LML Star Electric Scooter : देशात पर्यावरण सुरक्षा आणि इंधन वाचविण्यासाठी इंधन वर चालणाऱ्या बाईक आणि वाहनांचा आता मोठा मजबूत पर्याय समोर आला आहे.यात दुपहिया वाहन मोपेड स्कूटर आणि इलेक्ट्रिक वर्जन मध्ये आले आहे. लिथियम बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांनी भारताच्या बाजारात धुमाकूळ घातल्यानंतर आता सर्वात प्रख्यात आणि जुनी कंपनी असलेल्या एलएमएल.LML या कंपनीने पूर्ण तयारीनिशी इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रात पाय रोवण्याची तयारी केली आहे.
या कंपनीच्या नवीन निर्णयामुळे इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपला प्रस्थ असल्याचा दावा करणाऱ्या कंपन्यांचे धाबे दणाणले आहे. आतापर्यंत देशात इलेक्ट्रिक मोपेड स्कूटर बनविणाऱ्या कंपन्यांमध्ये टीव्हीएस ICube, बजाज चेतक आणि ओला यांनी आपला वर्चस्व निर्माण केला आहे, मात्र एल एम एल कंपनीने इलेक्ट्रिक बाजारात उत्पादन सुरू करताना एलएमएल स्टार LML Star हा एखाद्या कार प्रमाणे नवीन आणि आधुनिक फीचर सिस्टम वर काम केले आहे.
उदाहरण दाखल एल एम एल स्टारचा जो एक आधुनिक फीचर आहे,त्यात एल एम एल च्या नव्या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये त्याचा कॅमेरा 360 डिग्री मध्ये फिरणार आहे. म्हणजेच या वाहनाला चालविणाऱ्या चालकाला ड्रायव्हिंग साठी आधुनिक अशी सुविधा मिळणार आहे.लवकरच हा आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात Launch होणार आहे.
1990 च्या दशकात भारतात “बुलंद भारत की बुलंद तस्वीर,हमारा बजाज” ही टॅगलाईन सर्वात जास्त मशहुर होती. देशातील खूप जुनी स्कूटर कंपनी असलेल्या बजाज या कंपनीला वाहन क्षेत्रात मातब्बर अशी कंपनी मानल्या जात होते.या दरम्यान एलएमएल. कंपनीने आपला आकर्षक आणि विविध लुक आणि रंगांमध्ये स्कूटर लॉन्च केला होता याला अख्या देशात वाहन चालकांची पसंती मिळाली होती.
मध्यंतरी मोपेड स्कूटर मध्ये अनेक नवीन कंपन्यांनी उत्पादन सुरू केले मात्र जुन्या काळातील या कंपनीचे वाहन उत्कृष्ट दर्जाची आणि विविध फीचर्स असलेले होते. आता ही या कंपनीच्या या वाहनाचा कोणताच तोड नाही,हे मोपेड स्कूटर आता ही रस्त्यांवर धावताना सर्वांना आकर्षित करतों.आता त्यापेक्षा जास्त आधुनिक रूपात एल एम एल कंपनी इलेक्ट्रिक मोपेड स्कूटर मध्ये आकर्षक वाहनांचा उत्पादन करणार आहे.
त्यामुळे बाजारात इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यापूर्वी एखाद्या आलिशान कार मध्ये असलेले फीचर्स या नवीन इलेक्ट्रिक वाहनांमध्ये असावे असा लक्ष या कंपनीने ठेवला आहे.सोबतच कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटरचे उत्पादन करताना याचे डिझाईन आणि फीचर्स खूप आकर्षक बनविले आहे.
गेल्याच वर्षी ऑटो एक्सपो मध्ये झाली होती एल एम एल स्टार प्रदर्शित.
गेल्या वर्षीपासूनच एलएमएल ने इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुरू केले होते यादरम्यान भारतात आयोजित करण्यात आला होता त्यात या कंपनीने आपले नवीन इलेक्ट्रिक स्कूटर एलएमएल स्टार LML STAR याचे विशेष फीचर्स आणि डिझाइन्स चे प्रदर्शन केले होते आता लवकरच ही कंपनी हा इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करणार आहे.
विशेष म्हणजे एल एम एल स्टार या इलेक्ट्रिक वाहनाला देशातील सीएम या प्राधिकरणाने प्रमाणित केलेले आहे नुकतेच या कंपनीकडून याची माहिती सार्वजनिक करण्यात आली.आणि समोरील काही महिन्यात ही आकर्षक इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात लॉन्च करण्यात येईल,अशी घोषणा सुद्धा कंपनीने केली आहे.
इटलीमध्ये बनविले डिझाईन आणि दिले आकर्षक NEW FEATURES
विशेष म्हणजे नव्वदीच्या काळात एल एम एल स्कूटर लॉन्च झाल्यानंतर ती खूप लोकप्रिय ठरली होती, त्याला देशात सर्वाधिक खपाचा खिताब मिळाला होता. आपल्या याच खिताबला तोड स्वतः देवून, आता या कंपनीने बाजारातील इतर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना टक्कर देण्याची तयारी पूर्ण केली आहे. यासाठी एल एम एल ने जो स्टार STAR स्कूटर बनविला आहे.
त्याचा आकर्षक लुक असलेले डिझाईन कंपनीने इटलीमधील ऑटोमोबाईल क्षेत्रातील विशेषज्ञांकडून तयार केला आहे. या वाहनाचे दिमाखदार स्टार लुक,फीचर्स आणि उत्कृष्ट लिथियम बॅटरी पॅक यामुळे ही कंपनी इतर इलेक्ट्रिक वाहन कंपन्यांना तगडा आव्हान देणार आहे असा दावा एल एम एल कंपनीने केला आहे.
हे आहेत नवीन फीचर्स.
विशेष म्हणजे या स्टार एल एम एल वाहनांमध्ये जो एलईडी फीचर आहे तो डे टाईम रनिंग लाईट असून त्याला 360 डिग्रीचा कॅमेरा बसविण्यात आला आहे.सोबतच अतिरिक्त असा प्रोजेक्ट बसलेला असेल. एकंदरस कंपनीने एखाद्या आलिशान कार मध्ये जे फीचर असतात ते या स्कूटरमध्ये देण्याचा प्रयत्न केला आहे.यात टायर प्रेशर मॉनिटर सिस्टम, इंटिग्रेटेड रिव्हर्स पार्क असिस्टंट, डी आर एल,एम्बी एंड lighting सिस्टम असेल.
काय आहे 360 डिग्री चा डे टाईम रनिंग कॅमेरा.
369 अँगल चा कॅमेरा हेडले मध्ये दिलेला आहे तो,जो चालक या वाहनाला ड्रायव्हिंग करेल त्याला आपल्या वाहनाच्या आजूबाजूला होणाऱ्या सर्व हालचाली रेकॉर्ड होऊन पाहायला मिळेल. हे या वाहनाचा एकदम आधुनिक फिचर आहे. तर दुसरीकडे या इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर 200 किलोमीटर असेल वाहनांमध्ये सुविधा जनक अशी दिक्की बनविण्यात आली आहे ज्यात फुटबोर्ड वर बॅटरी आणि मोठा हेल्मेट बसू शकेल एवढा स्पेस असेल. सुरुवातीच्या काही सेकंदात हायलॅस्टिक स्कूटर 90 किलोमीटर प्रति तास एवढा वेग धरू शकते अशी याची रनिंग कॅपॅसिटी आहे.