Jayant Patil May Join BJP : महाराष्ट्राचे दिग्गज नेते शरद पवार यांना राज्यात दुसरा मोठा राजकीय धक्का आता पुन्हा आपल्या पक्षात लागताना दिसत आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सध्या प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष असलेले जयंत पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची राजकीय चर्चा सुरू आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करल्यानंतर भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार आणि आमदारांकडे डोहाळे लागले असल्याची चर्चा रंगत असताना,आता महायुती मधील अनेक दिग्गज नेते आणि एनसीपीएसपी गटाचे नेते जयंत पाटील हे महायुतीत सामील होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
ते 1 रिक्त मंत्रिपद कुणासाठी ?
दोन दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकार कॅबिनेटमध्ये सध्या 1 मंत्रिपद रिकामे असल्याचे वक्तव्य केले होते, मात्र ही जागा कुणासाठी रिक्त ठेवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिलेले नाही,पण याच दरम्यान शरद पवार गटाचे जयंत पाटील हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याने ते लवकरच भाजपमध्ये सामील होणार असल्याची राजकीय चर्चा रंगात आहे.
आता जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील राजारामबापू शिक्षण संस्थेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार आहेत. जयंत पाटील यांच्या आग्रहावरून ते सांगली येथे येत असल्याने आणि राजकीय विरोधी असतानाही त्यांच्या शिक्षण संस्थेत भाजप नेते विकासकाम भूमिपूजनासाठी येत आहे.
त्यामुळे एकूणच जयंत पाटील हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याची शक्यता शरद पवार यांच्या पक्षातूनही व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) सोडू शकतात आणि यानिमित्ताने शरद पवारांना महाराष्ट्रात आणखीन राजकीय धक्का देण्याची ही भाजपची रणनीती असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
Jayant Patil May Join BJP : प्रदेशाध्यक्ष पदावरून पक्षात अंतर्गत संघर्ष.
विश्वासनीय राजकीय सूत्रांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटांमध्ये सध्या प्रदेशाध्यक्ष पदावर नियुक्तीसाठी पक्षात अंतर्गत संघर्ष आणि मतभेद दिसत आहे.
त्यातच सांगली जिल्ह्यात जयंत पाटील यांच्या अखत्यारीत असलेल्या साखर कारखान्याला सध्या आर्थिक मदतीची गरज असल्याचे बोलले जात आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस एसपी गटाची घटलेली वोट बँक,आपल्या मतदारसंघात विकास कामे मार्गी लावण्यासाठी सत्तेला प्राधान्य दिलं जावा असे जयंत पाटील गटात चर्चा असल्याचे बोलले जात आहे.
आता भाजपकडून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंत्रिमंडळात एक कॅबिनेट मंत्री पद रिक्त असल्याचे सूचक वक्तव्य हे सर्व बाबी पाहता जयंत पाटील हे भाजप नेत्यांच्या संपर्कात असून,ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय शक्यता वर्तविण्यात येत आहे.
काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी?
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कॅबिनेट मध्ये एक पद रिक्त असल्याच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एसपी पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांनी या संदर्भात सूचक विधान केले आहे.
महायुती सरकारातील मंत्रिमंडळात ती 1 जागा जयंत पाटलांसाठीच आहे,असा थेट विधान अमोल मिटकरी यांनी केला.त्यामुळे राजकीय क्षेत्रातील नेत्यांचे लक्ष वेधले गेले.
उल्लेखनीय म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटन वाढीसाठी आणि एकूणच या पक्षासाठी जयंत पाटील यांचा खूप योगदान राहिला आहे.
मात्र 2019 मध्ये पक्षात असलेले अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात अंतर्गत राजकीय संघर्ष चर्चेत होता, त्यावेळेस जयंत पाटील हे भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा असतानाच मात्र यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी अनेक आमदारांना सोबत घेऊन पक्षांतर्गत बंड पुकारला,पाटील यांच्या आधीच अजित पवार महायुती सोबत जाऊन सत्तेत सामील झाले, यामुळे तेव्हा जयंत पाटलांचा शरद पवार यांच्यासोबत राजकीय प्रवास अविरत सुरू होता.
आता प्रदेशाध्यक्ष पदावर रोहित पवार यांच्यासोबत जयंत पाटील अंतर्गत राजकीय संघर्ष कारण?
आता प्रदेशाध्यक्ष असलेले जयंत पाटील पुन्हा या पदावर राहू इच्छितात,मात्र पवार घराण्यातील नवोदित नेते रोहित पवार यांच्यासोबत जयंत पाटील यांचा अंतर्गत राजकीय संघर्ष सुरू असल्याचे बोलले जात आहे.तर नुकतेच प्रदेशाध्यक्षपदावरून हा संघर्ष चव्हाट्यावरही येताना दिसला.
त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जयंत पाटील यांची अंतर्गत कोंडी आणि त्यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्याची रणनीती आखली जात असल्याचे संकेत मिळताच,जयंत पाटील यांनी आता सत्तेच्या आश्रयात जाण्याला प्राधान्य दिले असल्याची चर्चा रंगत आहे.
आता सांगलीत त्यांच्या शिक्षण संस्थेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा कार्यक्रम आणि कॅबिनेटमध्ये एक मंत्री पद रिक्त असल्याचे देण्यात आलेले संकेत,यामुळे ते सत्तेत सामील होऊन मंत्री होणार की आपली निष्ठा शरद पवार आणि त्यांच्या पक्षासाठी कायम ठेवणार याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले आहे.