Latest Maharashtra Survey : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत बंपर विजय संपादन करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या ताज्या सर्वेनुसार येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणूक मध्ये या पक्षाला टेन्शनचा सामना करावा लागणार आहे.नुकतेच भाजपाकडून अंतर्गत सर्वे करण्यात आला आहे. महाराष्ट्रात महाविजय मिळविल्यानंतर महायुती मधील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भाजपला या अंतर्गत ताज्या सर्वेने नागपुरात चिंतेमध्ये टाकल्याचे दिसत आहे.
महत्वाचे म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा विदेश मध्ये दावोस दौऱ्यावर आहेत. तेथे महाराष्ट्रात विदेशी गुंतवणूक साठी ते प्रयत्न करीत आहेत तर दुसरीकडे राज्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी नागपुरातच फडणवीस यांचा टेन्शन वाढताना दिसत आहे यासाठी आता भाजप संघटन सक्रिय झाले आहे. नेमक या सर्वेमुळे भाजपची नागपूरमध्ये चिंता का वाढली हे आता आपण या माध्यमातून जाणून घेवू या.
शिर्डी BJP अधिवेशनात महापालिका निवडणुकांसाठी चर्चा.
नुकतेच शिर्डीमध्ये भाजपचे दोन दिवस अधिवेशन झाले. त्यात महाराष्ट्राचे नवे भाजप कार्याध्यक्ष म्हणून माजी मंत्री असलेले रवींद्र चव्हाण यांना जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
या अधिवेशनात येणाऱ्या एप्रिल मे महिन्यात महाराष्ट्रात होऊ घातलेल्या महानगरपालिका आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची निवडणूक तयारीचा सुद्धा आढावा घेण्यात आला.राज्यातील महत्त्वाचे महानगरपालिका असलेल्या मुंबई ठाणे, नागपूर आणि नवी मुंबई या महापालिका निवडणुकांसाठी भाजपची रणनीती काय असेल यावरही शिर्डी अधिवेशनात चर्चा करण्यात आली.
यात भाजपचे निवडणूक चाणक्य असलेले आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्र भाजपला महापालिका जिल्हा परिषद आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये विजयाचे मोठे लक्ष निर्धारित करून दिलेली आहे.
महाराष्ट्रातील येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राज्यात महाविकास आघाडीचे पक्ष आणि महायुती मधील पक्ष आपापल्या परीने इलेक्शन स्ट्रेटेजी बनवीत आहे.यात भाजपने आपल्या प्रदर्शनासाठी नुकतेच एक सर्वे सुरू केले आहे.
या माध्यमातून भाजपने सध्या असलेले विद्यमान नगरसेवक आणि इतर लोकप्रतिनिधी बाबत जनतेची काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांचे काय मत आहेत हे जाणून घेण्यासाठी या सर्वेला सुरुवात केलेली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपनेते शाह यांचा गुजरात फार्मूला वापरणार?
शिर्डी अधिवेशनात भाजप नेते अमित शहा यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य निवडणुकामध्ये जर जुन्या जनप्रतिनिधी विरुद्ध निवडणूकपूर्व जनतेचा नकारात्मक कल असेल आणि त्यांचा वर्क रिपोर्ट कार्ड निगेटिव्ह असेल तर नवीन चेहऱ्यांना मौका देऊन गुजरात फार्मूला वापरण्याचे निर्देश दिले आहे.
यामुळे निवडणुकांसाठी तयारी करीत असतानाच आता भाजपने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये भाजप राज्यात कसा प्रदर्शन करू शकते ? याचा अंतर्गत सर्वे करणे सुरु केले आहे.
यात जनतेचा कल कसा राहणार,आणि मागील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर भाजपचे नगरसेवकांची कामगिरी बाबत माहिती काढण्यात आलेली आहे.
नागपूर मध्ये भाजप सर्वे चर्चेत.
महत्त्वाचे म्हणजे भाजपच्या या अंतर्गत सर्वेची नागपूर मधून सुरुवात करण्यात आली.मात्र या सर्वे मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गृहशहर असलेल्या नागपूर मध्ये भाजपच्या 40 टक्के नगरसेवकांबाबत निगेटिव्ह अशी रिपोर्ट समोर आलेली आहे.
