Lawrence Bishnoi गैंगचे हे आहेत टॉप 5 टार्गेट, NIA तपासात नाव आले समोर.
शनिवारी मुंबईतील बांद्रा वेस्ट भागात माजी मंत्री तसेच
राष्ट्रवादी (,अजित पवार) पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या करण्यात आली.त्यामुळे संपूर्ण देशात खळबळ माजली आहे.बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमागे कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई ने हत्येची जबाबदारी स्वीकारत पोस्ट केली आहे.आता आता नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अर्थातच NIA या तपास एजन्सीकडून लॉरेन्स बिश्नोई यांचे देशात पाच मोठे टारगेट कोण आहेत हे नाव तपासा दरम्यान समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस क्राईम ब्रँच याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. पण यानिमित्ताने लॉरेन्स बिश्नोईबाबत आणखी काही धक्कादायक माहिती समोर येत असून यानंतर फिल्म अभिनेते सलमान खान यांच्या सह आणखीन कोण लोक आहेत जे या गँग चे टार्गेट असू शकते याची शक्यता एन आय ए ने वर्तविली आहे,यावर सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
हे आहेत टॉप फाईव्ह टारगेट :
मुंबईत शनिवारी अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कुख्यात बिश्नोई गँग असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर येत आहे. विशेष म्हणजे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा सध्या गुजरातमधील साबरमती तुरुंगात कैद आहे. पण लॉरेन्सच्या इशाऱ्यावरच त्याच्या बिश्नोई गँगमधील अनेक गुंड विविध ठिकाणी गंभीर गुन्हे घडवून आणत आहेत.पूर्वी पासूनच नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी (NIA) अनेक गुन्हे प्रकरणांत लॉरेन्स बिश्नोई याची चौकशी करीत आहे.दरम्यान नुकतेच एनआयएच्या चौकशीत लॉरेन्सने त्याच्या समोरील 5 टार्गेट्स संबंधात खुलासा केला होता. यात बॉलिवूड अभिनेते सलमान खान यांचे नाव लॉरेन्स बिश्नोई गँगच्या पहिल्या क्रमांकावर आहे.
सलमान खान टॉप फाईव्ह मध्ये टॉप वर.
एनआयएच्या तपासादरम्यान लॉरेन्स बिश्नोईने चित्रपट अभिनेते सलमान खान आपल्या टार्गेटमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याचं सांगितलं आहे.राजस्थान मध्ये बिश्नोई समाज ज्याला पुज्य मानते. 1998 या वर्षात चित्रपट हम साथ साथ है च्या शूटिंग दरम्यान जोधपूर येथे काळवीट हरणाची शिकार करण्यात आली होती या प्रकरणात फिल्म अभिनेते सलमान खान यांना तुरुंगात जावे लागले होते.सलमान खानने काळवीटची शिकार केल्याने सलमान खान वर बिश्नोई समाजाचा असलेला लॉरेन्स हा तेव्हा पासूनच नाराज आहे.त्यामुळेच त्याच्या गँग कडून सलमान खानला मारण्यासाठी दोन वेळा त्याच्या घराची आणि फार्महाऊसची रेकीसुद्धी करण्यात आली होती.यासाठी लॉरेन्स बिश्नोई याने संपत नेहरा या आरोपीला रेकी करण्यासाठी मुंबईला पाठविले होतं.यानंतर काही महिन्यांपूर्वी सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी या अपार्टमेंटबाहेर गोळीबार करण्यात आला होता.नंतर हरियाणा एटीएसने या गोळीबार प्रकरणात आरोपी संपत नेहरा याला अटक केली आहे.
सगुनप्रीत सिंह.
लॉरेन्स बिश्नोईच्या टार्गेटवर दुसऱ्या क्रमांकावर पंजाबी गायक सिद्धू मुसावालाचा मॅनेजर सगु्नप्रीत सिंह आहे. सगुनप्रीत याने लॉरेन्स बिश्नोई गँगचा अगदी खास असलेला विक्की मुद्दुखेडा याची हत्या करणाऱ्या आरोपीला आश्रय दिला होता.विक्कीला लॉरेन्स हा आपल्या भाऊ मानत होता. एन आय ए च्या तपासातून ते समोर आली आहे की, लॉरेंसचा दुसरा मोठा टारगेट सगुणप्रीत सिंह हा आहे.
गँगस्टर मनदीप धालीवाल.
लॉरेन्स बिश्नोई गँगचा तिसरा सर्वात मोठा टारगेट हा एक गैंगस्टर असून तो मनदीप धालीवाल हा आहे.धालीवाल हा हरियाणातील बंबीहा गँगचा प्रमुख असून तो लक्की पटियाल या इतर एक गैंगस्टरचा खास मानला आहे. लोरेंसचा निकटवर्ती विक्की मुद्दुखेड्या याच्या मारेकऱ्यांना मनदीप धालीवाल याने मदत केली होती,त्यामुळे त्याची हत्या करण्याचा कट लॉरेन्स बिश्नोईने आखले आहे,ही माहिती एनआयएच्या तपासातुन समोर आली आहे.
गँगस्टर कौशल चौधरी.
बिश्नोई गँगचा चवथा टारगेट सुद्धा एक गँगस्टरच आहे.त्याचे नाव गँगस्टर कौशल चौधरी असून तो सध्या गुरुग्राम येथील तुरुंगात आहे. बिश्नोई गँग आणि कौशल चौधरी या दोन्ही गँगमध्ये दुश्मनी आहे. लॉरेन्स गँगच्या विक्की याच्या हत्येनंतर कौशल चौधरीने पोलिसांना दिलेल्या आपल्या कबुली जबाबात त्याने विक्कीचे मारेकारी भोलू शुटर,अनिल लठ तसेच सन्नी ले्फ्टी या तिघांना हत्येसाठी शस्त्रे पुरवली होती. त्यामुळे लॉरेन्स याच्या बदला घेण्यासाठी या गँगस्टरची हत्या घडवून आणू शकते अशी माहिती तपासातून समोर आली आहे.
अमित डागर.
लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर पाचव्या क्रमांकावर अमित डागर हा आहे.तो सुद्धा बंबीहा गँगचा प्रमुख आहे.यापूर्वी बिश्नोई गँग आणि बंबीहा गँगमध्ये अनेकदा चकमकी झाल्या आहेत.कारण बंबोही गँगने लक्की पटियाल याच्या सांगण्यावरून गोल्डी बराडचा भाऊ गुरलाल बराड याची हत्या केली होती.सोबतच बंबीहा गँगने विक्की मुद्दुखेडाच्या मारेकऱ्यांना लपण्यावित मदत केली होती.