लाईनमनच्या विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू,नातेवाईकांचा रुग्णालयात आक्रोश.

उपजिल्हा रुग्णालयात तणावाची परिस्थिती पुसद.

प्रतिनिधी – पुसद विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या काळी( दौ.) येथे दि.१६ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता च्या दरम्यान येथील वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणातील विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करणाऱ्या खाजगी लाईनमन विठ्ठल सीताराम आढाव यांचा जब्बर विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती. सदरील घटना घडतात परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

घटनेचे गांभीर्य बघत काळी दौ पोलीस चौकीचे इंचार्ज बालाजी शेंगेपल्लू यांनी तातडीने अतिरिक्त पोलीस कुमक घटनास्थळी बोलावली होती. दि.१७ नोव्हेंबर रोजी मृतदेहाचे पोस्टमार्टम झाल्यानंतर नातेवाईकांनी व बिरसा ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला व उपजिल्हा रुग्णालय परिसरात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत एमएसईबी कडून संबंधित गुन्हेगार असलेल्या कनिष्ठ अभियंता निलंबित अथवा बडतर्फ करीत नाहीत व मृतक विठ्ठल आढाव यांच्या पत्नीस मोठी आर्थिक मदत त्वरित मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा निर्णय बिरसा ब्रिगेड व नातेवाईकांनी घेतला होता.

परिसरात आदिवासी समाजाच्या युवकांनी मोठा जमाव केल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अतिरिक्त पोलीस दल परिसरात तैनात केले होते. एमईसीबी चे कार्यकारी अभियंता संजय आडे यांनी आपल्या वरिष्ठांना सदर परिस्थितीशी अवगत केले. यवतमाळ एमईसीबी चे प्रभारी अधिक्षक अभियंता संजय खांगर यांच्यासोबतच आश्विन राठोड कर्मचारी संघटनेचे प्रशांत शिंदे यांनी उपस्थितांना मदती संदर्भात व कारवाई संदर्भात अस्वस्थ केले मात्र आंदोलकांनी लेखी पत्र व मदतीचा चेक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा निर्धार केल्यामुळे महावितरणचे अधिकारी चांगलेच गोंधळले होते.

बिरसा ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष मारुती भस्मे पांडुरंग व्यवहारे व नातेवाईक हे लेखी मागणीवर अटळ होते. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात तर घेणारच नाही असा निर्धार त्यांनी सोडला जर महावितरण ने मदत व लेखी पत्र दिले नाही तर महावितरणच्या विभागीय कार्यालयावर मृतदेह नेण्यात येईल असा गंभीर इशारा आंदोलकांनी दिला. महावितरण चे कार्यकारी अभियंता संजय आडे अधिक्षक अभियंता संजय खांगर यांनी अखेर आंदोलन आंदोलकांची मागणी पूर्ण करत मृतकाच्या पत्नीस महावितरण कडून नुकसान भरपाई म्हणून चार लाख रुपयांचा चेक आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते प्रदान केला.

आंदोलकांनी मृतकाच्या पत्नीस महावितरण कडून नोकरी व पेन्शनची मागणी सुद्धा करण्यात आली होती यामध्ये महावितरण कडून पेन्शन संदर्भात शब्द देण्यात आला आहे दरमहा तेरा हजार रुपयांची पेन्शन मृतकाच्या पत्नीस मिळेल असे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना आश्वासन दिले आहे. तर चौकशी अंतिम या प्रकरणात दोषी असणाऱ्या महावितरणच्या कनिष्ठ अभियंता व इत्यादींवर कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासनही यावेळी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले.

बॉक्स- पुसद विधानसभा मतदारसंघाचे आमदार इंद्रनील नाईक यांची अखेरशिष्टाई कामी आली. आमदार इंद्रनील नाईक तातडीने पुसद उपजिल्हा रुग्णालय गाठत त्यांनी आंदोलकांना साथ देत जोपर्यंत महावितरण कडून लेखी मदत चे पत्र व चेक मृतकाच्या पत्नीस देण्यात येत नाही तोपर्यंत मीही आपल्या सोबतच आहे. आमदारांच्या या भूमिकेमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तातडीने वरील प्रमाणे मदत व लेखी पत्र आमदार इंद्रनील नाईक यांच्या हस्ते मृतकाच्या पत्नीस व आंदोलकांना दिले. आमदार महोदयांनी महावितरणच्या कारभारावर संतप्त होत त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलेआपला कारभार सुधारा अन्यथा कारवाईला सामोरे जावा असा इशाराही आमदार महोदयांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिला.”. यावेळी रुग्णालय परिसरात छावणीचे स्वरूप आले होते ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेश राठोड शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश बेसरकर सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रेम कुमार केदार वसंतनगर पोलीस स्टेशनचे डीबीचे मुन्ना आडे यांच्यासह मोठ्या संख्येने पोलीस दल अतिरिक्त पोलीस तुकडी पोलीस प्रशासनाने तैनात केली होती यावेळी मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव परिसरात एकत्र जमला होता.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

twenty + 4 =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.