बाभुळगाव शहरात क्रांतीसूर्य Birsa Munda Jayanti उत्साहात साजरी.
बाभुळगाव ता, प्र. : मोहम्मद अदीब
जणनायक Birsa Munda Jayanti निमित्त पारंपरिक वाद्यसह,वेषभूशेत निघालेल्या भव्य रॅलीने वेधले लक्ष.
देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी व आदिवासी समाजासाठी वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी शहीद झालेल्या क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या अस्तित्वाची ओळख व्हावी व त्यांनी घडवलेल्या क्रांतिकारी इतिहासाची या युगात सदैव आठवण व्हावी या करीता जननायक क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या १४८ व्या जयंती निमित्त बाभुळगाव शहरात भव्य रॅलीचे आयोजन दिनांक १५ नोव्हेंबरला सकाळी 10 वाहता क्रांतीसूर्य बिरसा मुंडा जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले.
स्थानिक भिमालेपण देवस्थान येथून पूजन करून पारंपरिक वाद्य ढोल फेफारे व पारंपरिक वेषभूषा धारण करून करून आदिवासी समाजा च्या रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली शहरातील प्रमुख मार्गाने काढण्यात आली त्यानंतर स्थानिक बिरसा मुंडा चौकातील बिरसा मुंडाच्या तैलचित्र जवळ प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले त्यानंतर उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
https://youtu.be/Nwkv6QbkDSk?si=kC5-CKOlM-Ma5rsk
या कार्यक्रमाला नगराध्यक्षा संगीताताई मालखुरे,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष श्रीकांत कापसे,उपनगराध्यक्ष श्याम जगताप,नगर सेविका सौ रेणुका अंकुश सोयाम,नगर सेवक चंद्रशेखर परचाके,अमर शिरसाठ,अनिकेत पोहोकार,अरुण पंधरे, पेंदोर साहेब सुभाष मसराम बंडू भाऊ नवाडे,सुनील मडावी,गुणवंत वरखडे,अंकुश सोयाम,किशोर मसराम गणेश उईके,विनोद अर्क,राहुल गेडाम,संजय परचाके.
वलके,रमेश गेडाम,विनोद परचाके,गणेश जूमनाके सचिन सोयाम, अशोक मडावी,नाना अर्जुने,विजय सोनवणे,नीलकंठ मडावी,सागर तोडसाम, किशोर अर्क,आकाश अर्क,गोकुल सोयाम प्रविण गाजलेकर सह समाज बांधव मोठया संख्या ने उपस्थित होते.