यामुळे नागपूर मध्ये भाजपची चिंता वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागपुरात विद्यमान नगरसेवकांबाबत जनतेत झालेली नकारात्मक प्रतिमा आणि निगेटिव्ह रिपोर्ट कार्ड लक्षात घेऊन, भाजप आता येथे नवीन चेहऱ्यांना नगरसेवक पदासाठी उमेदवारीची संधी देऊ शकते?अशी शक्यता निर्माण झाली आहे.
भाजपचे विद्यमान एकूण 40% नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक?
भाजपने नागपूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी हा सर्वे केलेला आहे.भाजपमधील आतील गोटाकडून माध्यमांना देण्यात आलेल्या माहितीनुसार,नागपूर मध्ये या सर्वेत नागपूर महानगरपालिकेत असलेले भाजपचे विद्यमान एकूण 40% नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड हे नकारात्मक असल्याचे बोलल्या जात आहे.
त्यामुळे निगेटिव्ह कामगिरीमुळे भाजप यापुढील उमेदवारी यादीत या विद्यमान नगरसेवकांचा पत्ता कट करू शकते.यामुळे नागपूर महानगरपालिका निवडणुकीची तयारी करीत असलेल्या विद्यमान भाजप नगरसेवकांमध्ये उमेदवारी मिळेल की नाही अशी एकूणच चिंता वाढलेली असल्याचे बोलले जात आहे.
भाजपकडून नेहमी निवडणुकीपूर्वी उमेदवार ठरविण्यासाठी विविध सर्व केले जातात. यानंतर निवडणुकीसाठी कोणता उमेदवार योग्य आहे हे निश्चित करून भाजपच्या निवडणूक पॅनल द्वारे उमेदवारी निश्चित केली जाते.
नागपूर महानगरपालिका मध्ये विद्यमान महापौर आणि नगरसेवकांचा कार्यकाळ खूप आधी संपलेला आहे.येथे महानगरपालिकेचा कामकाज प्रशासक सांभाळत आहे.
यापूर्वी नागपूर महानगरपालिकेसाठी 2017 या वर्षात झालेल्या निवडणुकीत भाजपने यशस्वी कामगिरी करीत 108 जागा जिंकल्या होत्या.मागील पंचवार्षिकच्या तुलनेत भाजपने 2017 मध्ये आपल्या जागांमध्ये 46 जागांची वाढ केली होती.
2017 ला नागपूर महानगरपालिकेत काँग्रेसने 29 जागा,बीएसपी ने 10 आणि शिवसेनेने 2 जागा जिंकल्या,तर आणि राष्ट्रवादी 1 आणि अपक्ष 1 असे दोन जागा गेल्या होत्या.
संघाच्या मुख्यालयमुळे नागपुर भाजपसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाची महानगरपालिका?
मुंबई ठाणे आणि पुणे नगरपालिकेसाठी भाजपसाठी नागपुर ही महाराष्ट्रातील महत्त्वाची महानगरपालिका आहे. कारण येथे भाजपचे मातृ संघ असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपूर येथे आहे.
त्यामुळे या महानगरपालिकेत भाजपला आपले गड राखणे महत्त्वाचे आहे.सोबतच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रात महत्त्वाचे मंत्री असलेले नितीन गडकरी हे नागपूरचे आहेत.
त्यामुळे या महानगरपालिकेवर सत्ता काबीज करून ठेवणे यावेळी भाजपला नगरसेवकांच्या निगेटिव्ह रिकार्डमुळे जड जाणार की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
भाजपचे नागपुरात 150 जागा लढून 130 जागा जिंकण्याचे लक्ष!
विशेष म्हणजे यापूर्वी देवेंद्र फडणवीस हे नागपुरात नगरसेवक बनवून महापौर पदापर्यंत पोहोचले होते.ते तीन वेळा मुख्यमंत्री झालेत.महाराष्ट्रात त्यांनी विधानसभा निवडणुकित विजयाचा मोठा लक्ष्य ठेवला होता.
मात्र आता त्यांच्या होम ग्राउंड वर त्यांच्याच पक्षाच्या नगरसेवकांचा नकारात्मक कार्य रिपोर्ट या सर्वे मध्ये समोर आला आहे.आता नागपुरात भाजप नेते अमित शहा यांनी ठरवून दिलेल्या गुजरात फार्मूल्यानुसार भाजप ही निवडणूक लढणार असल्याचे बोलल्या जात आहे.
कारण महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत मोठा विजय प्राप्त केल्यानंतर,स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विशेषकरून नागपूर महानगरपालिकेसाठी भाजपने एकूण 150 जागा लढून 130 जागा जिंकण्याचे लक्ष समोर ठेवले आहे.