रिसोड येथे जय अनंत महोत्सव चे तिसरे वर्ष.

रिसोड येथे जय अनंत महोत्सव चे तिसरे वर्ष.

*प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते*

रिसोड : रिसोड येथे भारत माध्यमिक शाळेमध्ये श्री नकुल दादा देशमुख यांच्या संकल्पनेतून जय अनंत महोत्सव साकारण्यात येणार आहे.या महोत्सवामध्ये छत्रपती शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ ,किल्ला, जन्मस्थान, तसेच मंदिर, वारकरी संप्रदाय दिंडी, व मेळाव्याचे आयोजन सोबतच मनोरंजन, जादूगर, महाराष्ट्रीयन लावणी असे अनेक कार्यक्रम शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी हे कलापथक तसेच अनेक प्रकारचे नाटक जुन्या रुढीतील पथक तसेच अनेक प्रकारचे जनजागृती पाणी आडवा पाणी जिरवा पाण्याबद्दल चे महत्व शेतकऱ्यांच्या अडीअडचणी यावर नाटक पात्र सादर करतात.

या महोत्सवांमध्ये खाद्यपदार्थ स्टॉलचे दर्जेदार चविष्ट पदार्थ याची तब्बल 102 दुकाने सहभागी होतात. तसेच कृषी प्रदर्शन स्टॉल सहभागी होतात.हा महोत्सव पाहण्यासाठी जवळपास जिल्हाभरातून प्रचंड गर्दी दरवर्षी पहावयास मिळते व या महत्त्वाचा मनसोक्त आनंद घेतात. हा कार्यक्रम दिनांक 22 ,23,24 नोव्हेंबर रोजी तीन दिवस चालणार आहे.तरी या महोत्सवाचा मनसोक्त आनंद घ्यावा आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

16 − 10 =