Konkan Krishi Vidyapeeth Recruitment 2025 : सातवी,दहावी,बारावी उत्तीर्ण बेरोजगारांना नोकरीची मोठी संधी !

Konkan Krishi Vidyapeeth Recruitment 2025 : महाराष्ट्र शासनाकडून राज्यात कोंकण कृषी विद्यापीठात रिक्त असलेल्या गट क आणि गड संवर्गातील विविध रिक्त पदे भरण्यात येणार आहे.DBSKKY Bharti 2025. डॉक्टर बालासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली या कृषी विद्यापीठासाठी निघालेल्या या पदभरती दरम्यान एकूण 259 रिक्त पदे भरली जाणार आहे.

यासाठी नुकतेच प्रकल्पग्रस्तांसाठी पद भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीत इयत्ता 7 वी, इयत्ता 12 वी इयत्ता, पदवीधर आणि इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांना शासकीय नोकरीची यातून संधी निर्माण झालेली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

वरील पदांसाठी पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पदांसाठी अर्ज करण्यापूर्वी प्रकाशित झालेली जाहिरात काळजीपूर्वक वाचून यासाठी ऑफलाइन अर्ज करावयाचा आहे.

DBSKKY Bharti 2025 : जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा : https://www.dbskkv.org/recruitment

राज्यात बेरोजगार तरुण रोजगाराचा शोध घेत आहे.अशात डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठात महाराष्ट्र शासनाकडून शासकीय नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे.

या विद्यापीठात ‘क’ आणि ” श्रेणीतील 249 रिक्त जागांसाठी पद भरतीची जाहिरात प्रकाशित झाली असून,याद्वारे सदर कृषी विद्यापीठात ही रिक्त पदे नियमानुसार भरली जाणार आहे. या श्रेणी मध्ये एकूण कोणती पदे आहेत, यासाठी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा किती आहे तसेच यासाठी ऑफलाईन अर्ज कसा करावा, हे आपण जाणून घेऊया.

भरती प्रक्रियेची माहिती.

  • भरती विभाग-कृषी विद्यापीठ
  • भरतीचे प्रकार-सरकारी नोकरी
  • भरती श्रेणी-महाराष्ट्र सरकार अंतर्गत ही भरती होणार आहे.
  • एकूण पदे-249
  • नोकरीचे ठिकाण-डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक-28 फेब्रुवारी 2025 पर्यंत.
  • भरतीमध्ये रिक्त पदे.-शिपाई कृषी सहाय्यक वायरमन प्रयोगशाळा सहाय्यक,
  • लिपिक मदतनीस पहारेकरी आणि इतर पदे.
  • शैक्षणिक पात्रता.-इयत्ता 7 वी,10वी,12वी,पदवीधर व इतर शैक्षणिक पात्रता धारक उमेदवार
  • मासिक मानधन-25 हजार 500 ते 81,100 हजार रुपये भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना वरील वेतन मिळणार आहे.
  • वरील प्रत्येक पदांसाठी मासिक वेतन हे वेगवेगळे राहील यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.http://dbskkv.org/recruitment
  • अर्ज स्वीकारण्याची प्रणाली.-ऑफलाइन पद्धतीने या पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेले आहे
  • वयोमर्यादा.-43 वर्षे वय असलेले उमेदवार या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करू शकणार आहेत.

वरील पदांसाठी उमेदवारांना अर्ज करण्याचा पत्ता.

कुलसचिव, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

Konkan Krishi Vidyapeeth Recruitment 2025 : पदांचे नाव आणि आवश्यक शैक्षणिक पात्रता.

कनिष्ठ संशोधक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता-कृषी/ उद्यान विद्या शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
शैक्षणिक पात्रता-मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतील अभियांत्रिकी (स्थापत्य) शाखेमधील पदविका किंवा पदवी परीक्षा उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपिक.
शैक्षणिक पात्रता-कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
मराठी टंकलेखनाची किमान 30 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
किंवा अंग्रेजी टंकलेखनाची किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा शासकीय परीक्षा वाणिज्य प्रमाणपत्र.
किंवा संगणक टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

लिपिक
शैक्षणिक पात्रता-कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी उत्तीर्ण.
मराठी टंकी लेखनाचे 30 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादेचे, किंवा अंग्रेजी टंकलेखनाचे किमान 40 शब्द प्रति मिनिट वेगमर्यादा शासकीय वाणिज्य परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र,
किंवा संगणक टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.

