Local Body Elections Maharashtra : लोकसभा निवडणुकीत मोठा दणका मिळाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाल्याने भाजपचे आत्मविश्वास खूप वाढलेले आहे. महायुतीत सर्वात जास्त 132 जागा भाजपने जिंकल्या आहे.या विजयाने भाजप पदाधिकारी,नेत्यांचे आत्मविश्वास वाढल्याने आता महायुतीत असतानाही भाजपने एकला चलो रे…. ही नीती अवलंबविली आहे.
महायुतीत शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि भाजप कडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात विविध मुद्द्यांवर राजकीय संघर्ष एरणीवर आलेले आहे.नेमके यामुळेच भाजप कडून आता महानगरपालिका आणि सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा करण्यात येत आहे.त्यामुळे महायुतीचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच ‘अंतर्गत पानिपत’ होणार का अशी राजकीय परिस्थिती निर्माण झालेली आहे.
भाजप नेते महानगरपालिका आणि इतर सर्व निवडणुका आता महायुतीत जागावाटप न करता स्वबळावर लढावी असा भाजप हायकमांडकडे मागणी करताना दिसत आहे.{BJP Central Leadership} महाराष्ट्राच्या भाजप कोर कमिटीच्या बैठकीत सुद्धा पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी लोकल बॉडी इलेक्शन महायुतीमध्ये राहून न लढता स्वबळावरच निवडणूक लढू असे मत व्यक्त केलेले आहे.
Local Body Elections Maharashtra : सोबत लढण्याची शिवसेनेची तयारी.
उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी शिवसेना एकनाथ शिंदे गटाने आगामी सर्व निवडणुका महायुतीमध्ये लढण्याची भूमिका घेतलेली आहे.याचे प्रमुख कारण म्हणजे शिवसेना शिंदे गटाला विधानसभा निवडणुकीत विपरीत परिस्थिती असतानाही महायुतीमध्ये लढण्याचा फायदा झाला.या पक्षाने अगोदर काही लहान निवडणुका महायुती असतानाही एकटे लढल्या,मात्र याचा मतदारांवर परिणाम होत नसल्याचे या पक्षाचे मंत्री संजय शिरसाठ यांनी म्हटलेले आहे.
त्यामुळे आता भाजपच्या नेत्यांकडून स्वबळावर निवडणुका लढण्याची भाषा आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची भूमिका यामुळे येणाऱ्या दिवसात महायुतीमध्ये महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकापूर्वी महायुतीत मतभेद दिसून येतील,अशी राजकीय शक्यता आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांचीही भाजप नेत्यांच्या भूमिकेला सहमती.
भाजपच्या प्रदेशवर कमिटीची बैठकीमध्ये प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांनी आगामी महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणूक स्वबळावर लढाव्या याबाबत आपले स्पष्ट असे मत व्यक्त केलेले आहे,यात भाजपचे राज्यात प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांनी ही आपल्या पक्ष नेत्यांच्या भूमिकेला थेट अशी सहमती दर्शविली असल्याची बोलले जात आहे.
एका पक्षाचा पानिपत करण्याची रणनीती आखणार?
दरम्यान येत्या 22 फेब्रुवारी रोजी भाजप केंद्रीय हायकमांडमध्ये प्रमुख नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे पुणे दौऱ्यावर येत आहेत.या दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि अमित शहा यांच्यात महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर कसे लढता येईल? यादरम्यान भाजप नेत्यात स्वबळावर लढण्याचा मुद्द्यावर महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुणे मध्ये या बैठकीतून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायूती मधील एका पक्षाचा पानिपत करण्याची रणनीती आखण्यात येणार आहे,अशी माहिती विश्वसनीय राजकीय सूत्र देत आहेत.
भाजप पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची आगामी निवडणुकांसाठी ही भूमिका एकंदरच महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांच्यासाठी खळबळ माजविणारी ठरू शकते.
