Jobs in Railways : भारतीय रेल विभागात पदांची मोठी भरती निघाली असून या पद भरती मध्ये दहावी आणि बारावी पास बेरोजगार युवकांसाठी रेल्वे विभागात नोकरीची मोठी संधी उपलब्ध करण्यात आली आहे.रेल्वे रिक्रुटमेंट सेल RRC कडून दक्षिण मध्य रेल्वे विभागात रेल कर्मचाऱ्यांची ही भरती करण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे दक्षिण मध्य रेल्वे स्पोर्ट्स कोट्यातून Sports Quota मधून पदांची ही भरती आयोजित करण्यात आली आहे.यासाठी इच्छुक उमेदवारांसाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या अधिकृत वेबसाईटवर एकूण किती पदांची भरती होणार आहे,आणि यासाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, याची माहिती देण्यात आलेली आहे.इच्छुक उमेदवार या वेबसाईटवर जाऊन आपला अर्ज सादर करू शकणार आहे.
- भारतीय रेल विभागाकडून दक्षिण मध्य रेल्वे मध्ये पदांची भरती क्रीडा कोट्यातून होणार आहे. ग्रुप सी मधील रेल विभागातील विविध विभागांसाठी पदांची ही भरती होईल.
यात नोकरी श्रेणी ए मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक खेळात (वरिष्ठ श्रेणी). - श्रेणी बी मध्ये विश्वचषक,आशियाई खेळ,विश्व चॅम्पियनशिप, राष्ट्रकुल खेळ,युवा चॅम्पियनशिप,ऑलिम्पिक,,डेव्हिस कप,थॉमस कप उबेर कप खेळाडूंसाठी पदे ठेवण्यात आली आहे.
- तर श्रेणी सी मध्ये आशियाई चॅम्पियनशिप आशिया कप,राष्ट्रकुल चॅम्पियनशिप,दक्षिण आशियाई फेडरेशन गेम्स,युसीआयसी UCIC,आणि जागतिक विद्यापीठ खेळ स्पर्धामध्ये मध्ये सामील खेळाडूंची या श्रेणीतील पदांवर निवड करण्यात येणार आहे.
ही आहे पदांसाठी शैक्षणिक पात्रता.
दक्षिण मध्ये रेल्वे मध्ये विविध श्रेणी मधून पदांची जी भरती काढण्यात आली आहे, त्यात दहावी आणि बारावी पास युवक भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र राहतील.
- वरील शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांनी श्रेणी A,B,C, मधील पदांसाठी अर्ज करताना,आंतरराष्ट्रीय चॅम्पियनशिप आणि विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्पोर्ट्स इव्हेंट्स मध्ये भाग घेतला असावे.
- यामध्ये “क्लर्क कम टायपिस्ट” या पदासाठी उमेदवाराला टायपिंग परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असून,टायपिंग परीक्षेत वेग हिंदी मध्ये प्रति मिनिट 25 शब्द आणि इंग्रजी मध्ये 30 शब्द प्रति मिनिट असावा.
उमेदवारांसाठी वयोमर्यादा.
या भरतीत सामील होणाऱ्या उमेदवारांसाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे.या पद भरतीसाठी अर्ज करताना इच्छुक उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे आणि कमाल वयोमर्यादा 25 वर्ष ठेवण्यात आली आहे.उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2000 पूर्वी आणि 1 जानेवारी 2007 नंतर झालेला नसावा 1 जानेवारी 2025 रोजी उमेदवारीसाठी वयाची गणना केली जाईल.
अर्ज आणि परिक्षाशुल्क
दक्षिण मध्य रेल्वेच्या या पदभरतीत सामील होणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज Online असेल.शुल्क सामान्य वर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये आणि अनुसूचित जाती,जमाती SC,ST,महिला उमेदवार,अल्पसंख्याक, आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असलेल्या उमेदवारांसाठी 250 रुपये शुल्क राहणार आहे.
अशी होईल निवड.
रेल्वे विभागाच्या या पण भरतीत आज करणाऱ्या उमेदवारांपैकी उमेदवारांची निवड चाचणी होणार आहे. उमेदवारांच्या शैक्षणिक आणि इतर खेळ स्पर्धांमधील त्यांचे दस्तावेज पडताळणी आणि खेळ कामगिरी चाचणीच्या आधारावर पदासाठी निवड करण्यात येईल.
आकर्षक वेतनश्रेणी.
भारतीय रेल विभागात खेळकोट्यातून निवड झालेल्या उमेदवारांना नोकरीत सामील करून त्यांना विविध स्तरावर वेतनश्रेणी असेल.
स्तर – 2 मध्ये 19900/- ते 69100/-
स्तर – 3 मध्ये 21700/- ते 69100/-
स्तर – 4 मध्ये 25500/- ते 81100/-
स्तर – 5 मध्ये 29200/- ते 92300/- रुपये प्रति महिना वेतनश्रेणी देण्यात येईल.
ही महत्वाची कागदपत्र प्रस्तुत करावी लागणार.
या पद भरतीत आज करणाऱ्या उमेदवारांसाठी खालील प्रमाणे आवश्यक कागदपत्रे प्रस्तुत करावी लागणार आहे.
- आधार कार्ड
- दहावी परीक्षेची गुणपत्रिका.
- पासपोर्ट आकाराचा फोटो.
- आयटीआय डिप्लोमा उमेदवाराचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी.
- उमेदवाराची स्वाक्षरी आणि अंगठ्याचा ठसा.
इच्छुक उमेदवार खालील पोर्टलवर करू शकतात नोकरीसाठी अर्ज.
या पद भरती सामील होण्यासाठी इच्छुक उमेदवारांना दक्षिण मध्य रेल्वेचे अधिकृत पोर्टल scr.indianrailways.gov.in वर पदभरतीची माहिती मिळेल.या साईटवर होम पेजवर Homepage वर APPLY या बटणावर क्लिक करुन नोंदणी registration बटणावर क्लिक करून आवश्यक तपशील नमूद करावयाचा आहे