Link Ration Card With Aadhaar : भारतात प्रत्येक नागरिकांसाठी आता आधार कार्ड युनिक आयडेंटिटी नंबर सक्तीचे करण्यात आलेले आहे.{Unique Identity Number}देशातील नागरिक म्हणून आधार नंबर हा सिटीजनशिपचा महत्त्वाचा पुरावा मानला जातो.
{Aadhar Card} देशात आधार कार्ड वर आधारित अनेक शासकीय योजनाचा लाभ मिळतो तर आधार कार्ड दाखवल्याशिवाय बीपीएल रेषेत येणाऱ्या लोकांना रेशन कार्ड वर धान्य आणि इतर सरकारी सोयी सुविधाही मिळत नाही.
{BPL Card Holders}आता सरकारने राशन कार्ड वर नमूद कौटुंबिक व्यक्तींची नावे आणि त्यांचे आधार कार्ड वर असलेली नावे आणि नंबर ऑनलाईन लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
यामुळे बनावट आधार कार्ड आणि बनावट राशन कार्ड सारख्या प्रकरणातून सरकारला मुक्ती मिळेल सोबतच सर्वसामान्य नागरिकही शासकीय योजनांची लाभ आणि शिधा पुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाही.
सध्या विविध प्रकारे बनावट आधार कार्डच्या माध्यमातून बनावट रेशन कार्ड तयार करून याद्वारे स्वस्त राशन दुकानातून सरकारी शिधा,किंवा इतर सुविधा घेण्याचे प्रकार देशात वाढल्याचे प्रकरण समोर आलेले आहे.यामुळे केंद्र सरकारने आधार कार्ड संबंधात एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे.
आता प्रत्येक आधार कार्ड हा रेशन कार्ड सोबत लिंक करण्यात येणार आहे. महाराष्ट्रात सर्व राशन कार्ड धारकांना राशन कार्ड मध्ये नमूद आपल्या कौटुंबिक व्यक्तीच्या आधार कार्डची लिंकिंग ही राशन कार्ड सोबत करण्याचे निर्देश दिलेले आहे.यावर राज्यात अंमलबजावणी सुद्धा करण्यात येत आहे.
आता यासाठी मुदत सुद्धा पुन्हा वाढवून देण्यात असली आहे.मात्र नेमका आपला आधार कार्ड रेशन कार्ड सोबत कसा लिंक करायचा हे अनेकांना माहीत नसते, त्यामुळे आपण या माध्यमातून ही प्रक्रिया जाणून घेणार आहोत.{How To Link Aadhar Card With Ration Card}
Link Ration Card With Aadhaar असं करावा लागेल आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक.
- आपला आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करण्यासाठी राज्य शासनाच्या पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम ची वेबसाईट आहे.त्याच्यावर जावे लागेल.यासाठी आणखी एक सरकारी अधिकृत वेबसाईट खाली दिली आहे.यावर क्लिक करा.
https://nfsa.gov.in/sso/frmPublicLogin.aspx - यावर लॉगिन केल्यानंतर तिथे आधार कार्ड रेशन कार्ड सोबत लिंक करण्याचा पर्याय दिलेला असेल.aadhar Link. त्यावर क्लिक करताच तुमचा आधार कार्ड कौटुंबिक राशन कार्ड सोबत लिंक करता येते.
- येथे आपला आधार कार्ड आणि राशन कार्ड याचा नंबर नमूद करावा लागतो.
यानंतर राशन कार्ड आणि आधार कार्ड चे तपशील नमूद करावे. - आधार आणि रेशन कार्ड लिंक करण्यासाठी दिलेल्या अधिकृत मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल.
- हा ओटीपी मिळताच तो आधार राशन कार्ड लिंक करण्याच्या साइटवर ओटीपी नमूद करणाऱ्या जागेवर टाकायचा आहे.{OTP Must To Link Up Aadhar To Ration Card}
- हा ओटीपी नंबर तेथे नमूद करताच, राशन कार्ड आणि आधार नंबर संदर्भात तुमची ओळख नक्की होईल.
यानंतर तुमचा आधार आणि रेशन कार्ड लिंक झाल्याचा मेसेज येईल.
यानंतर आधार आणि रेशन कार्ड लिंक केले जाईल.
आधार रेशनला लिंक करण्यापूर्वी ह्या गोष्टी लक्षात घ्या.
- सरकारने आपला आधार कार्ड राशन कार्ड सोबत लिंक करणे अनिवार्य केले आहे. यामुळे राशन कार्ड संबंधित धान्य सेवा आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळणार आहे.
- आधार आणि राशन कार्ड लिंक करण्याआधी आपल्या राशन कार्ड वर कुटुंबातील जेवढे सदस्य नावे नमूद आहेत त्यांची आधार कार्ड राशन कार्ड सोबत लिंक करावी लागेल.
- रेशन कार्ड वर ज्यांची नावे आहेत त्या सगळ्यांचे आधार कार्ड एक एक करून रेशन कार्ड सोबत लिंक करता येईल.
- यासाठी वर दिलेले टिप्स फॉलो करा.
जर तुम्हाला वाटते की या शिवायही आधारवरची तपशील काही चुकले आहे,किंवा एखाद्या नाव चुकीचे टाकल्या गेली गेली आहे,त्यात स्पेलिंग ची चूक झाली असेल,तर ही चूक युआयडीएआय च्या वेबसाईटवर जाऊन विनामूल्य बदलता येते.
उल्लेखनीय म्हणजे 14 डिसेंबर 2024 पर्यंत आधार कार्ड राशन कार्ड लिंक करण्याची सेवा मोफत सुरू होती आता त्याची मुदत 14 जून 2025 पर्यंत वाढविण्यात आली आहे.
आधार राशन कार्ड लिंक करणे फायद्याचे.
आपला आधार कार्ड आणि रेशन कार्ड मध्ये स्वतःचा आधार कार्ड आणि कुटुंबातील इतर सदस्यांचा आधार कार्ड नंबर लिंक केल्यास राशन कार्ड धारकाचे सर्व तपशील एकमेकांसोबत लिंक होतात.यामुळे सरकारच्या विविध योजनांचा आणि मोफत शिधा,अन्न वाटप योजनेचा लाभ घेता येतो.
याशिवाय डिजिटल सिक्युरिटी सुद्धा वाढते.आधार आणि राशन कार्ड लिंक झाल्यास कोणीही आपल्या नावावर किंवा बनावट ओळखपत्र तयार करताच लगेच ओळखता येते, आणि आपल्या नावावर कुणीही शिधा घेऊ शकत नाही, किंवा फ्रॉड आणि आर्थिक फसवणुकीची शक्यताही टळते.
यामुळे आधार आणि रेशन कार्ड जोडणे आता आवश्यक आणि फायद्याचे झालेले आहे.