कारण यापूर्वी काही निवडणुकांमध्ये महायुतीचे पक्ष एकटे लढण्याने याचा थेट फायदा महाविकास आघाडीच्या पक्षांना एकत्र लढल्याने झाला असल्याचा अनुभव आहे,आणि याचा नुकसान महायुतीला झाला, यासंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही महत्त्वाचे भाष्य केलेले आहे.
मात्र आता यानंतर ही भाजपचे नेते स्वबळावर लढण्याची भाषा करीत असल्याने महायुतीमध्ये या संदर्भात अंतर्गत मतभेद लवकरच माध्यमातून समोर येईल,अशी ही शक्यता आहे.
स्वबळावर लढण्याची भाषा एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यात संघर्षाचा नतीजा?
विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदासाठी भाजप आणि शिवसेनेमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळाली, यानंतर शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्रीपद परत घेऊन सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपने आपल्याकडे हा पद ठेवून घेतला.
या सर्व राजकीय घडामोडींमध्ये देवेंद्र फडणवीस यांची मुख्य भूमिका होती, यानंतर कॅबिनेट मधील महत्त्वाचे खाते आणि पालकमंत्री पदावरून शिंदे फडणवीस यांच्यात वाद विकोपाला गेला,आणि दोन्ही नेत्यांमध्ये या सर्व बाबींमध्ये आता राजकीय नाराजी आहे.त्यामुळे दोन्ही नेत्यांचा हा राजकीय संघर्ष आता भाजपकडून स्वबळावर लढण्याची भाषा करण्यापर्यंत आलेला आहे.यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे खूप आत्मविश्वास असल्यानेच असा निर्णय घेण्यात येईल ही जोरदार शक्यता आहे.
सध्या मुख्यमंत्र्यांच्या विविध निर्णयामुळे एकनाथ शिंदे हे नाराज आहे,या दोन्ही नेत्यांच्या राजकीय संघर्षांमध्ये आता राज्यात महायुती सरकार असतानाही, पुढील निवडणुका महायुती मधील पक्षांनी वेगवेगळे लढावे यावर भाजपकडून जोर देण्यात येत आहे. यामागे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची राजकीय ताकद कमी करण्याचा भाजपकडून प्रयत्न होत असल्याची राजकीय चर्चा आहे.
आम्हीही कमजोर नाही, भाजप प्रदेशाध्यक्षांनी गंभीरतेने विचार करावा!!
भाजप कडून महाराष्ट्रात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा समोर येताच,शिवसेनेने सुद्धा राजकीयपणे ठोस अशी भूमिका घेतलेली आहे.
शिवसेना पक्ष सुद्धा कमजोर नाही,आम्हीही राज्यात स्वबळावर लढू शकतो, मात्र महायुतीमध्ये अंतर्गत विवाद सार्वजनिक होऊ नये,अंतर्गत राजकीय संघर्ष वाढू नये,यामुळे विरोधकांना फायदा होऊ नये, यामुळेच आगामी निवडणुका महायुती मधील पक्षांनी एकत्रित लढावी अशी शिवसेनेने भूमिका घेतली असल्याचे शिवसेनेमधील नेते आणि पदाधिकारी बोलत आहे.
शिवसेना स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्याचे आग्रहावर युती संदर्भात निर्णय घेत नाही…?
शिवसेनेमध्येही काही ठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा असा आग्रह आहे की, महायुतीमध्ये न लढण्याचा परिणाम थेट मतदारावर होतो.{Mahayuti}स्थानिक पातळीवर शिवसेनेचे निर्णय झाले तर युती होणार नाही असे चित्र असते,आणि शिवसेना अशी भूमिका घेत नाही त्यामुळे या संदर्भात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सध्या गंभीरतेने यावर विचार करावा, महायुतीत तिन्ही पक्षी लढले,तरच मतदार महायुती सोबत राहतील,अशी भूमिका शिवसेनेचे नेते आणि कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ यांनी मांडलेली आहे.