LPG Cylinder Gas Check : आपली गृहस्थी चालविताना महिलांना सर्वात जास्त आपल्या स्वयंपाक घरातील मॅनेजमेंट वर लक्ष द्यावे लागते. यात महत्त्वाचे असते किचन मधील सर्वात जास्त वापरात येणारा गॅस सिलेंडर. सिलेंडर कधी आणला आणि ते कधी संपेल याच्यावर महिलांना नेहमी लक्ष द्यावा लागतो.
त्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस सिलेंडर महिन्याच्या शेवटी एकूण किती दिवस पुरेल ही महिलांना एकूणच चिंता राहते. त्यामुळे गॅस सिलेंडर अजून किती दिवस पुरेल हे ओळखायचे असेल तर याचे काही टिप्स आहेत,ते जाणून घेऊया.
महिलांना आपल्या घरात झोपेतून उठताच किचन मध्ये काम करावे लागते,दिवसभर किचनमध्ये काही ना काही पदार्थ बनविण्यासाठी गॅस सिलेंडरचा वापर होतो. विशेष म्हणजे वर्षात सर्वात जास्त हिवाळ्यांच्या दिवसात गॅस सिलेंडरची गरज भासते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गॅस जास्त खर्च होते.एरवी गॅस सिलेंडर जास्त दिवस पुरतो.
मात्र हिवाळ्यात ते आठ ते दहा दिवस आधीच संपून जाते असा महिलांचा नियमित अनुभव असतो.किचनमध्ये गॅस सिलेंडर संपला की स्वयंपाक घरातील सर्व कामे जसे स्वयंपाक आणि नाश्ता,चहा आणि इतर खाद्य पदार्थ बनविण्याचे काम ठप्प होऊन जाते.आता आधुनिक जगात मायक्रोवेव्हन आणि इंडक्शन सारखे स्वयंपाकासाठी किचनमध्ये उपकरण असतात.
पण किचन मध्ये महिलांसाठी सर्वात महत्त्वाची वस्तू म्हणजे गॅस सिलेंडर असते. त्यामुळे महिलांना सिलेंडर पुढे किती दिवस चालणार याचा वेळोवेळी अंदाज घ्यावा लागतो. आणि गॅस सिलेंडर संपण्यापूर्वी त्याची व्यवस्था करून ठेवावी लागते. त्यामुळे आपण पाहूया की स्वयंपाक घरात असलेल्या सिलेंडर Gas cylinder Checking Tips आणखीन किती दिवस चालणार,आणि याचा अंदाज घेण्यासाठी कोणकोणते टिप्स आहेत?
- ओल्या कपड्याचा वापर करा.
स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर मध्ये आता किती गॅस वाचला आहे हे तपासण्यासाठी महिला एखादा ओला कपडा घेऊन त्याचा वापर करू शकतात हा प्रयोग करण्यासाठी सर्वात प्रथम एखादा ओळा टावेल किंवा ओला सुती कपडा घेवून ते गॅस सिलेंडर भोवती गुंडाळा.
यामुळे अगदी 5 ते 6 मिनिटांनी गुंडाळलेला ओला कपडा सुकला की त्याला काढून टाका,यानंतर गॅस सिलेंडरचे निरीक्षण केल्यास, एक दोन मिनिटांनी त्या सिलेंडरचा काही भाग सुखा आणि काही भाग ओलसर दिसेल. त्यामुळे जो सिलेंडरचा जो भाग जिथपर्यंत ओलसर दिसेल,तिथपर्यंत सिलेंडर मध्ये गॅस आहे हे समजू शकतो
.याचे कारण म्हणजे सिलेंडरच्या आत असलेला गॅस हा थंडगार असतो, त्यामुळे ज्या भागात गॅस आहे त्या भागात पाणी लवकर वाळत नाही.(हे एक यामागे लॉजिक आहे.).
- गॅसची फ्लेम वरून ओळखा किती गॅस आहे?.
किचन मध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा वापर करताना गॅस शेगडी पेटवल्यानंतर बर्नर मधून निघणारा यांचा रंग कसा आहे यावरून गॅस सिलेंडर मध्ये किती गॅस आहे हे समजून येते.यासाठी एक सोपा उपाय आहे. बर्नर मधून निघत असलेल्या flame चा रंग जर निळसर निघत असेल तर सिलेंडर मध्ये भरपूर गॅस आहे आणि अजून ते खूप दिवस चालणार,असे समजा.
- केशरी रंगाचा Flame गॅस सिलेंडर मधील गॅस संपला.
पण गॅस शेगडी पेटवल्यानंतर त्याच्या बर्नर मधून निघत असलेला फ्लेम जर केशरी रंगाचा निघत असेल तर आता गॅस सिलेंडर मधील गॅस संपत आलेला आहे अस आपण समजू शकतो. आणि यातून आणखीन किती दिवस चालणार हे अंदाज गृहिणींना येऊन जाते,यानुसार मग नवीन गॅस सिलेंडर आणण्याची व्यवस्था आपण करू शकतो.