साजेगाव(पिंप्री) ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी वनिता सोनोने अविरोध.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

तालुका प्रतिनिधी/दारव्हा: तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेच्या असलेल्या साजेगाव(पिंप्री),वाघुळ गट ग्राम पंचायतीची सरपंच पदाची निवडणूक शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी स्थानिक ग्राम पंचायतीत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी ग्राम पंचायतीच्या सरपंचपदी सौ.वनिता ताई संतोष सोनोने यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे त्यांची अविरोध निवड करण्यात आली आहे.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

याठिकाणी महिलेला सरपंच पदाची संधी मिळाल्यामुळे गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ग्राम पंचायतीच्या कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली.अर्ज भरण्याच्या वेळेत त्यांच्या विरोधात एकही अर्ज प्राप्त न झाल्यामुळे सौ.वनिता ताई संतोष सोनोने यांची अविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांने जाहीर केले.यावेळी गावकऱ्यांनी जल्लोष करीत आनंद व्यक्त केला.

साजेगाव ग्राम पंचायतीच्या इतिहासात दुसऱ्यांदा सोनोने परिवाराला सरपंच पदाची संधी मिळाली आहे.तसेच याठिकाणी बहुसंख्येने इतर समाज वास्तव्यास असताना अल्प प्रमाणात असलेल्या भोई समाजाला प्रतिनिधित्व मिळाले आहे. नवनिर्वाचित सरपंचा सौ.वनिता सोनोने यांच्या निवडीकरीता माजी उपसभापती नामदेव जाधव,राजू जाधव,प्रदीप जाधव,हितेश राठोड,उपसरपंच अर्जुन जाधव,संतोष जाधव,पंकज सोनोने यांनी अथक प्रयत्न केले.त्यांच्या निवडीबद्दल सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.यावेळी ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांसह गावकऱ्यांची उपस्थिती होती.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

two × four =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.