*प्रतिनिधी:-जाकिर अहमद बाळापुर जिल्हा अकोला महाराष्ट्र*
Lok Sabha Election 2024: Vanchit Bahujan Aghadi व महविकास आघाडी यांची युती होनार की नाही याबाबत साशंकता होती.ती आज दूर झाली असून आठ उमेदवारांची घोषणा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रेखाताई ठाकुर यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे अकोल्यातुन निवडणूक लढणार आहेत.
तर भंडारा – गोंदिया मधून संजय गजानंद केवट, गडचिरोली – चिमूर मधून हितेश पांडुरंग मडावी, चंद्रपूर मधून राजेश वारलुजी बेले, बुलढाणा मधून वसंत राजाराम मगर, अमरावती मधून कु. प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान, वर्धा मधून प्रो. राजेंद्र साळुंके, यवतमाळ- वाशिम मधून खेमसिंग प्रतापराव पवार आहेत.