वसामान्य LPG Gas Cylinder Subsidy ग्राहकांनाही 300 रुपयांची सवलत.

केंद्र सरकारने शुक्रवार 27 डिसेंबर पासून एलपीजी गॅस सिलेंडर खरेदी संबंधात नवीन नियम लागू केले आहे. यात केवायसी करणाऱ्या लाभार्थींना पुढील वर्षी सुद्धा उज्वला योजनेतील प्रति सिलेंडरवर तीनशे रुपयाची सबसिडी मिळणार आहे याशिवाय एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे, तो म्हणजे आता सर्वसामान्य एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना एका सिलेंडर खरेदीवर 300 रुपयांची सवलत मिळणार आहे.

सिलेंडरवर हे ग्राहकांना विशेष सवलत असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात विविध शहरात विविध किमतीत पण 800 ते 840 रुपयांमध्ये मिळणाऱ्या सिलेंडरवर सवलत मिळाल्यास सिलेंडर फक्त 500 रुपयांमध्येच ग्राहकांना उपलब्ध होईल. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांना काहीसा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.

काय आहे LPG Gas Cylinder Subsidy चे नवे नियम.

जर घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहक यावर सबसिडी घेत असेल आणि ती अबाधित ठेवायची असेल,तर यासाठी कार्यालयीन कारवाई करावी लागेल. सबसिडी पुन्हा सुरू करण्यासाठी काय करावयाचे आहे,याचे मार्गदर्शन प्रशासनिक स्तरावर आणि एलपीजी सिलेंडर डीलर कडून मिळणार आहे.

LPG Gas Cylinder च्या किमतीमध्ये घसरण.

विविध वेळी एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती कमी जास्त होत राहतात. काही दिवसांपूर्वी एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडर 1200 मध्ये मिळत होता.आता त्याची किंमत घसरून 813 रुपये झाली आहे.सोबतच देशाच्या बहुतांश राज्यांमध्ये गॅस सिलेंडरच्या किमती मध्ये घसरन पाहायला मिळाली आहे.त्यामुळे आधी महाग झालेला सिलेंडर आता आधीच्या तुलनेत स्वस्त झाल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

विविध राज्ये आणि शहरांमधील एलपीजी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीं किती.

देशभरात विविध राज्यात एलपीजी कमर्शियल गॅस सिलेंडरची किमती कमी जास्त आहेत. नुकतेच देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचे नवीन दर सुद्धा जाहीर करण्यात आली आहे.त्यानुसार सध्या दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडर 810 रुपये, गुडगाव मध्ये 813 रुपये,मुंबईमध्ये 809 रुपये, चंदीगड मध्ये 816 रुपये, जयपुर तसेच पाटणा शहरात 800 रुपये,बेंगलोर मध्ये 812 रुपये आणि कोलकत्ता मध्ये 823 सुरत शहरात 870 रुपयांमध्ये एलपीजी गॅस सिलेंडर मिळत आहे.

तर दुसरीकडे इतर काही शहरांमध्ये गॅस सिलेंडरच्या दरात वरील शहरांच्या तुलनेत थोडा फरक आहे त्यानुसार तामिळनाडूमध्ये चेन्नई दिल्ली मधील नोएडा आणि ओडिसामध्ये भुवनेश्वर शहरात सध्या एलपीजी गॅस सिलेंडर 925 रुपयात मिळत आहे तर हैदराबाद मध्ये 923 आणि लखनऊ शहरात 831 रुपये दर आहेत. यामुळे देशभरातील सर्व एलपीजी गॅस सिलेंडर ग्राहकांनी आपल्या शहरात किती किमतीत गॅस सिलेंडर मिळत आहे याची माहिती आपल्या क्षेत्रानुसार घेणे गरजेचे आहे,जेणेकरून त्यांचे आर्थिक बचत होऊ शकते.

लवकरच पेट्रोल,डिझेलच्या किमतीमध्ये घट होणार?.

सर्वसामान्य नागरिकांना गॅस सिलेंडर मध्ये स्वागत मिळाल्यानंतर आता सरकार पेट्रोल आणि डिझेलचे किमतीमध्ये घट करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येत आहे.मागील अनेक महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यात दरवाढ झालेली नाही, तर दुसरीकडे एलपीजी सिलेंडर किमतीमध्ये सुद्धा 10 रुपयांची घसरण होऊ शकते. यामुळे एकूणच घरगुती महिलांना आणि वाहन चालकांना दिलासा मिळू शकते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

eighteen − 11 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.