काळी दौलत येथे एसीबी ची धडक कारवाई.
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर ( धरण)*
प्रभारी तालुका आरोग्य अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले.
काळी (दौलत): आशा वर्करची नोकरी लावुन देण्यासाठी विस हजार रुपयांची लाच स्विकारताना प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी एसिबी च्या जाळ्यात अडकले ही कारवाई काळी दौलत प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचून करण्यात आली. महागाव तालुक्यातील माळवागद येथील एका महिलेला आशा वर्कर पदाची जागा भरण्यात येणार असुन त्या जागेवर तुमची निवड करतो त्याकरिता प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी डॉ .नरेंद्र आडे यांनी एक लाख रुपयांची मागणी केली होती.
सदर महिलेने आपली पात्रता असताना ही आपल्याला पैशाची मागणी करीत असल्याने याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी साडेचार वाजताच्या दरम्यान काळी (दौलत) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा लावुन नोकरी लावुन देण्यासाठी मागणी केलेले पैसे स्विकारताना प्रभारी तालुका आरोग्य डॉ नरेंद्र आडे यांना रंगेहाथ पकडुन ताब्यात घेतले आहे. सदरची कारवाई अँटीकरप्शन पोलीस निरीक्षक अमित वानखेडे, पोलीस निरीक्षक विनायक कारेगावकर, अंमलदार अब्दुल वसीम, सुधीर कांबळे, सचिन भोयर, महेश वाकोडे, सविता राठोड, चालक संजय कांबळे यांनी केली.