Kisan Yuva Kranti Sanghathna भद्रावती रविंद्र बंडुजी गेजिक जिल्हा अध्यक्ष यांचा नेतृत्व.
दिनांक १०/११ फेब्रुवारी २०२४ रोजी मौजा कोकेवाडा .काटवल (भ ) पारोधि तसेच भद्रावती तालुक्यातील विविध भागात गारपीटसह अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यात शेतकऱ्यांच्या अनेक रब्बी हंगामातील पिकांचे फार मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला येत्या 31 मार्च 2024 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड करायची आहे.
त्यामुळे शेतकरी बांधवाला हा झालेल्या गारपीटासहित पाऊस आत्महत्या करण्यात प्रवृत्त करणारा असल्या मुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करून सण2023-24 सरसकट कर्ज माफ करण्यात यावे याकरिता मा.नायब तहसीलदार भद्रावती यांना Kisan Yuva Kranti Sanghathna भद्रावती मार्फत आज दिनांक 12 फेब्रुवारी 2024 ला निवेदन देण्यात आले उपस्थित शेतकरी रविंद्र गेजिक सामाजिक कार्यकर्ता विनोद बोबडे आष्टी चे सरपंच गोविंदा कुलमेथे विकास गजभे रोशन मानकर भारत बेलेकर अमित झाड़े चेतन भोसकर वैभव ढोक संदीप गराते वैभव खोड़े केशव मानकर मारोती खोडे आदी शेतकरी उपस्थित होते.