सरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन.

सरपंच संघटनेचे विविध मागण्यासाठी काम बंद आंदोलन.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब*

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

सरपंच संघटनेचे मुख्यमंत्र्यांना निवेदन.

सरपंच संघटनेने विविध मागण्यांसाठी तीन दिवस कामबंद आंदोलन पुकारले असून दोन दिवस या आंदोलनाला तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सरपंच संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन दि.18डिसेंबर रोजी बाभूळगाव तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. सरपंच व उपसरपंच व सदस्य यांना महागाई नुसार मानधन वाढविण्यात यावे व ग्रापंचायत मधील संगणक चालक यांच्या कामबंद आंदोलनावर निर्णय घेऊन प्रश्न निकाली काढण्यात यावा.

ग्रामीण भागात बऱ्याच अडचणी सरपंच्यांना येतात त्या समस्या चे निराकरण कुठलाही अधिकारी व कर्मचारी करीत नसल्यामुळे आमच्या हक्काचा प्रत्येक  विभागात आमदार असावा  तर आमच्या समस्याचे निराकरण होऊ शकते. ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्याच्या वतीने विधान परिषदेवर आमदार निवडन्याबाबत मतदानाचा हक्क असावा यासह विविध मागण्यांकरिता तीन दिवस कामबंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला.असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देते वेळी सरपंच संघटनेचे अध्यक्ष सुधीर कदडूकार, बबन बोंबले,आदी सरपंच, उपसरपंच उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

five × one =