Ladki Bahin Yojana : राज्यात सुरू असलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेचे निकषात जे बसत नाहीत आणि लाभ घेत आहेत,त्यांनी आपले नाव स्वतः बाहेर काढले नाही तर,त्यांच्या अर्जांची पडताळणी होऊन,अपात्र ठरवून दिलेले पैसे दंडासहीत वसूल करण्यात येणार आहे? या पूर्वी लाभार्थींची जर तक्रार आल्यास अर्ज पुन्हा पडताळणीचे संकेत कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी दिले होती.
आता या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी अत्यंत महत्त्वाच्या भाष्य करीत, जे पात्र नाहीत, लाभ घेतले पण आता त्यांनी आपली नावे योजनेतून बाहेर काढली नाही,तर त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल करावा,असा सल्ला सरकारला दिला आहे.
नावे स्वतः बाहेर काढली नाही तर दंडासह पैसे वसूल करा!
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने संदर्भात महत्त्वाचे भाष्य करताना म्हटले आहे की,जे लाभार्थी अपात्र आहेत, आणि यानंतरही ज्यांनी लाभ घेतलेला आहे,त्यांनी या योजनेतून आपली नावे बाहेर काढावी,किंवा त्यांच्याकडून दंडासह पैसे वसूल करावे असा सल्ला सरकारला दिला आहे.
भुजबळ म्हणाले आहेत की,लाडकी बहीण योजनेतून गरीब कुटुंबांना आणि महिलांना लाभ झाला पाहिजे या उद्देशाने सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली होती.यामध्ये जे नियम बनविण्यात आले होते, त्यात एका कुटुंबातील दोन महिलांना या योजनेतील पैसे देता येणार नाही,ज्यांच्याकडे मोटार गाडी असेल किंवा जास्त उत्पन्न असेल तर त्यांनाही पैसे देता येणार नाही.
गरिबांना याचा लाभ झाला पाहिजे हा मुख्य उद्देश होता,जे लोक या योजनेच्या नियमात बसत नाहीत,पण तरीही लाभ घेतला,त्यांनी या योजनेतून आता आपली स्वतः नावे काढली पाहिजेत.अश्याना आतापर्यंत जे पैसे दिले गेले ते आता परत मागण्यात काहीच अर्थ नाही, आणि ते मागितलेही जावू नये,पण यापुढे जे नियमात बसत नाही त्यांनी स्वतः आपली नावे या योजनेतून काढली पाहिजे, या योजनेसाठी अपात्र असतानाही या योजनेचे लाभ घेतले आहे, आता त्यांनी आपली नावे योजनेतून बाहेर काढली नाही, तर अशा लोकांकडून दंडासह पैशांची वसुली करावी असा सल्ला छगन भुजबळ यांनी दिला आहे.
राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यात सुरु असलेल्या लाडकी बहीण योजनेवर दिलेल्या या प्रकारच्या प्रतिक्रियेनंतर आता ज्या महिला या योजनेच्या लाभासाठी पात्र नाही,त्यांचे नाव सरकार कडूनही काढल्या जावू शकते,सोबतच अपात्र लाभार्थ्यांनी स्वतःहून आपली नावे या योजनेतून बाहेर काढली नसेल तर अशा लाभार्थी महिलांला दिलेले पैसे आता दंडासहित पैसे वसूल केले जाणार,ही शक्यताही समोर आली आहे. त्यामुळे सरकार यानंतर पुढचे पाऊल काय उचलले हे पाहणे खूप महत्त्वाचे ठरणार आहे.
तक्रार आल्यास अर्जांची पुन्हा पडताळणी होणार!
उल्लेखनीय म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या निकषात जे बसत नाहीत त्यांच्या संबंधात तक्रार आली तर, अशा लाभार्थींचे अर्ज पुन्हा पडताळणी होणार असे कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की, ज्या महिलांच्या कुटुंबाचा उत्पन्न हा अडीच लाखांपेक्षा जास्त असेल,ज्या महिलांकडे चार चाकी वाहन असेल या महिलांचा आधार कार्डचा नाव वेगळं आणि बँकेच्या खात्यात नाव वेगळं आहे, अशा महिला संबंधात तक्रार आली तर,त्यांचे अर्जांची पडताळणी होईल,मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर या संबंधात शासकीय जीआर मध्ये सध्या कोणताही बदल करण्यात आलेला नाही.