IRCTC Recruitment 2025 : भारतीय रेल्वे मध्ये आता परीक्षेशिवाय होणार उमेदवारांची नियुक्ती ! तात्काळ करा ऑनलाईन अर्ज !

IRCTC Recruitment 2025 : भारतीय रेल्वे विभागाकडून संचालित होणाऱ्या इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी)द्वारे हॉस्पिटलिटी मॉनिटर पदांसाठी भरती होणार आहे.आयआरसीटीसी कडून हॉस्पिटलिटी मॉनिटर पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 4 मार्च 2025 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.इच्छुक उमेदवार या पदांसाठी अर्ज करण्यासाठी irctc.comया लिंक वर क्लिक करून Online अर्ज करू शकतात.

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now

भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसी (IRCTC)डिपार्टमेंट कडून हॉस्पिटलिटी मॉनिटर पदांसाठी भरतीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.भारतीय रेल्वेमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी इंडियन रेल्वे कडून उपलब्ध करण्यात आलेली आहे.

IRCTC Recruitment 2025 : एकूण 6 पदांसाठी होणार उमेदवारांची निवड.

  • आयआरसीटीसी ने हॉस्पिटलिटी मॉनिटरच्या एकूण 6 पदांसाठी होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविले आहे.या 6 पैकी
    2 पदे हे जनरल कॅटेगिरी (General) मधील आहे.
  • 3 पदे ओबीसी (OBC)प्रवर्गासाठी
  • 1 पद अनुसूचित जाती,जमाती (SC./ST.) प्रवर्गातील उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा.

शैक्षणिक पात्रता आयआरसीटीसी मधील हॉस्पिटलिटी मॉनिटर पदांसाठी अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडे हॉस्पिटलिटी आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये बीएससी पदवी असणे आवश्यक आहे.

पर्यटन मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भारतीय पाककला संस्थांमधून बीबीए/एमबीए उत्तीर्ण उमेदवार सुद्धा या पदांसाठी अर्ज करू शकतात.

उमेदवार शैक्षणिक पात्रतेसंदर्भात अधिक माहितीसाठी आयआरसीटीसी जाहीर केलेली अधिकृत रिक्त पदांची अधिसूचना तपासावी.

https://www.irctc.com/assets/images/Notification_Hospitality_Monitors_IRCTC_SCZ(10.02.2025).pdf

https://www.irctc.com/new-openings.html

उमेदवारांसाठी निर्धारित वयोमर्यादा.

  • आयआरसीटीसी मध्ये वरील पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे कमाल वय 28 वर्ष निर्धारित करण्यात आले आहे.
  • यात ओबीसी कॅटेगिरीतील इच्छुक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत 3 वर्ष
  • एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षे सवलत असेल.

अशी होईल निवड प्रक्रिया.

वरील पदांसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्या उमेदवारांची निवड प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे केली जाईल.या पदांसाठी कोणतीही परीक्षा होणार नाही. या निवड प्रक्रियेतून आयआरसीटीसीच्या वरील पदांसाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला दरमहा 30 हजार रुपये पगार देण्यात येईल.

सोबतच इतर भत्ते सुद्धा मिळतील मुलाखतीतून निवड झालेल्या उमेदवारांची यानंतर वैद्यकीय चाचणी होईल,आणि यात पात्र झाल्यावर अशा उमेदवारांची नियुक्ती होईल.विशेष म्हणजे निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती ही आयआरसीटीसी मध्ये 2 वर्षांच्या एग्रीमेंट आधारावर होणार आहे.

 नोकरी ग्रुप जॉईन करण्यासाठी : येथे क्लिक करा

WhatsApp Group Join Now
Instagram Join Now
Sharing Is Caring:

Leave a Comment

2 + two =

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.