“जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न”

“जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न”

यवतमाळ

“जाजू इंटरनॅशनल स्कूल यवतमाळ येथे विद्यार्थ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न”

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वृध्दींगत होण्यासाठी जाजू इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय विद्यार्थी परिषदेची स्थापना करण्यात आली. तसेच त्यांचा पदग्रहण समारंभ २६ जुलै २०२३ रोजी पार पडला.
याप्रसंगी माननीय श्री योगेश डाफ सर (पंचायत समिती यवतमाळ गटशिक्षणाधिकारी), दामिनी पथकाच्या मुख्य दीपमाला भेंडे, बिंदू जोगळेकर, रेणू सांगळे तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी जाजू सर, उपाध्यक्ष माननीय सुरेन्द्रजी कासट सर, सचिव माननीय आशिषजी जाजू सर आणि शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शिल्पा जाजू मॅडम मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांमध्ये विविध खात्यांचे वाटप करून जबाबदारी सोपविण्यात आली. नवनिर्वाचित सदस्यांमध्ये विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून मुलींमध्ये टिशा जयपुरीया आणि मुलांमध्ये चिराग जांगिड यांची निवड करण्यात आली. क्रीडा विभाग प्रमुख रिदांत खारकर, इव्हेंट प्रमुख मुलींमध्ये प्रब्लीन पाबला आणि मुलांमधून वेद तेलेवार, चार हाऊसेसचे प्रमुख यात देवांश बजाज (ॲल्प्स), स्वस्तिक जाजू (ॲन्डिज), अर्नव जिरापुरे (हिमालया) आणि श्रीकांत चवलेवार (रॉकिज) यांची निवड करण्यात आली. पदग्रहण सोहळ्याचा शपथविधी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जाजू मॅडम यांच्या द्वारे पार पडला.
“लोकशाहीमध्ये निवडणुकीला फार महत्त्व असते. सर्वांची यातून निवड झाली. यातून नेतृत्वगुण तर वृद्धिंगत होतीलच पण याशिवाय कॅप्टनशिप कराल आणि हेच तुम्हाला भविष्यात उपयोगी पडतील. आपल्यामध्ये असलेला कमकुवतपणा घालविण्यासाठी शक्ती, प्रेरणा या गोष्टी आवश्यक असतात. जाजू इंटरनॅशनल स्कूल एक सुंदर व्यासपीठ आपल्याला या सर्व गोष्टी उपलब्ध करून देते”, अशा शब्दांत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत शाळेचा गुणगौरवही योगेश डाफ सर यांनी केला.
दामिनी पथकाच्या दीपमाला भेंडे यांनी “मुलांप्रमाणेच मुलींमध्ये नेतृत्वगुण विकसित होणे गरजेचे आहे. यासाठी त्यांनी प्रयत्न करायला हवेत” या शब्दांत आपला अभिप्राय व्यक्त केला.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.शिल्पा जाजू मॅडम यांनी “विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, लोकशाहीमूल्य, सर्वसमावेशकता, विवेकशीलता, जाणीवजागृती निर्माण व्हावी, तसेच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास व्हावा आणि विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्यांची जपणूक व्हावी”, कारण “आजचे विद्यार्थी हे भविष्याचे निर्भीड, सक्षम व उदात्त ध्येयवादी व्यक्तीमत्व विकास घडविणारे आहेत. हा उद्देश लक्षात ठेवूनच शाळेत असे उपक्रम राबविण्यात येतात” असे विचार मांडले.
यावेळी वर्ग १ ते ९ चे सगळे पी.टी.ए मेंबर्स, उपमुख्याध्यापक विजय देशपांडे सर, समन्वयक शिवाजी देशमुख सर आणि साबेरा बाटावाला मॅडम, सर्व क्रीडा शिक्षक आकाश गणवीर, श्याम तायवाडे, शितल पाल, दीपक शेलोटकर, क्रांतीकुमार अलोणे, क्षितीज गौरखेडे, धरती लाखेकर, दानिश खान पठाण विशेषत्वाने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चिराग जांगिड आणि लब्धी कोठारी तर आभार वेद तेलेवार याने मानले.