India’s Safest Banks : मागील काळात देशातील प्रमुख राष्ट्रीय बँक असलेली पंजाब बँकेत झालेली आर्थिक अफरातफर आणि बँकिंग सेक्टर मध्ये घोटाळेबाजीमुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार आणि बँकिंग ग्राहकांमध्ये आपल्या बँकिंग ठेवी संदर्भात चिंता निर्माण झालेली होती.
देशात पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँक सह इतर काही खाजगी बँकांमध्ये आर्थिक अपहार आणि घोटाळेबाजी झाल्याने या बँकांच्या शाखेबाहेर हजारो लोकांची गर्दी आपला पैसा परत घेण्यासाठी लागली होती.
त्यामुळे बँकिंग सेक्टर मध्ये हल्लकल्लोळ माजला होता. सध्याही राज्यात आणि देशात विविध बँकिंग घोटाळे गाजत आहे.सध्या Yes Bank प्रकरणही गाजत आहे.तर दुसरीकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाने आर्थिक अफरातफरमुळे एकदा पुन्हा न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँक वर प्रतिबंध घातला आहे.
त्याच्या आर्थिक व्यवहारावर आरबीआय (Reserve Bank Of India)पूर्णपणे बंदी घातलेली आहे,.या सर्व घडामोडी पाहता देशभरातील ठेवीदार आणि बँकिंग ग्राहकांमध्ये पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी आणि बँकिंग व्यवहारासाठी विश्वासू बँक कोणती असू शकते,यावर चर्चा सुरू झालेली आहे.
तर चला…. आपण जाणून घेऊया, रिझर्व बँक ऑफ इंडियाची देशभरात सर्वात विश्वासू बँका कोणत्या आहेत,की यांच्यात ठेवीदारांचा आणि बँक ग्राहकांचा पैसा कधीच बोलणार नाही असा आरबीआयला ठाम विश्वास आहे…..
सध्या देशात बँककरप्ट होत असलेली येस बँक YES BANK च्या आर्थिक कमजोरीमुळे देशभरात या बँकेचे इन्वेस्टरसाठी आणि ग्राहकांमध्ये चिंतेचा वातावरण असतानाच आता याच बँकेला आर्थिकरित्या बरबादी पासून बाहेर काढण्यासाठी देशाची प्रमुख बँक असलेली स्टेट बँक ऑफ इंडिया ने मदतीचे पाऊल पुढे केले आहे.
स्टेट बँक ही आरबीआयची प्रमुख विश्वासू बँक,आणि केंद्र सरकार,राज्य सरकार आणि सरकारी उपक्रमांसाठी सर्वात मोठी आर्थिक व्यवहार करणारी बँकिंग क्षेत्र आहे. आणि याच बँकेची मदत घेऊन आता आरबीआय आणि केंद्र सरकारने येस बँकेला दिवाळखोरीत जाऊ नये यासाठी आर्थिक मदत पुरवण्यासाठी, पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.
उल्लेखनीय म्हणजे देशात आरबीआय आणि केंद्र सरकार बँकिंग सेक्टर वर नेहमी लक्ष ठेवून असते, देशात प्रमुख बँका आर्थिक दिवाळखोरीत जाऊ नये,यासाठी आरबीआय खूप अलर्ट असते.
कोणतीही मोठी बँक अशा प्रकारे आर्थिक संकटात आली तर आरबीआय तात्काळ पावली उचलते.Yes बँकेच्या बाबतीतही सरकार आणि आरबीआयने त्याला आर्थिक दिवाळखोरीपासून वाचविण्यासाठी आता पावले उचलली आहे.
अशी सतर्क असते आरबीआयची यंत्रणा.
- भारतात संपूर्ण बँकिंग सेक्टर चे संचालन आणि यासाठी नियमन करण्याची प्रमुख जबाबदारी आर्थिक क्षेत्रातील शिखर संस्था असलेली रिझर्व बँक ऑफ इंडिया कडे महत्त्वाची जबाबदारी आहे.(RBI System).
- देशभरातील सर्व राष्ट्रीय,खाजगी आणि निमसरकारी बँकांच्या कामांचा आरबीआय वेळोवेळी आढावा घेऊन त्यांच्यासाठी आर्थिक नियमन आणि गाईडलाईन तयार करून त्याचे पालन करून घेते.
- यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाचे अधिकारी सतर्क असतात. बँकांची त्यांच्याकडून वेळोवेळी तपासणी केली जाते.
- आरबीआयकडून प्रमुख सहकारी क्षेत्रात असलेली मध्यवर्ती बँकांचे आर्थिक व्यवहारावर करडी नजर असते.
