Jode Maro Andolan: विमुक्त जाती (अ) मधील अवैध घुसखोरी थांबवा.

Jode Maro Andolan: विमुक्त जाती (अ) मधील अवैध घुसखोरी थांबवा.

*चेतन पवार दारव्हा तालुका प्रतिनिधी*

गोरसेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात Jode Maro Andolan.

तालुका प्रतिनिधी दारव्हा: विमुक्त जाती ( अ ) मधील अवैध घुसखोरी थांबवा,एसआयटी लागू करा, याकरीता सकल विमुक्त जाती च्या वतीने 8 डिसेंबर रोजी गोरसेनेचे अध्यक्ष प्रा संदेश राठोड यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात जन आक्रोश मोर्चा लाखोंच्या संख्येने धडकला होता,मात्र बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे हे विधिमंडळात उपस्थित असताना सुध्दा आंदोलन स्थळी निवेदन स्वीकारण्यासाठी आले नाही.

यामुळे सरकारच्या निषेधार्थ प्रतीकात्मक प्रतिमेला जोडो मारो व प्रतिमा दहन आंदोलन आज येथील गोळीबार चौकात करण्यात आले. गोर सेना व सकल विमुक्त जाती (अ) हजारो बांधवांचा जन आक्रोश मोर्चा नागपूर येथील विधान भवनावर धडकला. मोर्चा संपल्यानंतर निवेदन देण्याची वेळ 3. 30 वाजताची ठरवून देण्यात आली होती.वेळेवर निवेदन कर्ते निवेदन देण्यासाठी गेले असता मंत्री अतुल सावे हे विधी मंडळात हजर असूनही निवेदन स्वीकाररण्यासाठी आले नाही.

तसेच इतर कोणतेही मंत्री निवेदन स्वीकारण्यासपुढे आले नाही. सदर बाब संपूर्ण महाराष्टातील 5 कोटी विमुक्त (अ) प्रवर्गातील लोकांची हेतू परस्पर दखल घेत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनेचा निषेध म्हणून सरकारमधील मुख्यमंत्री. उपमुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्या प्रतिमेला जोडे मारो तसेच प्रतिमेचे दहन आंदोलन करण्यात आले. व याबाबतचे निवेदन तहसिलदार यांना गोर सेनेच्या वतीने देण्यात आले.यावेळी गोरसेना जिल्हा अध्यक्ष किशोर पालत्या,तालुका अध्यक्ष राजेश राठोड,मनोज चव्हाण, बाळा बंजारा,भीमराव राठोड,अमोल पवार,यांच्यासह गोर सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

17 + 10 =