आता रिचार्जच्याही कमी किंमतीत मिळेल मोबाइल.युट्युब, फेसबुक सपोर्ट करणारा Jio Phone Prima 2 बाजारात.
उद्योग विश्वातल्या रिलायन्स कंपनीने नुकतेच भारतीय बाजारात जिओ फोन प्राईम टू(JioPhone Prima 2) आणले आहेत अगदी रिचार्ज किमतीपेक्षा कमी किमतीत हा अनोखा मोबाईल ग्राहकांच्या हाती येणार आहेत. मुख्य म्हणजे या मोबाईल मध्ये 2 हजार M.A.H. बॅटरी असून जियो प्राईमा 23 भाषांचा सपोर्ट करणारा आहे.तसेच अनेक एंटरटेनमेंट एप्सनां सपोर्ट सिस्टम सह याला आकर्षक “लक्स ब्लू कलर”मध्ये सादर करीत याची किंमत फक्त 2799 रुपये एवढी ठेवली आहे.ग्राहकांना आता हा जिओ फोन अॅमजॉन इंडियावरून खरेदी करता येईल.
2G,3G फोन युजर्सना 4G कडे आणले.
विशेष म्हणजे रिलायन्स ही जिओ देशात टेलिकॉम कंपन्यांपैकी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी आहे. जी आपल्या ग्राहकांना कमी किमतीत 4G आणि 5G आधुनिक नेटवर्क देते. मात्र कंपनीच्या लक्षात आला की देशात आताही साधारण मोबाईल फोन युज करणारे आणि त्यातून 2G, 3G फीचर फोन वापरणारे युजर्स अधिक आहेत. ही बाब लक्षात घेऊn आणि अशा ग्राहकांना 4G सेवा मिळावी यासाठी रिलायन्स जिओ ने अनेकदा 4Gफीचर्स असलेले मोबाईल फोन बाजारात आणले. आता यात मोठे पाऊल उचलून यात फीचर मध्ये वाढ करीत रिलायन्स जिओ ने प्राईमा टू हा मोबाईल लॉन्च केला आहे. यात युट्युब facebook जिओ सिनेमा आणि इतर मनोरंजन एप्स ला सपोर्ट करणारा सिस्टम बनविण्यात आला आहे.
JioPhone Prima 2 ची किंमत खूप कमी.
रिलायन्स जिओ प्राईम टू विशेष lux ब्ल्यू कलर मध्ये लॉन्च केला आहे,आणि ते ही फक्त 2799 रुपयांमध्ये. याला अॅमेजॉन या खरेदी साइटवर ग्राहकांकडून खरेदीसाठी उपलब्ध सुद्धा करण्यात आला आहे. या संबंधात कंपनीने दिलेल्या माहितीनुसार लवकरच हा फोन जिओ मार्ट रिलायन्स डिजिटल आणि इतर मोबाईल रिटेल स्टोअर्स वर विक्रीसाठी उपलब्ध करण्यात येईल.
आकर्षक असे फीचर्स.
कमी किमतीत आकर्षक फोन बनविताना रिलायन्स जिओ आकर्षक फीचर्स वर विशेष लक्ष दिले आहे जिओ प्रायमा 2 हा एक फीचर फोन आहे ज्यात वॉलकामचा प्रोसेसर तसेच Kai-OS चा सपोर्ट देण्यात आला आहे. यामुळे कोणत्याही स्मार्टफोनप्रमाणे यात युट्युब फेसबुक जिओ टीव्ही जिओ सिनेमा सारखे मनोरंजक ॲप्स सपोर्ट करतील सोबतच यात गुगल वाईस असिस्टंट चा देखील वापर करता येईल. याव्यतिरिक्त या फोनचा 2.4 इंच QVGA डिस्प्ले,क्वॉलकॉम प्रोसेसरसह यात 512 MB इतकी रॅम,तेच 4GB इंटरनल स्टोरेज कॅपिसिटी आहे. यात स्टोरेज साठी एसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येतो. विशेष म्हणजे जिओ प्रायमा टू मध्ये रियर कॅमेरा,आणि 0.3MP चा फ्रंट व्हीजीए कॅमेरा आहे. सोबतच एलईडी टॉर्च ग्राहक वापर करू शकतील
आधुनिक पेमेंट प्रणालीची सुद्धा सुविधा.
Jio Phone Prima 2 घेणाऱ्यांना यातून डिजिटल प्रणालीने आर्थिक व्यवहार करण्याची सुविधा देण्यात आली आहे या फोन द्वारे सर्व युजर UPI पेमेंट करू शकतील.यासाठी क्यूआर कोड देखील स्कॅन करता येईल. सोबतच jiyo pe यूपीआय सुद्धा आहे.या व्यतिरिक्त जो रियर आणि सेल्फी कॅमेरा आहे,त्यातून व्हिडीओ कॉलिंग करता येतो. तर 3.5mm ऑडियो जॅक आणि एफएम रेडियोची सुविधा यात आहे.