*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*
बाभुळगाव येथील खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाची निवडणुक दि.8 डिसेंबर रोजी ख. वि.संघाच्या कार्यालयात घेण्यात आली. यात अध्यक्षपदी काँग्रसचे श्रीकांत कापसे तर उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अॅड सतीश ठाकरे यांची सवानुमते अविरोध निवड करण्यात आली.दिनांक 6 नोव्हेंबर रोजी सोळा संचालक पदासाठी निवडणूक घेण्यात आली होती व नागरिकांचा मागास प्रवगासांठी १ अविरोध झाले होते. 17 संचालक मंडळाची दिनांक 8डिसेंबर रोजी अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यात आली.
निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून यवतमाळ जिल्हा उपनिबंधक अर्चनाताई माळवे यांनी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सरला झिलटे यांनी काम पाहिले यावेळी नवनियुक्त संचालक नितीन परडखे, संजय भैसे, सुरेश शिरभाते, विक्रम कोंबे, अंजली केळतकर, अर्चना राऊत, पंडीत,वासणीक, महेंद्र घुरडे, लक्ष्मण आखरे, भास्कर कोल्हे, विनोद खडसे, पुंडलिक टाले, अमोल ढाकुलकर, प्रविण पांडे, नारायण सराडकर, उपस्थित होते.खरेदी विक्री संघाच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडणूकी करीता तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांनी एकत्रित येऊन ही निवडणूक अविरोध केली.
यावेळी तालुक्यातील ज्येष्ठ नेते भैय्या साहेब देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव घारफळकर, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते कृष्णाभाऊ कडू तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहन बनकर, भाजपा तालुका अध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती सतीश मानलवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रशांत वानखडे शिवसेना उद्भव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तालुकाध्यक्ष गजाजन पांडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पांडे, बाजार समितीचे उपसभापती डॉ रमेश महानूर संचालक अतुल राऊत आशिष सोळंके माधव नेरकर बबन बोंबले मोहन भोयर प्रविन खेवले शाम जगताप नन्ना महाजन नागेश ठाकरे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्या ने उपस्थित होते.