- या सहकारी बँकांचे ऑफ साईट निरीक्षण आणि बँकिंग मालमत्तेचे गुणवत्ता ऑडिट,अशा बँकांकडे इन्व्हेस्टमेंट आणि भांडवलाची पर्याप्त सुविधा आणि फायनान्शिअल रिस्क घेण्याची किती क्षमता आहे याचे आरबीआय कडून मूल्यांकन केले जाते.
- एकंदरच ह्या सर्व बाबी रिझर्व बँक कामकाजाच्या अंतर्गत कामकाजाचा हिस्सा आहे.या सदर्भात आरबीआय कधीही माहिती सार्वजनिक करीत नाही, पण असे करताना अशा बँकांमध्ये काहीही चुकीचे आर्थिक बाबी समोर आल्या तर RBI सतर्क होऊन त्याच्याकडून अशा बँकांना अलर्ट जारी करण्यात येते.
- या संदर्भात आरबीआयची ही कार्यप्रणाली सार्वजनिक डोमेन मधील एक महत्त्वाचा भाग असतो.
उल्लेखनीय म्हणजे आरबीआय कधीही देशातील कोणत्याही बँकेवर पूर्णतः बंदी घालत नाही.अशा बँकांना आर्थिक सुधार करण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात येतो,मात्र अशा बँकेची जर आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली असेल,तर या बँकेत ठेवीदारांचे पैसे बुडू नये आणि निधी सेफ राहावा,यासाठी त्यांच्या आर्थिक कामकाजावर आरबीआय कडून पूर्णतः निर्बंध लादले जातात.
आरबीआयचे निर्बंध आणि बँकेवर बंदीमुळे ग्राहकांचे नुकसान होत नाही.
उल्लेखनीय म्हणजे बँकांमध्ये आर्थिक अपरातफर झाली किंवा अशा बँका बुडीत परिस्थितीवर आल्या, तर आरबीआय कडून निर्बंध आणि बंदीची कारवाई होते.
मात्र आरबीआयच्या अशा कारवाईमुळे संबंधित बँकांच्या ग्राहकांच्या आर्थिक नुकसान होऊ नये याची आरबीआय दक्षता घेते कारण देशभरात बँकांमध्ये ठेवीदारांच्या ठेवीवर आधीच विमा आणि क्रेडिट गॅरंटी कार्पोरेशन ही शासकीय संस्था विमा काढत असते.
Banking ग्राहकांच्या 5 लाख रुपयापर्यंतच्या सर्व ठेवींवर ही गॅरंटी कॉर्पोरेशन विमा सुरक्षा देते.यामुळे अशा बँकांमधील ग्राहकांना त्यांची ठेवीवरील संपूर्ण 5 लाख रुपयांपर्यंत परत मिळण्याची गॅरंटी असते,आणि या रकमेचे कोणतेही नुकसान बँक बुडाल्याने होत नाही.
India’s Safest Banks : या 3 बँका आहेत आरबीआयच्या सर्वाधिक विश्वासु
बँकांमध्ये आर्थिक घोटाळेबाजीची शक्यता असल्याने नेहमी ठेवीदारांमध्ये चिंतेचे वातावरण असते,मात्र रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अखत्यारीत येणाऱ्या देशातील 3 अशा प्रमुख बँक आहे, ज्यांच्यावर आरबीआयचा सर्वात जास्त विश्वास आहे.कारण या बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम मजबूत आहे, प्रत्येक बँकासारखे या तीन बँकाही आरबीआयच्या नियमानाखाली येतात,मात्र आरबीआयच्या बँकिंग सूचित देशातील या तीन बँका “टू बिग टू फेल” या प्रमुख श्रेणीत येतात.
या 3 बँका आहेत
- State Bank Of India
- HDFC
- ICICI
देशात या 3 अशा बँक आहेत,जे आपल्या आर्थिक व्यवसायात आणि आर्थिक आकाराने इतक्या विस्तारलेल्या आणि आर्थिक मजबूत आहेत की,त्यांची बुडण्याची शक्यता जवळपास शून्य आहे.या बँका कधीच बुडणार नाही,असा आरबीआयचा ठाम विश्वास आहे.
वरील तीन बँकांमध्ये देशाची सर्वात मोठी शासकीय बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आरबीआयच्या विश्वासु यादीत पहिल्या क्रमांकावर येते, आणि इतर दोन बँका एचडीएफसी आणि आयसीआयसीआय या खाजगी बँक असल्या तरीही त्या आरबीआयच्या विश्वासू श्रेणीत आहे.
त्यामुळे देशभरातील बँकिंग ग्राहक आणि गुंतवणूकदार या प्रमुख तीन बँकांमध्ये आपला पैसा सुरक्षितरित्या ठेवू शकतात,कारण या बँकांमध्ये जमा केलेला पैसा नेहमीच सुरक्षित राहून या बँका कधी बुडणार नाही असा आरबीआयला विश्वास आहे.