कृषी सहाय्यक
शैक्षणिक पात्रता-कृषी/उद्यान विद्या/वनशास्त्र/कृषी तंत्रज्ञान/कृषी अभियांत्रिकी /गृहविज्ञान/ मत्स्य विज्ञान/ जैवतंत्रज्ञान/अन्न तंत्रज्ञान/ कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयातील पदवी उत्तीर्ण.
किंवा मान्यता प्राप्त शासकीय संस्था डिप्लोमा /कृषी शासन विद्यापीठ कृषी पदविका /कृषी तंत्र पदविका परीक्षा उत्तीर्ण.

वीजतंत्री
शैक्षणिक पात्रता-एसएससी परीक्षा उत्तीर्ण.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआयमधील ITI वीजतंत्री प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
एक वर्षाचे एनसीवीटी NCVT व्यवसायाचे प्रमाणपत्र आवश्यक.

वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य)
शैक्षणिक पात्रता-मत्स्य विद्या शाखेतील पदविका उत्तीर्ण

प्रयोगशाळा सहाय्यक (मत्स्य)
शैक्षणिक पात्रता-मत्स्य विद्या शाखेतील पदविका उत्तीर्ण.

प्रयोगशाळा सहाय्यक
शैक्षणिक पात्रता-कृषी अभियांत्रिकी शाखेतील पदवी उत्तीर्ण.

प्रयोगशाळा सहाय्यक P.H.M.
शैक्षणिक पात्रता-कृषी/कृषी अभियांत्रिकी/मत्स्य विद्या शाखा या शाखा मधील पदविका पदवी उत्तीर्ण.

यंत्रचालक बोट
शैक्षणिक पात्रता-व्यापारी सागरी जहाज खात्याचे जहाज 6 महिने चालविण्याचे द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्रसह शासनमान्य नोंदणीकृत संस्थेची सागरी तेल यंत्राचे संधारण आणि दुरुस्तीचा 1 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र.

तांडेल
शैक्षणिक पात्रता-मत्स्य पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण. किंवा महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा किमान 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण,आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील मासेमारी नौकानयन आणि खलाशी कामाचा किमान 2 वर्षांचा अनुभव प्रमाणपत्र.

ट्रॅक्टर चालक
शैक्षणिक पात्रता-एसएससी परीक्षा उत्तीर्ण.
औद्योगिक प्रशिक्षण संस्था आयटीआय मधील मेकॅनिक ट्रॅक्टर प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
विभागीय परिवहन अधिकारी यांच्याकडील ट्रॅक्टर तसेच जळवाहन चालविण्याचा लायसन्स आवश्यक.
एक वर्षाचे एनसीवीटी व्यवसाय प्रमाणपत्र आवश्यक.

वाहन चालक
शैक्षणिक पात्रता-एसएससी परीक्षा उत्तीर्ण.
हलके वाहन आणि जड वाहन चालविण्याचा परवाना आवश्यक.
बस चालविण्याकरिता बॅच नंबर आवश्यक.

कुशल मासेमार
शैक्षणिक पात्रता-महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय खात्याचा 3 किंवा 6 महिने कालावधीच्या प्रशिक्षण अभ्यास करून उत्तीर्ण,आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील मासेमारी नौकानयन आणि खलाशी कामाचा 2  वर्षाचा अनुभव.

मासेमार
शैक्षणिक पात्रता-महाराष्ट्र शासनाच्या मत्स्य व्यवसाय खात्याचा 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण,आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील मासेमारी नौकनयन आणि खलाशी कामाचा 2 वर्षाचा अनुभव.

बोट मेन/डेक हॅन्ड
शैक्षणिक पात्रता-महाराष्ट्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा 3 किंवा 6 महिने कालावधीचा प्रशिक्षण अभ्यास करणे उत्तीर्ण,आणि शासनमान्य नोंदणीकृत संस्थेतील खलाशी कामाचा 1 वर्षाचा अनुभव.

शिपाई
शैक्षणिक पात्रता-माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण.

माळी
शैक्षणिक पात्रता-कृषी विद्यापीठ मान्यता प्राप्त 1 वर्षाचा माळी प्रशिक्षण अभ्यासक्रम उत्तीर्ण.

पहारेकरी
शैक्षणिक पात्रता-किमान 7 वी उत्तीर्ण तसेच सुदृढ प्रकृती असणारा उमेदवार.

स्वच्छक
शैक्षणिक पात्रता-किमान इयत्ता 4थी उत्तीर्ण.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

महत्त्वाचे म्हणजे वरील पदांसाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली कार्यक्षेत्रातील (विद्यापीठ प्रकल्पग्रस्त) प्रकल्पग्रस्तांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

इतर कोणत्याही उमेदवारांनी यासाठी अर्ज करू नये असे अर्ज प्राप्त झाल्यास विद्यापीठ प्रशासनाकडून ते विचारात न घेता असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील. वरील पदांसाठी ही जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून यातून 259 रिक्त पदे भरण्यात येणार आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

five × two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.