Jal Samadhi Protest: जल समाधी आंदोलनात हजारो महिला पुरुषांची हजेरी.

Jal Samadhi Protest: जल समाधी आंदोलनात हजारो महिला पुरुषांची हजेरी.

Jal Samadhi Protest: आर्णी प्रतिनिधी: निम्न पैनगंगा धरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित 5 डिसेंबरच्या जलसमाधी आंदोलनामध्ये मराठवाडा व विदर्भातील हजारो महिला पुरुषांनी सहभाग नोंदविल्याने प्रशासनाची बरीच तारांबळ उडाली होती. याबाबत सविस्तर वृत्त असे की, धरण विरोधी संघर्ष समितीचे मुबारक तंवर, विजय पाटील राऊत, बंडुसिंग‌ नाईक, प्रल्हादराव गावंडे सर यांच्या नेतृत्वात पैनगंगा नदी काठावरील खडका, आयता, कवठा, चिमटा, कापेश्वर, उमरी, झापरवाडी, वरुड, बिलायता , सावळी सदोबा, रामपूर, पाथरी, बामनगुडा.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

धानोरा सि. भांबपुर,सतीगुढा‌,चिंचखेड‌ , सिंदखेड, टेंभी या गावांनी कापेश्वर येथे जलसमाधी आंदोलनासाठी आले होते तर समितीचे अध्यक्ष प्रल्हादराव पाटील जगताप यांच्या नेतृत्वात सिद्धेश्वर येथे दातोडी,थड , गुडा, बोंडगव्हाण ,चौफुली,सावरखेडा, मदनापूर या गावांनी सिद्धेश्वर येथील नदीपात्रात जलसमाधीसाठी आले होते तर डॉ . बाबा डाखोरे‌ यांच्या नेतृत्वात राणीधानोरा ,कवठा बाजार व पडसा येथे राणीधानोरा गोकुळ गोंडेगाव, कवठा बाजार ,वडसा‌ , पडसा‌, साकुर, टाकळी.

नेर लिंबायत‌ गावातील शेतकरी शेतमजूर ही सगळी मंडळी पैनगंगेच्या नदी‌ पात्रात जल समाधी‌ आंदोलनासाठी उतरली होते, यामुळे प्रशासनाची काही काळ तांराबळ उडाली होती. एकंदर पैनगंगेच्या पात्रात पाच ठिकाणी जल समाधीचा आजचा कार्यक्रम धरण विरोधी संघर्ष समिती व पोलीसांच्या समन्वयाने निर्विघ्नपणे शांततेत पार पडला हजारो शेतकऱ्यांनी या जलसमाधी आंदोलनामध्ये महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला होता.

एकाच वेळी पैनगंगेच्या नदी‌ पात्रात 5 ठिकाणी शेतकरी शेतमजूर शेकडोच्या संख्येने एकाच वेळी जलसमाधी घेण्याच्या उद्देशाने नदीपात्रात शिरल्याने पोलिसांची काही काळ तांराबळ उडाली होती, परंतु धरण विरोधी संघर्ष समितीचे कार्यकर्त्यांनी आवरते घेत आणि सगळ्याला शांततेने जलसमाधी आंदोलन करण्याचं विनंती केल्याने आणि पोलिसांच्या सहकार्याने एकंदर जलसमाधी आंदोलन शांततेत पार पडले. विदर्भ व मराठवाड्यातील पाच ठिकाणच्या जलसमाधी आंदोलनाने पैनगंगा नदीला कुंभमेळाचे स्वरूप आल्याचे दिसत होते.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

eighteen − sixteen =