Aadhaar Virtual ID : देशात बँक खाते उघडणे असो किंवा इतर कोणत्याही सरकारी आणि अनेक महत्त्वाच्या व्यक्तिगत काम असो,यासाठी आधार कार्ड प्रत्येक नागरिकासाठी महत्त्वाचे UNIQUE NUMBER बनले आहे.सरकारी योजनांचा लाभ असो किंवा बँक खाते उघडणे असो,विविध केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार कार्ड क्रमांक महत्त्वाचा असतो.मात्र आता या नवीन Virtual ID प्रणालीमुळे आधार कार्ड क्रमांकाची कुठेही गरज पडणार नाही.आधार पीव्हीसी कार्ड किंवा आधार कार्ड डाउनलोड करण्यास अनेक कामांसाठी आता या आधारच्या वर्चुअल आयडी सिस्टम अमलात आला आहे.
बनावट आधार लिंक करून फसवणुकीचे प्रमाण वाढल्याने नवीन प्रणाली.
देशात आता आधार कार्ड फक्त ओळखपत्र म्हणूनच ओळखला जाणार नाही तर या आधार मुळे कोणाचेही व्यक्तिगत आणि शासकीय काम होणार नाही.आतापर्यंत सर्व कामे आधार कार्ड क्रमांक आणि बायोमेट्रिक सिस्टम वर होते.शाळा कॉलेजमध्ये प्रवेश असो की बँकिंग क्षेत्रामध्ये आर्थिक व्यवहार आणि इतर अनेक महत्त्वाची कामे आधार कार्ड शिवाय होत नाही.
मात्र देशात मागील काही काळात बनावट आधार कार्डमुळे फसवणूक आणि अनेक ग्राहकांचे बँक खाते आणि सरकारची महत्त्वाची कागद असलेली रेशन कार्ड हे बनवत आधार लिंक झाल्याने मोठ्या प्रमाणात फसवणूक होत आहे,त्यामुळे आता कुणालाही आपला आधार कार्ड क्रमांक देताना चिंता करावी लागते,मात्र आधार कार्ड क्रमांक न देताही कामे पूर्ण होईल,अनेक महत्त्वाची काम आधार नंबर न देता ही होऊ शकेल.यासाठी आता प्रत्येकाला आपला आधार कार्ड आधारावरच याचा वर्चुअल आयडी तयार करावा लागेल.{Aadhaar Virtual ID System}
Aadhaar Virtual ID म्हणजे नेमके काय?
आता सरकारने आधार कार्ड क्रमांक देताना वर्चुअल आधार आयडी देण्याची प्रणाली अमलात आणली आहे.विशेष म्हणजे नागरिकांना हा वर्चुअल आधार आयडी तयार करण्यासाठी कोणताही शुल्क भरावा लागणार नाही, हा वर्च्युअल आयडी एकूण 16 डिजिटचे राहणार आहे.आधार कार्ड क्रमांक न वापरता वर्चुअल आधार आयडी मधून व्यक्तिगत आणि शासकीय प्रमाणीकरण आणि ई-केवायसी करिता हा Virtual ID वापरला जाऊ शकतो.
यात महत्त्वाचे म्हणजे पुढे आधार कार्डधारक नागरिकांचा आधार क्रमांक वापरात येणार नाही.सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी,सरकारी सेवा घेण्यासाठी,बँकिंग आणि इतर बाबींसाठी ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करताना बँक खाते उघडताना,आधार पीव्हीसी कार्ड,आणि इ आधार डाऊनलोड करणे,पासपोर्ट तयार करण्यासाठी अर्ज,विमा पॉलिसी घेण्यासह Virtual ID चा अनेक कामात हा वापरला जाऊ शकतो.
नागरिकांना असा तयार करा वर्चुअल आधार आयडी?
- यासाठी सर्वप्रथम यूआयडी आधार कार्ड ओळख प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.{UIDAI}
- या वेबसाईटचे अगदी खालील भागात दिलेल्या आधार सेवांमध्ये आधार वर्चुअल आयडी{VID} हा ऑप्शन असेल यावर क्लिक करून,आधार वर्च्युअल आयडी जनरेशन सिस्टम सुरू होते.
- यावर क्लिक करून आपला आधार कार्ड क्रमांक आणि तेथे दिलेला CAPTCHA नमूद करा.
- आधार कार्डवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी {OTP}येईल.तो ओटीपी दिलेल्या जागेवर नमूद करा
- यानंतर आधार Card क्रमांक स्क्रीनवर दिसेल.
- विशेष म्हणजे हा आधार वर्चुअल आयडी आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर पाठविला जातो.तिथून आपला वर्च्युअल आयडी जतन करून ठेवा.
SMS माध्यमातूनही प्राप्त करता येतो आधार वरची ऑल आयडी
UIDAIप्राधिकरणाकडून ऑनलाइनरित्या आपल्या लॉगिन आयडी वरून आधार तयार करण्यासह आपल्या मोबाईल वरून SMS सुविधा वापरूनही आता आधार वर्चुअल आयडी बनवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.{SMS Service For VIRTUAL ID} अर्थातच आधार प्राधिकरणाच्या अधिकृत वेबसाईटवर Online व्यतिरिक्त फोनवरून एसएमएस पाठवून हा वर्चुअल आयडी मिळविता येते.
- यासाठी सर्वात आधी आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून आपल्या आधार कार्ड चे क्रमांक शेवटचे 4 अंक RVID सह टाईप करा.
- याला 1 9 4 7 {एक नऊ चार सात }या UIDAI सेवेच्या क्रमांकावर पाठवा.
- या नंतर आपला Aadhaar Virtual ID तयार होईल.
- SMS माध्यमातून तुमचा हा Virtual ID तयार होऊन तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबर वर तो प्राप्त होईल.
- जर उदाहरण पाहिला तर आधार कार्ड चे शेवटचे चार अंक 5634 असेल तर RVID 5634 असे लिहिण्यात येईल.
- याप्रमाणे नागरिक आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरून SMS पाठवून सुद्धा आपल्या आधार कार्ड चा वर्चुअल आयडी तयार करू शकणार आहेत.
Aadhaar Virtual ID Generator Website : https://resident.uidai.gov.in/vid-generation