विमुक्त जाती अ मधील अवैध घुसखोरी थांबवा अन्यथा सरकारला याचे परिणाम भोगावे लागेल – गोरसेना
*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी*
गोर सेना व सकल विमुक्त जाती यांच्यावतीने 8 डिसेंबर 2023 ला प्राध्यापक संदेश भाऊ चव्हाण राष्ट्रीय अध्यक्ष गोर सेना यांच्या नेतृत्वात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन दरम्यान विमुक्त जातीय मधील होत असलेली अवैध घुसखोरी रोखण्यासाठी जन आक्रोश महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यात संपूर्ण महाराष्ट्र भरून हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले असताना गोर सेनेच्या वतीने निवेदन देण्यासाठी मोर्चा संपल्यावर साडेतीन वाजेची वेळ दिली होती.
परंतु साडेतीन वाजता निवेदन करते निवेदन देण्यासाठी गेले असता अतुलजी सावे बहुजन कल्याण मंत्री विधिमंडळात हजर असतानाही निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ दिला नाही व इतर कोणत्याही मंत्र्यांनी सुद्धा वेळ दिला नाही करीता ही बाब संपूर्ण महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांना हेतूपूर्वक दाखल घेत नसल्यामुळे निर्देशनात आली या घटनेचे निषेध म्हणून गोर सेना व सकल विमुक्त जातीच्या वतीने शिंदे, फडवणीस, अजित पवार व अतुल सावे यांच्या प्रतिमेला जोडे मारो व प्रतिमा दहन आंदोलन कार्यकर्त्यांच्या उपस्थित दिनांक 13 डिसेंबर 2023 रोजी पुसद येथील तहसील कार्यालयासमोर करण्यात आले.
मंत्राच्या या कृतीमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पाच कोटी विमुक्त प्रवर्गातील लोकांच्या भावनेचा संवेदनहीन सरकारने भाविक छळ केला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये तब्बल 62 विधानसभा मतदारसंघात विमुक्त जातीय प्रवर्गातील लोकांच्या मतांमुळे आमदार निवडून येतात परंतु हे आमदार आम्हा मतदारांसाठी कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून येत्या 2024 मध्ये या सगळ्या आमदारांना घरचा रस्ता दाखवू असे आंदोलनकर्त्यांनी विचार व्यक्त केले आहे.