Jio Coin News : भारतात रिलायन्स जिओ कंपनीकडून काही दिवसांनंतर Jio Coin लाँच करण्यात येणार असल्याची चर्चा सुरू आहे.त्यामुळे देशात आता Reliance Jio चा सिक्का भारत भर चालेल.आता याच जिओ कॉईन बाबत रिलायन्स जिओ आणि या डिजिटल कॉईनला विकसित करणाऱ्या Polygon Lab कडून एक मोठी अशी अपडेट समोर आलेली आहे.
येत्या काही महिन्यातच भारतात जिओ कॉइन ची मार्केट मध्ये खरेदी विक्री सुरू होणार आहे.जिओ कंपनीकडून MY JIO ॲप्लिकेशन Zebpay आणि तसेच Cryptocurrency आणि बिटकॉइन ला लिस्टिंग करणाऱ्या Koinex या महत्वाच्या एक्सचेंजवर लवकरच JIO COIN Listing होईल. येथून जगभरात Jio Coin चलन आणि यातून खरेदी विक्री प्रक्रिया सुरू होईल,अशी माहिती नुकतीच समोर आलेली आहे..
भारतात आणि जगात रिलायन्स आणि याची टेलिफोन कंपनी असलेल्या जिओ टेलिकॉमची नियमित चर्चा होत असते,कारण याचे चेअरमन मुकेश अंबानी हे आशिया खंडातील सर्वात जास्त श्रीमंत उद्योगपती मानले जातात.आपल्या विविध उद्योग आणि उपक्रमामुळे रिलायन्स जिओ नेहमी चर्चेत असते,पण आता रिलायन्स जिओ आपल्या Jio Coin बाबत खूप चर्चेत आहे.
भारताच्या या अग्रगन्य Telecom आणि उद्योग कंपनी Reliance Jio ने डिजिटल Coin विश्वात मोठे असे पाऊल उचलले असून,जिओ कॉईनमुळे या कंपनीची देशभरात जोरदार चर्चा आहे.खरे तर हे Jio Coin भविष्यात Jio User ना खूप फायदा मिळवून देणारा उपक्रम आहे.
त्यामुळे भविष्यात क्रिप्टोकरेंसी होणाऱ्या या DIGITAL COIN ची सध्या खूप जोरदार चर्चा सुरू आहे.जिओ कंपनीकडून हे डिजिटल पॉलीगोन लेब कंपनीसोबत भागीदारी करून लॉन्च करण्यात येणार आहे,आणि हे संपूर्ण डिजिटल प्रक्रिया पॉलीगोन ब्लॉक चेनवर आधारित असेल.{Polygon Blockchain System}
Jio Coin News : जिओ पॉईंट म्हणजे Reward Based डिजिटल चलन.
रिलायन्स जिओ पॉलीगोन कंपनीचा हा एक रिवार्ड बेस्ट डिजिटल चलन अर्थातच डिजिटल कॉईन राहणार आहे याचे उद्देश देशात डिजिटल अर्थव्यवस्थेला मोठे चालना देऊन आपल्या JIO वापरकर्त्यांना इंटरनेट वापराच्या मोबदल्यात बक्षीस स्वरूपात फायदा मिळवून देणे आहे.
जिओ User साठी जिओ स्फेअर JIO Safari, Browsersकडून इंटरनेट ब्राउझिंग केल्यावर त्यांना हे जिओ कॉइन मिळणार आहे.हे Jio Coin रिलायन्स जिओच्या विविध सेवांसाठी वर्चुअल कॉइन म्हणून वापरात येऊन खूप फायदा देणारे ठरतील.
फक्त डिजिटल मालमत्ता नव्हे तर अनेक सेवांसाठी चलन म्हणून वापर होणार.
महत्त्वाचे म्हणजे रिलायन्स जिओ चे डिजिटल कॉइन फक्त नवीन अशी डिजिटल मालमत्ताच राहणार नसेल, तर त्याचा अनेक जिओ सेवांसाठी वापर केला जाऊ शकेल.याचा Users आपले पोस्टपेड,प्रीपेड रिचार्ज प्लान करण्यासाठी ते शॉपिंग करिता देशभरात विखुरलेल्या जिओ स्टोअर्स मधून जिओ कॉईन वापर करू शकणार आहेत. त्यामुळे जिओ फोनचा वापर नेमक्या कोणकोणत्या कामांसाठी होणार आहे?,याची एकूण किंमत किती असेल? याची आपण या माध्यमातून माहिती जाणून घेऊया……
येथे चालणार जिओ कॉलचा शिक्का….
- रिलायन्स जिओ पॉलीगोन लेब कडून सुरू होणारा हा डिजिटल जिओ कॉईन जिओचा एक रिवार्ड बेस्ड Ecosystem असेल.
- जे योजना वापरणाऱ्या वापरकर्त्यांना Reward म्हणून मिळणार आहे.
- जेव्हा युजर्स हे ब्राउझर वापरणार तेव्हा त्यांना इंटरनेट ब्राउझिंगच्या मोबदल्यात जिओ कॉईन बक्षीस मिळणार आहे.
- रिलायन्स जिओच्या या डिजिटल सिस्टम मध्ये या जिओ Digital Token चा विविध प्रकारे वापर केला जाऊ शकणार आहे.
- मोबाईल रिचार्ज करण्यासाठी जिओ सीम आणि रिलायन्स डिटेल्स मध्ये शॉपिंगसाठी या JIO DIGITAL COIN चा वापर होईल.
- रिलायन्स गॅस स्टेशन,JIO आणि Reliance Jio च्या इतर सर्व प्लॅटफॉर्मवर,JIO CINEMA साठी या Digital Coin अंतर्गत स्पेशल सूट आणि विविध ऑफर्स दिले जाण्याची शक्यता आहे.
सध्या चलनाची अधिकृत किमत जाहीर नाही.
सध्या रिलायन्स जिओ Polygon Lab कंपनीकडून या जिओ फोनची मार्केटमध्ये चलनाची अधिकृत किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नाही.मात्र या क्षेत्रातील Experts च्या मते JIO DIGITAL COIN ची प्रारंभिक किंमत प्रत्येक टोकन डबल 0.5 US Dollars म्हणजेच भारतीय चलनात 43रुपये 30 पैसे इतकी असू शकते.
देशात जिओ कॉईन चा वापर वाढताच याची किंमत सुद्धा वाढण्याची शक्यता आहे.महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात जिओ कडून माय जिओ ॲप,Zebpay,Koinex सारखे Crypto Currency एक्सचेंज मध्ये लिस्टिंग होऊ शकते अशी शक्यता आहे.यामुळे जिओ कॉईन वापर करताना याची क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइन सारखी खरेदी आणि विक्री करण्याची परवानगी मिळेल.अर्थातच येणाऱ्या काळात कोणीही हे जिओ Digital आणि Virtual कॉइन खरेदी विक्री करू शकणार आहेत.