Iran Israel War : ईरान कडून इजरायल वर मिसाइल अटैक होताच, Crude Oil दरात लागली आग, Crude Oil दारात मोठी वाढ.
हमास इजरायल युद्धादरम्यान पॅलेस्टाईन समर्थक.
इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात हल्ला सुरू केला आहे. मंगळवारी इराणकडून इस्रायलवर तब्बल 180 मिसाईल क्षेपणास्त्रे डागण्यात आली.त्यामुळे हा युद्ध तेल विपणन क्षेत्रात तणाव चांगलाच वाढविताना दिसत आहे.या हल्ल्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाला आहे.यामुळे एका दिवसात क्रूड ऑईलच्या दरात 5% वाढ झाल्याचे दिसत आहे.
ग्लोबल मार्केट दहशतीत.
इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे (Iran-Israel Conflict) जगात चिंता वाढली आहे. याबरोबरच जागतिक बाजारपेठमध्ये ही इराणकडून इजरायल वर झालेल्या हल्ल्याने घबराट पसरल्याचे दिसते.काल इराणने सुमारे १८० क्षेपणास्त्रे डागून इस्रायलवर जोरदार हल्ला चढवला,त्यामुळे पश्चिम आणि आखाती क्षेत्रात तणाव आणखी वाढला आहे.या हल्ल्याचा थेट परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवर झाले आहे.दरम्यान इस्त्रायली लष्करानेही प्रत्युत्तराच्या हल्ल्यासाठी पूर्णपणे तयार असल्याचा दावा केला आहे.
दोन्ही देशांमधील वाढत्या तणावाचा परिणाम हा पहिल्यांदा कच्च्या तेलाच्या किमतींवर होत असून कच्च्या तेलाच्या किमती एकाच वेळी 5 टक्क्यांनी वाढल्या आहेत.इराणने बॅलेस्टिक क्षेपणास्त्राने हल्ला केला असून आता आम्ही इराणच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ, आमची योजना तयार आहे, पण वेळ आणि ठिकाण आम्ही निवडू.असे इजरायल कडून वृत्त देण्यात आले आहे. इराणने इस्रायलवर 180 हून अधिक क्षेपणास्त्रे डागून मंगळवारी रात्री हा इजरायल वर हल्ला करताच जागतिक बाजारपेठेत याचा असर होताना दिसत आहे.
इराण क्रूड ऑइल निर्यातीत मास्टर प्लेयर.
इराण हा डिझेल,पेट्रोल,क्रूड ऑइल तेल क्षेत्रात मोठा निर्यातदार आहे. ओपेकचा सदस्य देश असलेला इराण या तेल क्षेत्रातील मास्टर प्लेअर मानला जातो. त्याच्याकडून इजरायल वर हल्ला होताच आता कच्च्या तेलाच्या क्षेत्रात इराणच्या सहभागीतेमुळे तेल पुरवठा साखळीत खोळंबा येण्याची भीती वाढली आहे.क्रूड ऑइल किमतीत वाढीमुळे याचा काही तासातच परिणामसुद्धा दिसत आहे. इराण जगातील एक तृतीयांश तेलाचा पुरवठा करतो. बुधवारी बिझनेस टुडेच्या वृत्तानुसार, इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संकट वाढत असल्याचे दिसत आहे.या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे.
ब्रेंट क्रूडच्या दरात अचानक उसळी.
इस्रायल आणि इराणमधील तणावाचा परिणाम पाहिला तर,आंतरराष्ट्रीय बाजारात वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट क्रूड (WTI क्रूड) च्या किमतीत अचानक 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे. यापूर्वी ते सुमारे 2.7 टक्क्यांनी घसरले होते. ताज्या वाढीनंतर त्याची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल $ 71 च्या पुढे गेली आहे. जागतिक बेंचमार्क ब्रेंट क्रूडच्या किमतीवर याचा असा परिणाम झाला आहे की,ब्रेंट क्रूड ऑइल किमतीत सुमारे 5 टक्क्यांची वाढ होत आता हे दर प्रति बॅरल $75 च्या वर गेले आहे.
जागतिक शेअर बाजारावर परिणाम.
केवळ कच्च्या तेल किमतीसह इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा परिणाम जागतिक शेअर बाजारांवरही होत आहे.एकीकडे(शेयर आणि प्राईज) S&P-500 मध्ये 1.4 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे, तर दुसरीकडे Dow Jones आणि Nasdaq देखील लाल रंगात आहेत. याशिवाय जपानचा निक्केईही 1.77 टक्क्यांनी घसरला आहे. दोन्ही देशांमधील हल्ल्यांमुळे निर्माण झालेल्या भू-राजकीय परिस्थितीचा परिणाम दिसू लागल्याने तज्ज्ञही त्याच्या वाढीच्या दुष्परिणामांबाबत आता इशारा देत आहेत. केली कॉक्स, रिथोल्ट्झ वेल्थ मॅनेजमेंटचे मुख्य मार्केट स्ट्रॅटेजिस्ट म्हणतात की, मध्य पूर्वेतील तणावाने बाजारपेठेला स्पष्टपणे बाजूला केले आहे.
तेलाच्या किमती वाढत आहेत, रोखे वाढत आहेत, सोने वाढत आहे आणि साठा कमी होत आहे. डेव्हिड लिन हे AI चे CEO आहेत.त्यांच्या मते, तेल बाजार या देशातील भू-राजकीय जोखमींबाबत अत्यंत संवेदनशील आहे आणि पुरवठ्यात कोणताही अडथळा आल्यास ऊर्जेच्या किमती वाढू शकतात.तर थेमिस ट्रेडिंगचे इक्विटी ट्रेडिंगचे सह-प्रमुख जोसेफ सलुझी यांच्यामते इराण इजरायल मध्ये भू-राजकीय तणावामुळे तेलाच्या किमती वाढल्याने समोर महागाई सुद्धा वाढू शकते.