आयकर विभागात नोकरीची मोठी संधी! या पदासाठी इतका मिळेल पगार ?
Jobs in Income Tax Department : देशात आयकर विभाग Income Tax Department हा महत्त्वाच्या शासकीय विभाग आहे आणि या विभागात नोकरी करण्यासाठी अनेक शिक्षित युवक इच्छुक असतात. सध्या आयकर विभागामध्ये सरकारी नोकऱ्यांची संधी आलेली आहे.या विभागात नोकरी मिळाल्यास आकर्षक असा पगार आणि इतर भत्ते आणि सुविधा मिळतात.
नुकतेच आयकर विभागाच्या भरतीमध्ये इंटरनल प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड बी रिक्त पदे भरली जाणार आहे.यासाठी विभागाकडून नोकरीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.आयकर विभागात नोकरीसाठी किती पदे आहेत,यासाठी अर्ज कसा करावा लागतो,आणि या भरतीची नेमकी प्रक्रिया कशी आहे,हे आपण जाणून घेवू या.
सरकारी नोकरी आणि चांगला वेतन मिळून जीवन सुविधा जनक व्यतित व्हावे ही प्रत्येक सुशिक्षित युवकाची इच्छा असते पण अनेकदा असे होते की सरकारी विभागात नोकऱ्यांची संधी असताना याची माहिती मिळत नाही त्यामुळे अनेकांना सरकारी नोकरीच्या संधीतून मुकावे लागते.
नुकतेच केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या आयकर विभाग Incom Tax Department Jobs मध्ये पदांची भरती सुरू करण्यात आली आहे. या विभागात नोकरी मिळालेल्या उमेदवारांना एक लाख 40 हजार पेक्षा जास्त वेतन आणि इतर भत्ते आणि सुविधा मिळणार आहेत. उल्लेखनीय म्हणजे आयकर विभागात या भरती दरम्यान उमेदवारांची कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नसून आयकर विभागाच्या अधिकृत असलेल्या वेबसाईटवर या संदर्भात पदांच्या भरतीचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
बी ग्रेड मध्ये प्रोसेसिंग असिस्टंट पदासाठी या विभागात सुशिक्षितांची शासकीय सेवेसाठी भरती करण्यात येत आहे. यासाठी संबंधित सुशिक्षित युवकांनी शैक्षणिक पात्रता पूर्ण केली असल्यास ते या पदांसाठी अर्ज करण्यास पात्र ठरतील. तर जाणून घ्या या पदांवर नियुक्ती झाल्यास किती पगार मिळेल आणि यासाठी काय करावे लागेल.
इतकी पदे भरणार.
आयकर विभागात प्रोसेसिंग असिस्टंट ग्रेड Data Proseccing Assistants बी पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन माध्यमातून अर्ज बोलाविण्यात आले आहेत या भरतीमध्ये आयकर विभागात एकूण आठ रिक्त पदे भरली जातील. प्रोसेसिंग असिस्टंट पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी माहिती अधिकृत नोटिफिकेशन मध्ये देण्यात आली असून संबंधित उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना शैक्षणिक आणि इतर पात्रता पूर्ण केली असणे आवश्यक असेल यानंतरच त्यांचे पात्र ठरविण्यात येईल.इच्छुक उमेदवार पद भरती नोटिफिकेशन येथे पाहू शकतात https://incometaxindia.gov.in
इतका मिळेल पगार.
इन्कम टॅक्स विभागात या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना शासकीय नियमानुसार लेवल सात अंतर्गत वेतन दिले जाणार आहे याचा अर्थ निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 44 हजार 900 ते 122 हजार 400 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे. यात मूळ पगार आणि इतर सोयी आणि सुविधांचा समावेश असेल.
उमेदवारांसाठी इतकी वयोमर्यादा,येथे पाठवा अर्ज.
आयकर विभागात या पदासाठी वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदासाठी 56 वर्षापर्यंतचे उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहेत. उमेदवारांना आपला अर्ज संबंधित कागदपत्रांसह इन्कम टॅक्स डायरेक्टरेट (System) केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ तळमजला E 2, ए आर ए केंद्र झंडेवालान विस्तार, या पत्त्यावर पाठवावयाचा आहे.