EV Car Lexus LF-ZC : दिल्लीच्या प्रगती मैदानात सुरू असलेल्या भारत 2025 मध्ये भारतात अनोखी आणि पावरफुल इलेक्ट्रिक कार सादर करण्यात आली आहे.Lexus या आंतरराष्ट्रीय ऑटोमोबाईल्स आणि मोटर कंपनीने भारतात पहिल्यांदा ही इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. Lexus LF-ZC असे या आधुनिक इलेक्ट्रिक कारचे नाव आहे.
या Lexus LF-ZC इलेक्ट्रिक कार बॅटरी सिस्टम एवढी पावरफुल आहे की, याची एकदा चार्जिंग केली तर कुणालाही मुंबई ते बेंगलोर असा थेट प्रवास एका चार्जिंग मध्ये गाठता येईल. भारताच्या मार्केटमध्ये ही पॉवरफुल इलेक्ट्रिक कार दाखल होणार असून यात आधुनिक फीचर्स,डिजिटल सिस्टम सह एखाद्या प्रायव्हेट जेट Private Jet Plane पेक्षाही जास्त आकर्षक आणि शानदार केबिन Modern Cabin बनविण्यात आला आहे.
भारतात सुरू असलेल्या मोबिलिटी ग्लोबल एक्स 2025 मध्ये ही कार सादर होताच, कार शौकिनांची याला पसंती मिळत आहे.विशेष म्हणजे या कारची एका चार्जिंग मध्ये दमदार रेंज एकूण तर सगळे आश्चर्यचकित होताना दिसत आहे.
लेक्सस ऑटोमोबाईल्सने नुकतेच आपल्या EV Car Lexus LF-ZC या नव्या इलेक्ट्रिकल कारचे आकर्षक Look या ग्लोबल ऑटो एक्स्पो मध्ये समोर आणले. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची इलेक्ट्रिक चार्जिंग सिस्टम आणि मायलेज रेंज आहे. कंपनीने यासाठी असा दावा केला आहे की एका फक्त एकदा चार्ज केल्यावर 1000 किलोमीटर ची रेंज देईल. आधुनिक इलेक्ट्रिक कार सेगमेंट मधील ही पहिली अशी कार आहे,जो इतका मायलेज देऊन नवा रिकॉर्ड बनवणार आहे.
- EV Car Lexus LF-ZC या कारचे आकर्षक आणि आधुनिक असे इंटेरियर डिझाईन देण्यात आले आहे.त्यामुळे यात लक्झरी फील असेल.
- शानदार इंटेरियर डिझाईन, जेट प्लेन मध्ये बसल्याचा होतो आभास.
- या कारमध्ये प्रवास करताना एका प्रायव्हेट जेट प्रमाणे अनुभव येईल,असा शानदार कॅबिन डिझाईन देण्यात आलेला आहे.
कंपनीने या इलेक्ट्रिक कार मध्ये ती प्रत्येक सुविधा दिलेली आहे जी एका लक्झरी कार मध्ये असते.
Powerful बॅटरी सिस्टम.
Lexus ऑटोमोबाईल्स या आंतरराष्ट्रीय कार कंपनीने या EV कार मध्ये नवीन आणि उच्चतंत्रज्ञानाची लीथीयम आयन बॅटरी सिस्टम वापरले आहे.या दमदार बॅटरी पॅक मुळे आणि चार्जिंग सिस्टम मुळे ही कार सर्वात जास्त लांब किलोमीटरची रेंज देणार आहे.एकूणच एलएफ-झेड सी ही अत्यंत शक्तिशाली इलेक्ट्रिक कार असून अगदी कमी वेळेत प्रति तास 100 किलोमीटरचा वेग गाठू शकणार आहे.
हे आहेत Lexus LF-ZC प्रगत सिस्टम.
या इलेक्ट्रिक कार मध्ये कंपनीने ऑटोमॅटिक पार्किंग सिस्टम डिजिटल ड्राईव्ह सिस्टम ड्रायव्हिंग असिस्टंट सिस्टम आणि कनेक्टेड टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे.
विविध आधुनिक फीचर्स आणि तंत्रज्ञानाचा या कारमध्ये समावेश करून LF- ZC बनविण्यात आली आहे.
एकूणच इलेक्ट्रिक कार भविष्यात येणाऱ्या पॉवरफुल इलेक्ट्रिक कारचे भविष्य दाखविते.
ही इलेक्ट्रिक कार फक्त पर्यावरणासाठीच नव्हे तर आपल्या दमदार कामगिरी आणि लक्झरी लूक साठी कार शौकिनांसाठी एक चांगला पर्याय बनणार आहे.