कृषी केंद्राची विधेयक मागे घ्या या मागणीसाठी तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद.

कृषी केंद्राची विधेयक मागे घ्या या मागणीसाठी तीन दिवस कृषी सेवा केंद्र बंद.

नायगाव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर

कृषी केंद्रातून विक्री होणाऱ्या खते बियाणे व औषधी ह्या शेती उपयोगी साहित्याचे सीलबंद विक्री करीत असताना सदरील मालाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाल्यास आणि शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास याबाबत दोषी ठरवून राज्य शासन कृषी सेवा केंद्रांवर वेगवेगळ्या कलमाखाली गुन्हे दाखल करून तुरुंगात डांबण्याचे विधेयक / कायदे राज्यात आणू पाहत असून याबाबत कृषी सेवा केंद्राच्या राज्य स्तरावरील संघटनेने शासनाला निवेदन दिले.

पंढरपूर येथे राज्यस्तरीय कृषिसेवा केंद्र चालकांचे अधिवेशन झाले यावेळी कृषि मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत शासन योग्य निर्णय घेईल असे सांगीतले होते.
कृषी सेवा केंद्र चालकांचे अधिवेशन होऊन महिना उलटला तरी राज्य शासनाने संबंधित कृषी सेवा केंद्र चालकांचे विधेयक मागे घेतले नसल्यामुळे परवा दिनांक 2 नोव्हेंबर 2023 ते 4 नोव्हेंबर या तीन दिवस नायगाव तालुक्यातील कृषी सेवा केंद्र चालकांची दुकाने बंद आंदोलन केली होती.

तिसऱ्या दिवसी झालेल्या बैठकीत कृषी सेवा केंद्र चालकांचे तालुकाध्यक्ष प्रकाश पाटील भरकाड, सचिव तिरुपती पाटील वडजे, संगमनाथ कवटीकवार यांनी यावेळी आपली मनोगत व्यक्त केली. झालेल्या चर्चेत ते म्हणाले की, आम्ही कृषी सेवा केंद्र चालक कोणतेही माल उत्पादन करीत नाही. ठोक विक्रेत्याकडून सीलबंद असलेले खते बियाणे आणि औषधे आम्ही दुकानात ठेवून त्याची शेतकऱ्यांना विक्री करतो.

सदरचे उत्पादने कुठल्या दर्जाचे आहेत हे तपासण्याची यंत्रणा आम्हा कृषी सेवा केंद्र चालकाकडे उपलब्ध नाही. मग असे असताना एखादे उत्पादन निकृष्ट दर्जाचे किंवा कमी दर्जाचे असल्याने याबाबत विक्री झाली म्हणून त्याचा दोष आम्हा कृषी सेवा केंद्र चालकांवर ठेवणे हे चुकीचे असून, शासनाला याबाबत कार्यवाही करायचीच असेल तर सदरील कमी दर्जाच्या मालाचे उत्पादन करणाऱ्या ्कंपनीवर दोष सिद्ध करून कार्यवाही करणे अपेक्षित असताना, कृषी मालाच्या कमी दर्जाबाबत कृषी सेवा केंद्र चालकांना दोषी ठरवणारा कायदा विधिमंडळात आणण्याचा घाट राज्य शासन का करत आहे.

यास आपला विरोध असल्याचे मत येथे उपस्थित असलेल्या कृषी सेवा केंद्र चालकांनी व्यक्त केले. यावेळी कृषी सेवा केंद्राचे मालक श्रीनिवास जवादवार, दशरथ बच्चेवार ,रमेश मामीडवार सुभाष पाटील डोणगावकर, विनोद गंजेवार, जयराज केते, पांडुरंग अडकिने, रामराव कल्लाळे, आनंदा जाधव, गोविंद हत्ते, दिगंबर ताटे, हनुमंत बोमलवाड, सचिन पवळे, अजिज कल्यापुरे, शिवानंद वडजे, माधव गाडे, शंकर अकले, दिलीप बोयाळ, मारुती मोरे.

उद्धव संगेपवार, दत्तात्रय ताटे, तसेच संगमेश्वर कृषी सेवा केंद्र नायगाव वरळीकर कृषी सेवा केंद्र नरसी तिरुपती कृषी सेवा केंद्र नाशिक शिवकृपा कृषी सेवा केंद्र नायगाव तुकामाई कृषी सेवा केंद्र रुई व्यंकटेश्वर कृषी सेवा केंद्र कुंटूर जय हनुमान कृषी सेवा केंद्र कुंटूर शिवशंकर कृषी सेवा केंद्र वराळा शिवा कृषी सेवा केंद्र नायगाव साईबाबा कृषी सेवा केंद्र नायगाव सचिंतन कृषी सेवा केंद्र कुंटूर संगमेश्वर कृषी सेवा केंद्र जळगाव.

प्रगत शेतकरी कृषी सेवा केंद्र नायगाव शेतकरी कृषी सेवा केंद्र नायगाव ओंकार कृषी सेवा केंद्र देगाव शिवशंकर कृषी सेवा केंद्र देगाव बालाजी कृषी सेवा केंद्र देवगाव जय किसान बीज भांडार नायगाव वरद कृषी सेवा केंद्र नरसी बळीराजा कृषी व केंद्र नायगाव जयराज कृषी केंद्र नायगाव बालाजी कृषी सेवा केंद्र नायगाव गजानन कृषी सेवा केंद्र नायगाव दशरथ कृषी सेवा केंद्र नायगाव शिवकृपा कृषी सेवा केंद्र नरसी न्यू सुंदर ऍग्रो भांडार नायगाव साईबाबा केंद्र कुंटूर इत्यादी कृषी सेवा केंद्राचे मालक प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

nineteen − fourteen =