Lions Junior College ने शि.प्र.मं.क्रिकेट करंडक पटकावला.

Lions Junior College ने शि.प्र.मं.क्रिकेट करंडक पटकावला.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*

लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी द्वारा आयोजित शिक्षण प्रसारक मंडळ तालुका स्तरीय क्रिकेट करंडक स्पर्धा (२०२४) मुलींच्या अंतिम सामन्यात Lions Junior College ने लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाचा 13 धावांनी पराभव करून शिक्षण प्रसारक मंडळ क्रिकेट करंडक जिंकला. या विजयी संघात परिणीता माथनकर (कर्णधार), सुहानी काळे, सुहाना चौरसिया, श्रावणी गोबाडे,निलम देवहारी.

रेश्मा आवारी, मुस्कान जैन,त्रिशा कोंडागुर्ले, स्वरा करंडे, सृष्टी खाडे,रिया लोखंडे, तनुष्का पिसे, मानवी कटारिया व भाविका हेपट या खेळाडूंचा समावेश होता. लोकमान्य टिळक सभागृहात झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजयी संघास व क्रिडा प्रशिक्षक अविनाश उईके यांना पाहुण्यांच्या हस्ते करंडक देऊन गौरविण्यात आले. लायन्स इंग्लिश मिडीयम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे अध्यक्ष आमदार श्री. संजीव रेड्डी बोदकुरवार,उपाध्यक्ष बलदेव खुंगर.

सचिव सुधीर दामले, कोषाध्यक्ष चंद्रकांत जोबनपुत्रा, संचालक नरेंद्र बरडिया, शमीम अहमद, महेंद्र श्रीवास्तवा, लायन्स क्लबचे अध्यक्ष राजाभाऊ पाथ्रडकर, सचिव किशन चौधरी, प्राचार्य प्रशांत गोडे व दिपासिह परिहार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मुलींच्या विजयी संघाचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × 3 =